Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अन् जागावाटप, महापालिका निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

- नागपूर मध्ये काँग्रेसला धक्का काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत साबळे यांनी भाजप मध्ये घेतला प्रवेश

- पुढील दोन दिवसात काँग्रेस सहित इतर पक्षातील अनेक इच्छुक भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती

Sharad pawar Group : शरद पवार गट महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर ?

पुण्यातून मोठी बातमी

शरद पवार गट महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर ?

उद्या दोन्ही राष्ट्रवादीची दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यत

शरद पवार गटाची मागणी अजित पवारांनी मान्य केली, सूत्रांची माहिती

पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाला ३२-३५ जागा मिळणार

तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हावर होणार आघाडी

उद्या दुपार पर्यंत होणार घोषणा

उल्हासनगरात भाजपाला मोठा धक्का, भाजपच्या जयश्री पाटील यांचा टीओकेमध्ये प्रवेश

उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या पॅनल 1 च्या माजी नगरसेविका जयश्री ज्ञानेश्वर पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत टीम ओमी कलानी मध्ये प्रवेश केला आहे. त्या तीन वेळा पॅनल 1 मधून निवडून आल्या आहेत. या वेळी टीम ओमी कलानीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थितीत होते. या पॅनल मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या पॅनलला ताकद मिळाली असून या पॅनल मधून आणखीन एक मोठा प्रवेश टीम ओमी कलानी मध्ये होणार असल्याची चर्चा आहे.

पुण्यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपली

बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुपस्थितीची झाली चर्चा

सातत्याने संपर्क करूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुठलाही प्रतिसाद नाही

यापुढे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घेणार सावध भूमिका

दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून पुणे शहरातील सर्व 165 जागांवर "सिट टू सिट" चर्चा

भाजप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार

भाजपकडून सन्मानजनक जागा शिवसेनेला दिल्या जाणार का याकडे लक्ष

भाजपकडून अवघ्या १० ते १५ जागांचा प्रस्ताव दिला असल्याने शिवसैनिक आहेत नाराज..

शिवसेनेला पुण्यात हव्यात किमान २० ते २५ जागा

पुण्यातील काही शिवसैनिकानी घेतली आहे पक्ष श्रेष्ठीची भेट

अलिबाग वडखळ मार्गावर ट्रॉफिक जाम,१० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

अलिबाग वडखळ मार्गावर ट्राफिक जाम

१० ते १५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई आणि अलिबाग कडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक जाम

30 मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी लागत आहेत 2 ते 3 तास

मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा होईल

- गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया

- आपण बघितलं की देशातला जनतेचा कल कुठे आहे.. राज्यातल्या जनतेचा कल कुठे आहे?

- आणि अशा प्रकारचे विधान करून लोकांना संभ्रमात टाकण्याचे काम विजय वडेट्टीवार साहेब करत आहे

- प्रचंड मोठं काम भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीचे राज्यांमध्ये झालेला आहे

- निश्चितच मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा होईल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार

शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी यादी जाहीर केली

अठरा उमेदवाराची घोषणा

२४ तासांत युतीवर निर्णय नाही घेतला तर स्वतंत्र निर्णय घेऊ – प्रताप सरनाईक यांचा भाजपाला अल्टिमेटम

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा अधिकच वाढला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला थेट २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

जळगावमध्ये महायुतीबाबत अद्यापही अनिश्चितता

विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बंद द्वार चर्चा केल्यानंतर नाराज होऊन गुलाबराव पाटील विश्रामगृहातून पडले बाहेर

विश्रामगृहातून गुलाबराव पाटील बाहेर पडल्यानंतर काही वेळानंतर गिरीश महाजन ही विश्रामगृहातून नाशिककडे रवाना

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ बजरंग दलाकडून निदर्शने

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ वाशिम शहरात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चं चाललंय काय?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चं चाललंय काय?

पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गट आला नाही

काँग्रेस भवनात काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक सुरू

शरद पवार गटाचे नेते बैठकीला उपस्थित नाहीत

शरद पवारांच्या गटातील सर्व प्रमुख नेते "नॉट रिचेबल", काँग्रेस आणि सेनेकडून तक्रार

शरद पवार गट पुन्हा राष्ट्रवादी सोबत जाणार ?

दिगंबर समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

वाशिमच्या शिरपूर येथील जैन मंदिरातील दिगंबर पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरपूर पोलीस ठाण्यावर सिद्धांत सागर महाराज यांच्या नेतृत्वात दिगंबर समाजा कडून इशारा मोर्चा काढत पोलिस स्टेशन परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांचा राजीनामा

एम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते

सोलापूर शहर मध्य विधानसभेतून फारुख शाब्दि यांनी दोन वेळा निवडणुकीच्या रिंगणात होते

दोन्ही वेळेस फारुख शाब्दि हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत

त्यांच्याकडे सध्या सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदारी होत्या

मात्र पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणमुळे शाब्दि यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली

साताऱ्यात यात्रेमध्ये शस्त्राचा धाक दाखवून मारहाणीसह दरोडा

पुसेगाव येथे सेवागिरी यात्रेमध्ये दरम्यान KM ग्रुप च्या नावाने दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपी करण मदने आणि त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पुसेगाव येथे दुचाकी वरील दोघांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून 70 हजाराचा मुद्देमाल घेऊन संशयित आरोपी पळून गेले होते या प्रकरणात पुसेगाव पोलिसांनी. यातील प्रमुख आरोपीला साथीदारांसह अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोमल करत आहेत.

सोलापूर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पहिले 6 उमेदवार घोषित

सोलापूर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पहिले 6 उमेदवार घोषित

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने पहिली यादी केली जाहीर

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट लढावणार आहे 20 जागा

माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुनीता रोटे वगळता सर्व नावख्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिली आहे संधी

चंद्रपूर महापालिका संदर्भात नागपुरातील भाजप कार्यालयात बैठक सुरू

चंद्रपूर महापालिका संदर्भात नागपुरातील भाजप कार्यालयात बैठक सुरू

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत आहे बैठक

बैठकीला सुधीर मुनगंटीवार , किशोर जोरगेवर , सह इतर पदाधिकारी उपस्थित

चंद्रपूर मध्ये नाराजी नाट्यानंतर नागपुरात ही दुसरी बैठक होत आहे

सोलापूर महापालिकेत शिवसेना - भाजप युती चर्चा फिस्कटल्यानंतर ; शिवसेना - राष्ट्रवादी युतीवर बैठक सुरु

सोलापुरातील एका नामांकित हॉटेल मध्ये सुरूय शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित दादा गटात चर्चा

सोलापूर महापालिकेतील 102 पैकी 50% जागांवर दोन्ही पक्षाचे झाले एकमत

शिवसेना शिंदे 51 आणि राष्ट्रवादी अजित दादा 51 जागा लढावण्यावर झाले एकमत

शेळ्या-बोकडांवर पाळत ठेवत चोरी करणाऱ्या बोकड चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातून ५ शेळ्या आणि १ बोकडाची चोरी करून फरार झालेल्या चोरट्यांना श्रीगोंदा तालुक्यातून अटक करण्यात आली.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

नाशिकच्या येवला येथे शासकीय आधारभूत किमंत योजने अंर्तगत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.शासकीय आधारभूत किंमत योजना २०२५-२०२६ अंतर्गत सहकार महर्षी गोविंद नाना सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत मका खरेदी करण्यास सुरुवात झाली असून यावेळी येवला तालूक्यात शासकीय मका केंद्राचे गोदाम मोठे करण्यात येईल असे आश्वासन देत शेतक-यांनी जास्त जास्त मका केंद्रावर आणून शासकीय किमतीचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी केले.

nashik-baglan-साल्हेर किल्ल्यावर खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गड-किल्ले संवर्धन मोहिम

नाशिक जिल्ह्यातील दुर्गम व अभ्यदे किल्ला असलेल्या साल्हेर किल्ल्यावर आज खासदार निलेश लंके व आपला मावळा संघटने तर्फे गड-किल्ले संवर्धन मोहिम राबविण्यात आली,सकाळ पासून अनेक मावळे घोषणा देत किल्ल्यावर पोहचले या मोहिमेत गडावरील कचरा,वाढलेली झुडपे,पायवाटा,मंदीरासमोरील सफाई करण्यात आली.ऐतीहासिक वास्तूंचे जतन,शिवरायांनी उभे केलेले किल्ले,या मोहिमे द्रवारे स्वराज्याची मुल्ये,ऐतिहासिक जाणीव नव्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठीची शपथ यावेळी घेण्यात आली.यावेळी मोठ्या संख्ये स्थानिक व आपला मावळा संघटनेचे कार्यकर्त्यांनी किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविली.

तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची शाकंभरी नवरात्र महोत्सवपूर्वीची मंचकी निद्रा संपवुन देवी आज पहाटे सिंहासनावर विराजमान झाली आहे तर दुपारी महोत्सवाचे यजमान उल्हास कागदे यांच्या हस्ते गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली. पुढील सात दिवस मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम व देवीच्या अलंकार महापूजा तर या कालावधीत दररोज छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.3 जानेवारी रोजी शांकभरी पोर्णिमेला पुर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने या नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.ऐकीकडे शाकंभरी नवरात्र महोत्सव व सलग सुट्यांमुळे तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षपातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाही - कृष्णराज महाडिक यांचा खुलासा

भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.

कल्याण पूर्वेनंतर कल्याण पश्चिमेतही भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या महायुतीत झालेल्या जागा वाटपाचा पार्श्वभूमीवर भाजपमधील असंतोष उफाळून येताना दिसत आहे.काल रात्री कल्याण पूर्वेत भाजपला 7 जागा देण्यात आल्याने पूर्वेतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालय बाहेर गोंधळ घालत घोषणाबाजी केली होती आता पूर्वेनंतर कल्याण पश्चिमेतही भाजपला 9 जागा दिल्याने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले असून युती नको अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत.पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुण्यात महत्त्वाची बैठक

पुणे महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक

तिन्ही पक्षाचे नेते बैठकीला राहणार उपस्थित

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आज संध्याकाळी बैठक घेत महाविकासआघाडी साठी करणार अंतिम चर्चा

सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विश्वजीत कदम, सचिन अहिर यांची एकत्रित बैठक

पुणे महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्यासंदर्भात बैठकीत होणार एकत्रित चर्चा

आज रात्रीच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता

दुपारी तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडणार

याच बैठकीत जागावाट बाबत चर्चा झाल्यानंतर हे स्थानिक नेते अहवाल तयार करणार

याच अहवालावर संध्याकाळच्या बैठकीत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते करणार चर्चा

Maharashtra Live News Update: कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार

महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांची खासगीत बोलत असतानाची माहिती

प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज महाडिक यांनी भरला होता उमेदवारी अर्ज

खोपोली हत्याकांड प्रकरणी शिवसैनिकांकडून राष्ट्रवादीचा निषेध

रायगडच्या खोपोलीमध्ये नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या निघृणहत्येचे पडसाद रायगडमध्ये उमटायला सुरुवात झाली असून आज शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांचा या हत्येमागे हात असल्याचा आरोप करीत आरोपींना फाशीची शिक्षा आणि प्रमुख सुत्रधारांचा शोध घेण्याची मागणी यावेळी करीत शिवसैनिकांनी घटनेचा निषेध केला.

कृष्णा नदीत उडी मारून बुडणाऱ्याचा पोलिसाने वाचवला जीव

कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा प्रसंग सांगलीच्या ईश्वरपूर पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी दाखवून दिला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी कृष्णा नदीत उडी घेत एका वृद्धाचा प्राण वाचविल्याने परिसरात कौतुक होत आहे. तर हा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

पतीने दुसरे लग्न केले म्हणून पाच महिन्याच्या गरोदर विवाहित महिलेची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. २३ वर्षांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आयशा अरबाज शेख असे मृत विवाहितेचे नाव आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आजचा अमरावती दौरा रद्द

अमरावती महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात दुपारी नागपुर येथे शिवसेना शिंदे गट,भाजप, युवा स्वाभिमान संघटनेची होणार एकत्रित फायनल बैठक....

चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने अमरावतीच्या स्थानिक भाजप, शिंदे गट आणि युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना नागपूर मध्ये बैठकीसाठी बोलावलं...

महायुतीच्या जागा वाटपावर आजच तोडगा निघण्याची दाट शक्यता...

काल अमरावती मध्ये तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती भाजपाच्या नेत्यांसोबत बैठक मात्र तरी देखील तोडगा निघाला नाही

काँगेसच्या माजी महापौर शिला भवरे यांचा भाजपात प्रवेश

नांदेड महापालिकेच्या माजी महापौर शीला भवरे यांनी भाजपात प्रवेश केला.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शीला भवरे यांनी भाजपात प्रवेश केला.2014 साली त्या काँगेस कडून महापालिकेच्या महापौर होत्या.शीला भवरे यांचे पती माजी नगरसेवक यांनी देखील काँग्रेस सोडुन आता भाजपात प्रवेश केला. भवरे यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सलगच्या सुट्ट्या मुळे बसस्थानकात गर्दी

नाताळच्या सुट्ट्यांमुळे बसस्थानकात मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना सवलत मिळत असल्यामुळे प्रवाशांकडून एसटी प्रवासाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. सध्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस देखील हाऊसफुल्ल पाहिला मिळत आहे. मात्र खाजगी वाहनधारक अव्वाच्यासव्वा भाडे आकारात असल्यामुळे प्रवाशांकडून एसटी बसला पसंती दिली जात आहे.

कोल्हापूर - एमडी ड्रग्जचे रॅकेट उध्वस्त, चंदगडच्या तरुणाला अटक

महाराष्ट्रातील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने बंगळूर येथे धडक कारवाई करीत एमडी ड्रग्ज बनवणारे तीन कारखाने उद्ध्वस्त केले. सुमारे ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यत आली. या प्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना अटक झाली असून, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथील संशयित प्रशांत यलाप्पा पाटील याचा समावेश आहे.

संशयित अब्दुल कादर रशीद शेख (रा. वाशी, मुंबई), सुरेश रमेश यादव संघ मालाखान रामलाल बिष्णोई (दोघेही (राजस्थान) अशी अटक केलेल्या अन्य तिघांची नावे आहेत. अन्य दोघे पसार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके तैनात केल्याचे कारवाई पथकातील पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार यांनी आज सांगितले.

सिगारेट व दारूसाठी बार मालकाची हत्या, 24 तासाच्या आत तीन आरोपी जेलबंद.

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नायगाव शिवारात मध्यरात्री बी एन बार अँड रेस्टॉरंट या हॉटेल चालकाची धारदार शस्त्र, आणि लाटा काट्यांनी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी हॉटेल चालक गजानन कासले यांना दारू आणि सिगारेट मागितले, कासले यांनी बिल मागितल्यानंतर आरोपींनी अरेरावीची भाषा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, आणि यात आरोपींनी लाट्या काट्या यांनी कासले यांच्यावर हल्ला केला, बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेत बारमालक गजानन कासले यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

बुलढाण्यात महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात...

बुलढाण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनची सुरुवात मोठ्या थाटात संपन्न झाली, सुरुवातीला स्थानिक हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या वामनदाद कर्डक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात आली, त्यानंतर गर्दे सभागृहात साहित्य संमेलनास सुरुवात झाली शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचविणारे महाकवी वामनदादा कर्डक यांना वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी, आणि त्यांच्या साहित्यावर चिंतन मंथन करून साहित्याचा जागर व्हावा यासाठी बुलढाण्यात या दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे.. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याहस्ते आज संमेलनाचे उद्घाटन झाले, सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थानी आहेत...

श्री घृष्णेश्वराचे थेट गाभाऱ्यातील दर्शन बंद

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वराचे थेट गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आले आहे. वाढत्या गर्दीमुळे निर्णय प्रशासनाने निर्णय घेतल्याने आता शिवभक्तांना प्रवशेद्वारावर शिवलिंग दर्शन घ्यावे लागणार आहे. वेरूळचे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शनाची परंपरा शनिवारी दुपारपासून खंडित झाली. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेतला असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरच लिंगाची मूर्ती ठेवून दर्शनासाठी सोय केली आहे. श्री घृष्णेश्वर मंदिरात थेट गर्भगृहात (गाभाऱ्यात) जाऊन शिवलिंगावर डोके ठेवून, हात लावून दर्शन, अभिषेकाची अनेक वर्षांची परंपरा होती. महाशिवरात्री, श्रावण महिन्यांत गर्दी वाढली तरीही भाविकांना थेट दर्शन होते. सध्याही नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी आलेल्या भाविकांची श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी रांग लागत आहे. शनिवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी तीन ते चार तास लागत होते. मात्र, गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने दुपारी बारा वाजेपासून मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नाकारली आणि बाहेर प्रवेशद्वारावर सभामंडपासमोरच ज्योतिर्लिंग मूर्ती ठेवून बाहेरूनच दर्शन पद्धत सुरू केली. यानंतर भाविक दर्शन घेऊन लवकर बाहेर पडू लागले.

भुसावळ-दादर रेल्वे २७ फेब्रुवारीपर्यंत

जळगाव दादर-भुसावळ दरम्यान धावणारी विशेष रेल्वे फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यामुळे जळगाव व भुसावळच्या प्रवाशांची मोठी सोय होईल. दादर येथून दर शुक्रवारी धावणारी ०९०४९ क्रमांकाची दादर-भुसावळ विशेष रेल्वे आता २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ही रेल्वे दादर स्थानकावरून पहाटे १२ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी जळगाव स्थानकावर पोहोचते. याच गाडीची परतीची फेरी म्हणजेच ०९०५० क्रमांकाची भुसावळ-दादर रेल्वे २७फेब्रुवारीपर्यंत दर शुक्रवारी धावणार आहे. ही रेल्वे सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी जळगाव स्थानकावर येते. त्यानंतर मुंबईकडे रवाना होते.

पुण्यातील गांजवे चौकात दोन वाहनांमध्ये अपघात..

दोन मिनी बस मध्ये अपघात..

कारचालकाने अचानक रस्त्यात वाहन थांबवल्याने एक बस दुसऱ्या बस वर आढळली

या अपघातात बसचे नुकसान

बसमधील काही प्रवासी जखमी

प्रवासी आणि कार चालकामध्ये बाचाबाची..

अपघातामुळे वाहतुकी अडथळा

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

तिन्ही प्रमुख पक्ष ५०-५० जागा लढणार

पुणे महापालिका निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी जागा वाटपाचे सूत्र अखेर जवळपास निश्चित झाले

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत अजून भुमिका नाही.आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

बस चालकावर बस थांबवून भर रस्त्यात हल्ला

एका वाहन चालकाने भर रस्त्यात बस थांबवून बस चालकावर हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडलीय. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ठरलाय. या मारहाणीचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केलाय.

अमरावतीत महायुतीचे जागावाटप रखडले

-अमरावती येथील महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिंदे सेना व युवा स्वाभिमान पार्टी या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच पुन्हा रखडले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे राज्य निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत येणार आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.युतीचा आणी जागा वाटपचा मार्ग मोकळा करण्यासाठी खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज दुपारी १२ वाजता अमरावतीत येणार आहे. ४ वाजेपर्यंत महायुतीतल्या घटकपक्षांशी चर्चा करून जागा वाटपाला ते अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे. काही मार्ग निघाला नाही तर महायुती तुटण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. कोणताही एक निर्णय आज जाहीर होणार असल्याचे सांगितल्या जात आहे.

पुणे शहरात पुढचे पाच दिवस नाकाबंदीचे

दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहर पोलिसांकडून पुढील पाच दिवस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाणार

शहरात 31 डिसेंबरला रात्री वाहतूक नियमांची उल्लंघन होणार नाही या दृष्टीने आधीपासूनच कारवाई तीव्र वाढवण्याच्या सूचना

पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा उत्सव व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना

अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामतीत

देशातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असणार आहेत.गौतम अदानींच्या हस्ते बारामतीत निर्माण करण्यात शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स च उद्घाटन सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. यासाठी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांची उपस्थिती असणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

महापालिका सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले असून माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

खोपोली हत्या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्याकामी रायगड पोलिसांना यश

खोपोली हत्या प्रकरणी नऊ आरोपींना जेरबंद करण्याकामी रायगड पोलिसांना यश आले आहे. रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. रायगडच्या खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरदिवसा निघृणहत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी पोलिसांच्या हाती लागले असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे फरार आहेत. या घटनेचा CCTV फुटेज आता समोर आला असून यामुळे पुन्हा एकदा बिडच्या संतोष देशमुख हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे.

पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पुणे शहरातील 41 प्रभागांमध्ये असलेल्या 41 उमेदवारांचा प्रस्ताव दिला होता मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये ५०,५०,५० हा फॉर्म्युला आहे जिथे भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही तिथे आम्हाला स्थान दिलं जातं. महाविकास आघाडीच्या या खेळीला वंचित बहुजन आघाडी बळी पडणार नाही त्यामुळे सध्या तरी आमच्यात कुठलीही युती नाही असं स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी घेतली आहे

इंद्रायणी नदीवरिल कुंडमळा पुलाच्या कामाला अखेर मुहर्त, पूल पडल्याने चार पर्यटकांचा झाला होता मृत्यू 

मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे पंधरा जून रोजी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर सत्तावीस हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पुलाच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. त्या यादेशानुसार स्थानिक आमदार आणि खासदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आज अखेर कुंडमळा पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुलाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूल पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी १० ते १२ किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. आता नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुलभ होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही मोठी वाढ होणार आहे. पुलाचे काम सुरू होताच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आले आहे.

संकटे माणसाला घडवतात, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करायला शिकले पाहिजे - बानगुडे पाटील.

संकटांचे स्वागत करायला शिका, संकटे तुम्हाला घडवतात अनुकूल परिस्थिती तुमच्यातील गुण बाहेर पडतात तत्पर निर्णय घेणारी माणसेच यशस्वी होतात असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत ते बोलत होते. आपल्या मनातील सकारात्मक विचार हाच आपल्याला यशस्वी विषयावर घेऊन जातो. यशाचा धडा गिरवायला विचारांची पेरणी महत्त्वाची असते, ती पेरणी आत्ताच करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, एपीजे अब्दुल कलाम, यांनी परिस्थितीचा कधीच भाऊ केला नाही. त्यांनी परिस्थितीवर मात करून आयुष्याचं सोनं केलं. अशा मार्मिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांनी दिला.. यावेळी मावळे चे खासदार श्रीरंग बारणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास काकडे यास अनेक मान्यवर उपस्थित होते

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात तोबा गर्दी

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहे.. टायगर पॉईंट वरून लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य बघणे आणि येथील थंडगार हवेचा सुखद आनंद घेण्यासाठी टायगर पॉईंट वर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली आहे.. मुंबईसह राज्यातून आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने आल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र टायगर पॉईंट वर बघायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे नगरसेवक फोडण्याचा शिंदेंचा डाव, राऊतांचा खळबळजनक दावा

Famous Actress Wedding : लग्नघटिका समीप आली! हळद लागली, मेहंदी रंगली; प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई - PHOTOS

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे १९१०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

भाजपला मोठा धक्का, आमदाराचा राजकीय निवृत्तीचा निर्णय, धक्कादायक कारण दिले

Beach Camping : फ्रेंड्स सोबत या वीकेंडला करा बीच कॅम्पिंगचा प्लान, लोकेशन आताच नोट करा

SCROLL FOR NEXT