भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान दादा भुसे यांनी परेड निरीक्षण केले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दनपंत बोथे याना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला
वर्धा येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात प्रजासत्ताक ध्वजारोहण सोहळा
पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण
पालकमंत्री पंकज भोयर यांनी केले परेडचे निरीक्षण
जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जालना येथे पोलीस कवायत मैदानावर जालन्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला. यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदार जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांच्यासह जिल्हा प्रशासनातले सर्व कर्मचारी उपस्थित होते...
देशाचा 77 व्या प्रजाकसत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा...
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.....
राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या जनकल्याण योजनेची माहिती देत जिल्हावासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात....
येणाऱ्या काळात गोरगरीब वंचित पीडित लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असून पोलीस दल देखील सर्वसामान्य जनतेच्या बरोबरीने उभी राहणार.....
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवार कोट्यातील या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना ध्वजारोहणाचा मान...
मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडच्या मुख्यालयी झेंडा वंदान
अलिबाग येथील पोलिस परेड ग्राऊंडवर झाले ध्वजवंदन
भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिवस निमित्ताने ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात झेंडावंदवासाठी उपस्थित
ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती..
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजप आ. संजय केळकर माजी आ.रविंद्र फाटक यांची उपस्थिती..
शासकीय ध्वजारोहण, दरम्यान पोलिस करणार पथसंचलन
शासकीय कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन केला जाणार आहे सत्कार....
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण
पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पथसंचलन
पुणे पोलिस अंतर्गत येणाऱ्या विविध दलाचे पथसंचलन
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर मधील व स्थानकाला अचानक भेट देत व स्थानक परिसर व स्वच्छतागृहाची पाहणी केली.सरनाईक यांनी केलेल्या पाहणी दरम्यान बस स्थानकात अस्वच्छता दिसल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक हे चांगले संतापले होते.तुळजापूरचे बस स्थानक हे महत्त्वाचे असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा भावी याच बस स्थानकावर येतो म्हणून इथली अस्वच्छता खपवून घेणार नसल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी या ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.
महापौर निवड, गट नेते पदासाठी भाजपची पुण्यात बैठक
27 जानेवारी रोजी पुण्यात भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक
पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक
27 तारखेला भाजपच्या बैठकीत ठरवण्यात येणार भारतीय जनता पक्षाचा गटनेता
पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपची सर्व नगरसेवकांसोबत 27 तारखेला पुण्यात बैठक
याच दिवशी भाजपचा पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यात येणार
पुण्यात भाजपच्या 119 नगरसेवकांचा विजय
निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत स्थानिक नेते घेणार बैठक
6 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत बसणार भाजपचा महापौर
अमरावती शहरात अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.नागपूर–अमरावती एक्सप्रेस हायवे लगत वडाळी सर्व्हिस रोड परिसरात सापळा रचून एका तरुणास ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपीकडून ८ किलो १०५ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹१,६२,१००) तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण ₹१,७२,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बारामतीचा पैलवान यश सुरेश देवकर याने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यशने आपल्या आक्रमक आणि दमदार पवित्राचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्याला थेट 0–10 अशा फरकाने पराभूत केले. या दणदणीत विजयासह त्याने भारताच्या संघासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकून देशाचे वर्चस्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केले.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच यशने आक्रमक कुस्त्यांची मालिका सुरू ठेवत प्रत्येक लढतीत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला गेला. या यशामुळे यशने केवळ देशाचेच नव्हे, तर आपल्या आई-वडिलांचे आणि बारामतीचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल यश देवकरचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिल्लीत राष्ट्रपतीच्या हस्ते होणार ध्वजारोहण
विजय चौक ते लाल किल्ला अशी असणार परेड
कर्तव्यपथावरची परेड दीड तास चालणार
आज देशभरात 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे विठुरायालाही तिरंग्याचे उपरण परिधान करण्यात आले आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे . या सजावटीसाठी गुलाब, आस्टर झेंडू ,मोगरा ,जरबेरा ,ऑर्किड अशा विविध फुलांनी मंदिर सजवले आहे. यासाठी सुमारे दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
BCCI चे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे निधन झाले आहे.वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होती. आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ओव्हरलोडींग मुळे भीषण अपघात झाल्याने परभणी औंढा राज्यमार्गावर मोठी वाहतूक खोळंबली आहे, एसटी महामंडळाच्या बसेस देखील या अपघातामुळे रस्त्यावर अडकून पडल्या होत्या तर औंढा नागनाथ कडे दर्शनासाठी येणारे भाविक एक ते दीड तास रस्त्यावर ताटकळत थांबले होते, सध्या शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू आहे आणि हा ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून कारखान्याकडे घेऊन जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे मात्र ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्या जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे दरम्यान याकडे आरटीओ विभागासह वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिक करत आहेत.
राज्यासह देशात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे नंदुरबार रेल्वे स्थानकाला प्रजासत्ताकदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्याची प्रतिकृती पाहण्यास मिळत आहे. रेल्वे स्थानक परिसरात तिरंगी रोषणाई मनमोहक दिसत असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ठाणे, कल्याण मध्ये कार्यकर्त्यांची शिवसेने बरोबर युती झाल्यामुळे परवड झाली अशी खंत भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. युती झाल्यामुळें वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.भाजप ला जर खुली दिली असती तर भाजपाचा सर्व ठिकाणी महापौर सगळीकडे बसला अशी भावना व्यक्त करून ठाण्यात येऊन सेनेला नाईक यांनी डिवचले आहे. भाजपाने परवानगी दिली तर यांचा नामोनिशाण संपवेन असे आवाहन देखील गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन दिले आहे.
नागपूर महापालिकेतील भाजपच्या १०२ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी मंगळवारला होणार, २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे होण्याची शक्यता.
गटनोंदणीसोबतच महापालिकेतील सत्तापक्ष नेत्याचे नाव निश्चित होणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे सभागृहातील महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार यासाठी एक मताने निर्णय घेणार.
महापौर, सत्तापक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि परिवहन सभापती ही पदे महत्त्वाची.
महापौरपद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार; त्याआधी सत्तापक्ष नेत्याची निवड अपेक्षित.
सत्तापक्ष नेत्यावर सभागृह संचालन आणि नगरसेवकांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी.
महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. उपमहापौरपदावर पुरुष नगरसेवकाची शक्यता.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ, पुणे येथे शिक्षण घेत असलेला फुटबॉलपटू करण नितिन भुतकर याची महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प महादेवा या ग्रासरूट्स फुटबॉल विकास योजनेसाठी निवड
टायगर्स कंबाईन या क्लबमध्ये त्याने वडील नितिन भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचे धडे गिरवले आहेत.
सध्या तो स्पोर्ट्स मेनिया क्लबमध्ये सराव करत आहे
प्रोजेक्ट महादेवा हा उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या वतीने एमआयटीआरए, सिडको आणि वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोशिएशन (डब्ल्यूआयएफए) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे
१४ वर्षांखालील मुलांमधील फुटबॉल कौशल्य शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.
या प्रकल्पांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून ३० मुले व ३० मुली यांची निवड करण्यात आली आहे
निवड झालेल्या खेळाडूंना ५ वर्षांची पूर्ण शिष्यवृत्ती दिली जाणार
रायगडच्या खालापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद मतदार संघातून परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष बैलमारे यांची ताकद वाढली असून नाराज असलेले सुरेश पाटील यांची सुनील तटकरे यांनी नाराजगी दूर केलीय. तर दुसरीकडे याच मतदार संघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार उत्तम भोईर यांनी देखील माघार घेत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविलाय.त्यामुळे युती झालेल्या ठाकरे सेना आणि अजित
दिल्ली -
प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी एकूण ३० चित्ररथ कर्तव्य पथावर निघतील
यापैकी १७ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आणि १३ मंत्रालयांच्या असतील
प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिया गेटजवळील कर्तव्य पथावर एका शानदार परेडचे आयोजन केले जाते
यावेळी वंदे मारतम च्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्या साधले जाणार आहे
कर्तव्य पथकावर भारतीय लष्कराची ताकद पाहायला मिळेल
यावेळी वंदे मारतमचे महत्व अधोरिखित केले जाईल
आज ७७ वा प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधान स्वीकारले
याच दिवशी संविधान भारतात लागू करण्यात आले
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.