Maharashtra Live News Update Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, अवकाळी पाऊस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

▪️ बीएमसी पी नॉर्थ विभाग आणि कलेक्टर कार्यालयाची संयुक्त कारवाई

▪️ २३ अनधिकृत गोदामे जमीनदोस्त

▪️ सुमारे २५ हजार चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त

▪️ शूटिंग व लग्नसमारंभाचे साहित्य ठेवण्यासाठी बांधलेली गोदामे

▪️ २ जेसीबी, १६ अधिकारी आणि ३० कामगारांचा सहभाग

▪️ अवैध बांधकाम खपवून घेतले जाणार नसल्याचा डीएमसी भाग्यश्री कापसे यांचा इशारा

beed : संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा सुप्रीम कोर्टातही जामीन फेटाळला

- वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात केला होता अर्ज.

- सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज फेटाळल्याने पुढील एक वर्षासाठी वाल्मीक कराड जेलमध्येच असणार.

- वाल्मीक कराडला एक वर्षानंतर नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

beed : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टवरून नवा वाद; धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया

संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे..आरोपी वाल्मीक कराडच्या मुलाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र या पोस्टवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा! कोणाच्या आश्रयाने ही हिंमत आली? कोण दिली ताकद?” असा थेट सवाल त्यांनी केला. न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज करण्याची भाषा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. बेल अर्जापासूनच मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात होते, असा टोला लगावत त्यांनी पोस्टचा समाचार घेतला आहे

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची गर्दी झाली आहे.

होळीनिमित्त मिळालेल्या सुट्ट्यामुळे आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे पुणे रेल्वे स्थानकावरून बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी अतिरिक्त होळी विशेष गाड्या सोडल्या.

पुण्याहून नागपूर,दानापूर,गाझीपुर गोरखपुर दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे.

मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

▪️ बीएमसी पी नॉर्थ विभाग आणि कलेक्टर कार्यालयाची संयुक्त कारवाई

▪️ २३ अनधिकृत गोदामे जमीनदोस्त

▪️ सुमारे २५ हजार चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त

▪️ शूटिंग व लग्नसमारंभाचे साहित्य ठेवण्यासाठी बांधलेली गोदामे

▪️ २ जेसीबी, १६ अधिकारी आणि ३० कामगारांचा सहभाग

▪️ अवैध बांधकाम खपवून घेतले जाणार नसल्याचा डीएमसी भाग्यश्री कापसे यांचा इशारा

रंजना आडे महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी

यवतमाळच्या महागाव नगरपंचायतीमध्ये राजकीय घडामोडीनंतर नगरपंचायतीच्या कार्यालयात प्रभारी मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका रंजना आडे यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाचे शाखा उर्फ प्रमोद भरवाडे यांची निवड करण्यात आली. नगरपंचायतीवर काँग्रेसच्या सुनंदा कोपरकर या नगराध्यक्ष म्हणून विराजमान असताना नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करित असल्याने सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता याचा फटका अखेर अविश्वास ठरावा पर्यंत पोहोचून कोपरकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील शाळेत विद्यार्थींमध्ये गँगवार

नववीमध्ये शिकणाऱ्या मुलाने आठवीतल्या दोन मुलांवर केला प्राणघातक हल्ला

हल्लात दोन विद्यार्थी जखमी

नववीच्या वर्गात मित्रांची भांडण सोडवायला गेलेल्या दोन विद्यार्थींवर प्राणघातक हल्ला केला

दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी असुन एक विद्यार्थींच्या श्वास नलीकेत गंभीर जखम झालीय

जखमी मुलाच्या मामा तक्रारीवरुन आळेफाटा पोलीसांत गुन्हा दाखल

सातपुड्याच्या कुशीत आदिवासी संस्कृतीचा लोकोत्सव;

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले बोराडी गाव सध्या आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले असून, येथे होळीनिमित्त भरणारा पारंपारिक 'भोंगऱ्या' बाजार मोठ्या उत्साहात व वाजत-गाजत पार पडला आहे, दांडी पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात 'गुलाल बाजारा'नंतर येणारा हा मुख्य आठवडा बाजार आदिवासी बांधवांसाठी पर्वणीच ठरला आहे, ज्यात सुमारे 50 पाड्यांवरील 25 हजारांहून अधिक समाजबांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत हजेरी लावली आहे,

फलटण तालुक्यातील विडणी येथे रानगव्याचा धुमाकूळ; एक जण गंभीर जखमी

-फलटण तालुक्यातील विडणी येथील कोकरेवाडी परिसरात जंगली रानगव्याने वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विडणी येथे कोकरेवाडी परिसरात अचानक घुसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली यादरम्यान राजेंद्र जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.या घटनेनंतर संपूर्ण कोकरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वन विभागाकडून रानगव्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून या भागात रानगाव याला पकडण्यासाठी विशेष म्हणून राबवली जात आहे

नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

- 'आम्हाला न्याय द्या' म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्या घोषणा

- कांद्याला भाव द्या अशा आशयाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी

- हातात बॅनर घेऊन ताफा जातांना कांदा उत्पादकांनी लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न

- गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आहेत आक्रमक

- शेतकऱ्यांमध्ये बच्चू कडुंच्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश

- विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर

त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्यसरकारकडून ५० लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवस्थान ट्रस्टला ५० लाखांचा धनादेश प्रदान

नांदेडमधील महापलिकेच्या सफाई कामगारांचे आज काम बंद आंदोलन

नांदेड महापलिकेच्या सफाई कामगारांनी आज काम बंद आंदोलन केले.कामावरून कमी केल्याने महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार आक्रमक झाले आहे. शुक्रवारी शेकडो सफाई कामगारांनी काम बंद करत महापालिका कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. शहरातील घनकचरा संकलन करण्याचे काम अमृत इंटर प्राइजेस कंपनीकडे आहे. कंपनीने कोणतीच सूचना न देता अनेक कामगारांना कामावरून काढले आहे. तात्काळ कामगारांना कामावर घेण्यात यावे, थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुण्यात बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर

परिसरात बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाक्याचा आवाज काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या 61 बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली. अशा रोड रोमियोंवर जरब बसावी यासाठी बुलेटचे सायलेन्सर काढून पोलिसांनी त्यावर सर्वांसमक्ष रोड रोलर फिरवला. चंदन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या शांतता कमिटी सदस्यांसमोर सायलेन्सर वरून रोड रोलर फिरवण्यात आला. विमानतळ पोलिस आणि चंदन नगर पोलिसांनी त्यांच्या हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबवून अशा बुलेट चालकांना ताब्यात घेतले होते. बुलेट चालक फटाक्यांचा आवाज काढून नागरिकांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक पोलिसांकडे करीत होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

कोल्हापूरमध्ये महापौरांचा झाडू हातात; “माझं शहर माझी जबाबदारी” स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आता महापौर स्वतः मैदानात उतरल्या आहेत. महापौर रूपाराणी निकम यांनी झाडू हातात घेत शहराच्या प्रवेशद्वारावरून “माझं शहर माझी जबाबदारी” या विशेष स्वच्छता मोहिमेची जोरदार सुरुवात केली. तब्बल दहा वर्षांनंतर कोल्हापूरला महापौर मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्याच उपक्रमातून स्वच्छतेचा ध्यास घेतल्याचे दिसून येत आहे.

कर्जत रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्रातील पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान उतारावरून नियंत्रण सुटलेली मालगाडी खाली धावल्याने मोठा अनर्थ होणार होता. मात्र सुदैवाने असे काही झाले नाही. या घटनेनंतर मध्य रेल्वेने तपास सुरू केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. सूत्रांनी सांगितले की ही मालगाडी मालवाहतूक करत होती आणि ती उतारावरून अचानक धावू लागली. या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवणाऱ्यांमध्ये प्रशिक्षणार्थी लोको पायलट्सचाही समावेश होता आणि गाडी उतारावर जात असताना ते तिला योग्य प्रकारे नियंत्रणात ठेवू शकले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, या प्रकरणाचे नेमके कारण आणि त्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एक्स-रे रूममध्ये सीसीटीव्हीचा संशय

चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात असलेल्या सचिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे काढताना एका महिला रुग्णाला कपडे काढण्यास सांगितल्याने आणि त्याच खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचा संशय निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे. याची विचारणा महिला रुग्णाने केल्यावर टाळाटाळीची उत्तरे मिळाली. त्यामुळे संबंधित महिलेने दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी डॉ. सचिन विश्वंभर याच्याविरुद्ध भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

जालन्यात 51 रुपयात साडीची ऑफर , दुकानासमोर महिलांची गर्दी..

जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील एका कापड दुकानदाराने 51 रुपयात साडीची ऑफर ठेवल्याने महिलांनी दुकानासमोर साडी खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीचे नियोजना न करता या दुकानदाराने ऑफर ठेवल्याने पोलिसांनी या दुकानदाराला समज दिली आहे. जालना शहरातील जुन्या मोंढा परिसरातील एका कापड दुकानदाराने 51 महिलांना 51 रुपयात साडी देणार असल्याची ऑफर ठेवली होती.त्यामुळे दुकानासमोर महिलांची गर्दी झाली मात्र गर्दीच नियोजन न केल्यामुळे पोलिसांनी या दुकानदाराला चांगलीच समज दिली आहे.दरम्यान समज दिल्यानंतर या दुकानदाराने आपण ऑफर बंद करणार असल्याच पोलिसांना सांगितल.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तीन संशयीतांचा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट चा रिपोर्ट तपासी अधिकाऱ्यांच्या हाती– सूत्र

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला गती आली असून या प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आली आहे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी याच हत्या प्रकरणातील तीन संशयीतांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आली होती मात्र याचा रिपोर्ट आता तपासी अधिकाऱ्यांच्या हाती आला असून यामधील एक संशयित आरोपी चार टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे

अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञात आजाराचा कहर; 15 दिवसात दगावल्या 26 गाई

पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ, तसेच हिवरे बाजार परिसरात संकरीत गाईनां अज्ञात आजाराची लागण होत असून गेल्या 15 दिवसात 26 गाई दगावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. गाईंना होणारा हा रोग नेमका कोणता आणि हा आजार खाद्यातून होत आहे की अन्य संक्रमणामुळे असा पेच पशु संवर्धन विभागासमोर उभा राहिला आहे.

वाशिममध्ये मधमाशांच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार तर सहा बकऱ्या जखमी

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा शेत शिवारात शेतात काम करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर असून, या मधमाशांच्या हल्ल्यात दोन शेळया ठार झाल्या आहेत, तर एक वासरू आणि सहा बकऱ्या सुद्धा या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.. या हल्ल्यात पांडुरंग ढोबळे व त्यांच्या पत्नी यांच्यावर सुद्धा मधमाशांनी हल्ला चढताच त्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. तर दोन शेळया मृत्युमुखी पडल्यामुळे शेतकऱ्याच नुकसान झाल आहे.

लातूरमध्ये शिक्षक आमदाराच्या दोन्ही परीक्षा केंद्रावर नियमांची पायमल्ली, 10 वी च्या परीक्षा केंद्रावर CCTV च नाही

लातूर मधून एक धक्का दायक बाब समोर आली आहे, लातूर तालुक्यातल्या जोडजवळा येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क सीसीटीव्ही कॅमेरा न बसवताच, विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान परीक्षापूर्वीच बोर्डाने परीक्षा केंद्रावर कॉफी सारखे गैरकृत्य होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे , तर परीक्षा काळातील चित्रीकरण जतन करण्याचे आदेशही संबंधित परीक्षा केंद्रांना देण्यात आली आहेत, मात्र असे असतानाही लातूरच्या जोड जवळ येतील समता विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कसलेही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत.

दरम्यान ही संस्था राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांची आहे, आमदार विक्रम काळे या संस्थेचे सचिव आहेत. त्यामुळे बोर्डाचे नियम डावलून राजरोसपणे सुरू असणाऱ्या या परीक्षा केंद्रावर काय कारवाई केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण असल्याने औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

तीन मार्चला खग्रास चंद्रग्रहण असल्याने देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे मंदिर समिती व पुजाऱ्यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याची सूचना दिली आहे, खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी प्रभू शिवशंकराला पांढऱ्या शुभ्र वस्त्राने झाकण्यात येणार आहे दरम्यान तीन मार्चला दुपारी तीन वाजून वीस मिनिटापासून ते सायंकाळी 6: वाजून 48 मिनिटापर्यंत औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे गृहन स्पर्श झाल्यानंतर ग्रहण समाप्ती पर्यंत जप आदी कार्य पार पाडण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

जालन्यात कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

जालना शहरातील एका कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारींचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. जालना येथील सदर बाजार पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.या प्रकरणी मनीष निहलानी या कापड दुकानदाराच्या विरोधात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरातील महावीर चौक परिसरातील एका कापड दुकानात मोठ्या प्रमाणावर तलवारींचा साठा असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. दरम्यान या कापड व्यावसायिकाने तलवारी नेमकी कशासाठी आणल्या होत्या याचा तपास पोलीस करत आहे.

औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

तीन मार्चला खग्रास चंद्रग्रहण असल्याने देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे मंदिर समिती व पुजाऱ्यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याची सूचना दिली आहे, खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी प्रभू शिवशंकराला पांढऱ्या शुभ्र वस्त्राने झाकण्यात येणार आहे दरम्यान तीन मार्चला दुपारी तीन वाजून वीस मिनिटापासून ते सायंकाळी 6: वाजून 48 मिनिटापर्यंत औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे गृहन स्पर्श झाल्यानंतर ग्रहण समाप्ती पर्यंत जप आदी कार्य पार पाडण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या अपघाताप्रकणी आज DGCA चा रिपोर्ट येणार

आज सायंकाळपर्यंत डीजीसीए रिपोर्ट येणार

सायंकाळपर्यंत हा अहवाल प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला; आज सायंकाळी होणार स्पष्ट

आज सायंकाळी अहवाल आल्यानंतर अपघाताचे नेमके तांत्रिक कारण होणार स्पष्ट

ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट मधील संभाषणाविषयी देखील मोठी माहीती अहवालात असण्याची शक्यता

28 तारखेपूर्वी रिपोर्ट येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काहीदिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येणार

पिंपरी चिंचवडमध्ये माथेफिरू व्यक्तीकडून कारची तोडफोड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील स्काय मानसलेक सोसायटीमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने थार कारची तोडफोड केली आहे. माथेफिरू व्यक्ती कारची तोडफोड करत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये काय झाली आहेत. 23 फेब्रुवारीला रात्री 11:30 वाजता दरम्यान ही घटना घडली आहे . या प्रकरणात तक्रारदार रोहन जगदीश पिसाळ यानी बावधन पोलीस स्टेशन मध्ये अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

कुसुमाग्रज उद्यानात मनसैनिक करणार आंदोलन

कुसुमाग्रज उद्यानात मनसैनिक करणार आंदोलन

उद्यानातील वृक्षांची कत्तल सुरू

तर कुसुमाग्रज यांच्या कवितांचे कोनशिला देखील तोडल्याने संताप

आज कुसुमाग्रज जयंती असताना उद्यानाची मात्र दुरावस्था

उद्यानाची दुरावस्था आणि कोनशिलांची तोडफोड झाल्यानं मनसे आक्रमक

४०० कोटी रुपयांच्या कथित प्रकरणात मोठी घडामोड

४०० कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणाचा सीआयडी तपास करणार

नाशिक पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टवरच मोठा संशय

नाशिक पोलिसांनी तक्रारदाराने खोटी तक्रार केल्याचा केला होता दावा

तर नाशिक पोलिसांच्या तपासावर तक्रारदारानेच केले होते गंभीर आरोप

सीआयडीकडून या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार

महापालिकेने केला स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल

महापालिकेने केला स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल

राज्यात पहिल्यांदाच घडली घटना

महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचे मनपा अधिकाऱ्यांच्या आले. आदर्शनास

4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी खोदकाम न करण्याचे स्मार्ट सिटी प्रशासनाला दिले होते आदेश

आदेश डावलून खोदकाम केल्याने महापालिका प्रशासनाने केला स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल

स्मार्ट सिटी विरोधात पालिकेने गुन्हा दाखल करण्याची पहिलीच घटना

3 जेसीबी लावून गंगापूर रोड परिसरात केबल टाकण्यासाठी सुरू होते खोदकाम

गुन्हा दाखल झाल्याने स्मार्ट सिटी अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

उल्हासनगरमध्ये मराठी राज भाषा दिन साजरा

उल्हासनगर युवा प्रबोधिनी यांच्या वतीने आज उल्हासनगर मधील यशवंत विद्यालयात मराठी राज भाषा दिन साजरा करण्यात आला,मराठी भाषेचा दर्जा वाढवा,मराठी भाषेचा गोडवा, प्रेम, आपुलकी वाढावी या निमित्त विद्यार्थ्यांनसाठी स्वरचित मराठी कविता स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले, या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवरील विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. राजस्थानी नगरसेवक इंदिरा पाटील, संगीता सपकाळे या शालेय मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या

पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकातील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा आहे. कात्रजच्या नवले पुलावर जसे अपघात होतात, तसे इथं अपघात होऊन अनेक निष्पापांचे बळी जाऊ शकतात. अशा प्रसंगी आर्किटेक्टवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा संताप शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी व्यक्त केला. पिंपरी पालिकेचे अधिकारी, इंजिनीअर आणि आर्किटेक्टच्या उपस्थितीत बारणेंनी कानउघाडणी केली. पुलाचे तीव्र उतार अपघाताला आमंत्रण देणारे ठरणार आहेत, त्यामुळं पुलाची लांबी वाढवावी. बारणेंनी या त्रुटी दाखवत पालिकेच्या इंजिनीअर आणि आर्किटेक्टला धारेवर धरलं.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उभारले पुस्तकांचे झाड

वाशिमच्या कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तरुण संपादक मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि भावविश्व यांचा जागर शाळेच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला.या विशेष दिनानिमित्त शाळेच्या परिसरात ‘पुस्तकांचे झाड’ हा आगळावेगळा आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. झाडांच्या फांद्यांना विविध मराठी पुस्तके बांधून ज्ञानाची फुले आणि विचारांची फळे जणू प्रत्यक्ष फुललेली दिसत होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीची गोडी निर्माण होऊन मराठी भाषेशी त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.

Bacchu Kadu: बालमजुरीवर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर विटा ठेवू, बच्चू कडू यांचा इशारा

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी आणि मेळघाटातील समस्या पुढे आणण्यासाठी एक मार्च ते नऊ मार्च पर्यंत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पायी यात्रेचा आयोजन केला आहे. त्यापूर्वी बच्चू कडू यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या पोस्ट मधून बच्चू कडू यांनी मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तव दाखवला आहे. ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तक असायला हवी होती त्या वयात मुलांच्या डोक्यावर विटा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे यात्रेपूर्वी बच्चू कडू यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील मेळघाटातील अनेक गावांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी या प्राथमिक गरजांपासून आजही येथील नागरिक वंचित आहेत. याहूनही मन सुन्न करणारी बाब म्हणजे ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत, स्वप्नं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात हीच लेकरं विटभट्ट्यांवर कष्ट करताना दिसत आहेत. मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रा प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेली ही दृश्यं केवळ हृदयद्रावक नाहीत, तर आपल्या विकासाच्या दाव्यांवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. ही केवळ काही मुलांची कथा नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान बालमजुरी वर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर याच विटा जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर ठेव असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Chiplun: चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोकण विभागीय काँग्रेस

चिपळूण येथील धवल प्लाझा येथे शिबिराचं आयोजन

उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली तयारी पूर्ण

तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात संघटनात्मक कामकाज व पक्षाच्या धोरणांवर मार्गदर्शन केले जाणार

Nashik: मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमधून ग्रंथ दिंडी

मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमधून ग्रंथ दिंडी

महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे करण्यात आले पूजन

ग्रंथ दिंडीसाठी विविध मान्यवर उपस्थित

ग्रंथ दिंडीत पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी आणि नागरिक सहभागी

ढोल ताशांच्या गजरात निघाली ग्रंथ दिंडी

हातात काळ मृदुंग घेत वारकरी आणि विठ्ठलाच्या वेशभूषेत बाळ गोपाळ देखील ग्रंथ दिंडीत सहभागी

Pune: पुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा

पुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा

बांधकामामधून धूळ मोठ्या प्रमाणावर येत असेल आणि जर उपाय योजना केल्या नाहीत तर होणार कारवाई

पुणे महापालिकेकडून पाठवण्यात येत येणार नोटिसा

पुण्यात हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढल आहे

महापालिका आयुक्त यांचा थेट कारवाई करण्याचा इशारा

अनेक बांधकाम व्यावसायिक धूळ रोखण्यासाठी उपाय योजना करत नसल्याचं समोर

Columbia: कोलंबियातील निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची निवड

सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. कोलंबिया देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय शिष्ट मंडळ 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान कोलंबियांमध्ये असणार आहे. ८ मार्च रोजी कोलंबियांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जागतिक स्तरावर निवडणूक व्यवस्थापनातील पद्धतीचे परीक्षण करण्यासाठी हे पाच सदस्यीय शिष्टमंडळ जाणार आहे.

Purandar: किल्ले पुरंदर परिसरात 4 मार्च रोजी प्रवेशबंदी

किल्ले पुरंदर परिसरात 4 मार्च रोजी प्रवेशबंदी

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदरवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची होते गर्दी

अनियंत्रित गर्दीमुळे नैसर्गिक संपत्तीला आणि पोचू नये आणि सुरक्षा व्यवस्थेवर्तन येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 4 मार्च रोजी किल्ले पुरंदर परिसरात प्रवेश बंदी

या दिवशी बेकायदेशीररित्या किल्ले परिसरात कोणी आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार

नागरिक आणि पर्यटकांनी सूचनांचं पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pandharpur: पंढरपूर नगरपालिकेकडे साडे सहा कोटी रूपयांची थकबाकी

पंढरपूर नगरपालिकडे जलसंपदा विभागाची साडेसहा कोटी रूपयांची थकबाकी आहे.थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने तगादा लावला आहे. येत्या सात दिवसांत थकबाकी भरा अन्यथा पाणी पुरवठा बंद केला जाईल अशी नोटीस दिली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पंढरपूरकरांवर पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

पालिकेने तत्काळ पाणी भरून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विक्रम शिरसाट यांनी केली आहे. दरम्यान आज होणाऱ्या पालिकेच्या जनरल मिटींगमध्ये पाणी पाणी प्रश्नावरून नगराध्यक्ष प्रणिता भालके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला‌ जाण्याची शक्यता आहे.

नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल

नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिका कडून गंभीर दखल

विद्युत अभियंता अभिजित पवार यांचे निलंबन

विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण झाल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर शहरात त्याचे पडसाद उमटले होते

विभाग प्रमुख म्हणून अत्यंत बेजबदार वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.

उमरगा व लोहारा तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा

धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच मोठ नुकसान झाल होत यामध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील तब्बल ३८ हजार शेतकऱ्यांचे ४१ कोटी रुपये अनुदान हे रखडले होते.अखेर या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.ऐन हंगामात खात्यात पैसे जमा होवु लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.२०२४ मध्ये दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी होवुनही प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव नाकारला होता त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर याला यश आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sangamner: संगमनेरमध्ये लाँगमार्चचा आज चौथा दिवस

राजुर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस असून आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला आहे.. संगमनेर तालुक्यातील निझर्नेश्वर या ठिकाणी आंदोलक मुक्कामी होते.. आज या ठिकाणाहून हे लाल वादळ थेट पालकमंत्री विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे कुच करणार आहे.. मात्र त्यापूर्वी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला असून शिष्टमंडळाबरोबर अधिकारी चर्चा करणार आहेत.. चर्चेनंतरच नेमकं या आंदोलनात तोडगा निघतो की आंदोलन पुढच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार हे स्पष्ट होईल..

Nashik: कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पण त्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन

दुपारी मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ आणि अन्य मंत्री उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित

थोड्याच वेळात कुसुमाग्रज प्रतिष्ठान पासून ग्रंथदिंडीला होणार सुरुवात

देश-विदेशातील मराठी भाषिक संमेलनात होणार सहभाग

नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात संमेलनासाठी भव्य मंडपाची उभारणी

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड १३ मार्चला

जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड २० मार्च आत करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.या निवडीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी १३ मार्च ही बैठकीची तारीख निश्चित केली आहे.तर आठ पंचायत समिती सभापती,उपसभापती निवडी सहा मार्चला होणार आहे.त्यासाठी आठ पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Barshi: बार्शी तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी

बार्शी तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी.

बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील प्रकार.

पुण्यातून आलेल्या तीन ते चार युवकांनी एक जणाला बेदम मारहाण करत केला गोळीबार

मारहाण केल्यानंतर तीन ते चार युवक पुण्याच्या दिशेने झाले फरार..

सदर जखमी युवकाला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात केलं भरती

बार्शी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल..

Pune: पुणे ते बँकॉक विमान सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद

पुणे ते बँकॉक विमान सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद असणार

उन्हाळी वेळापत्रकात पुणे बँकॉक आणि बँकॉक टू पुणे दोन्ही उड्डाणे तात्पुरती बंद

29 मार्च 2026 पासून सुरू होत आहे उन्हाळी वेळापत्रक त्यात दोन्ही सेवा बंद करण्यात आल्याची माहिती

इंडिको विमान कंपनीने ही सेवा बंद केल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासाला याचा फटका बसणार आहे

Pune: ई समर्थ पोर्टलमुळे थांबलेला निधी पुणे जिल्ह्यातील आमदारांना अर्थ खात्याकडून मंजूर

ई समर्थ पोर्टलमुळे थांबलेला निधी पुणे जिल्ह्यातील आमदारांना अर्थ खात्याकडून मंजूर

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीची फाईल अखेर आर्थिक त्यांनी मंजूर केली आहे

पुणे जिल्ह्यातील 24 आमदारांना आता स्थानिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

पुणे जिल्ह्यात ई समर्थ पोर्टल द्वारे निधी देण्याचा प्रायोगिक प्रयोग करण्यात येत आहे त्यामुळे हा निधी थांबला होता

पहिल्या टप्प्यात अर्थ खात्याने 50 कोटीचा निधीही ई समर्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे

बुलढाण्यात थरारक घटना; सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह जाळला...

जिल्ह्यातील राहुड येथे सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशन संजय इंगळे, वय 36, याने खामगावातील रवी देवीदास राऊत यांच्या मदतीने धाकटा भाऊ चेतन इंगळे, वय 35, याचा खून केल्याची कबुली दिली आहे. २५ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकडांवर जाळून राख व अस्थी नदीत फेकण्यात आल्या. चेतन बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे...या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत...

मावळच्या तळेगाव दाभाडे येथील सिल्वर विंग अपार्टमेंट परिसरात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती.

पुणे स्टेशनवर ४ नवीन लिफ्ट सुरू,  आता जिने चढण्याचं टेन्शन मिटलं

प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या चार नवीन लिफ्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना फलाटवर ये-जा करणे आता अधिक सोयीचे झाल

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित शुल्क भरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक वाहनधारकांनी दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असून अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.

पुण्यात जुन्या वाहनांना प्रवेश बंदी ? राज्य सरकारकडे प्रस्ताव,सात लाखांहून अधिक वाहनांना लागणार ब्रेक

शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन मोठा निर्णय घेणार आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना पुण्यात प्रवेश बंदी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविणार आहेत.त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांना पुण्यात धावता येणार नाही.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुण्यात सहा लाख ८३ हजार ४११ खासगी संवर्गातील, तर ४६ हजार २८४ परिवहन संवर्गातील वाहनांचे आयुर्मान १५ वर्षांहून अधिक आहे. यात सर्वाधिक दुचाकी आहेत. दुचाकींची संख्या पाच लाख १२ हजार ५७५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शुद्धीकरण तर कोणाला लग्नाचं आमिष'; अशोक खरात लैंगिक अत्याचारासाठी वापरायचा वेगवेगळ्या क्लृप्त्या; ५ वा गुन्हा दाखल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: वसंत मोरे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला

Viral: नारंगी केसाच्या मूर्ख माणसाने...! गॅस टंचाईवर पुण्यातील हॉटेलने लावलेली नोटीस व्हायरल

Hidden Beach In konkan : कोकणात गर्दीपासून दूर लपलेले निसर्गसौंदर्य, 'हा' समुद्रकिनारा उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT