Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अन् जागावाटप, महापालिका निवडणुका अपडेट्स, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Pune: शिवसेना नेत्याच्या घराच्या बाहेर ड्रोनच्या गिरट्या

10.30 च्या सुमारास प्रभाग क्र 26चे शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार चंदन साळुंके यांच्या घराबाहेर एक अज्ञात ड्रोन पडला त्या संदर्भात फडगेट पोलीस स्टेशनमध्ये हार्दिक ड्रोन जमा केला आहे.

मतदार यादी मध्ये घोळ केला जातो. मशीन बदलल्या जातात आणि सगळ्या वर आवाज उठवल्यानंतर ड्रोन फिरवला जातो.

बिल्डिंग वर ड्रोनच्या गिरट्या सुरू असताना ड्रोन त्यांच्यासमोर पडला

राजकारण करायचं असेल तर अशा पद्धतीने करू नका एक तर तुम्ही जिंकाल किंवा मी जिंकेल अशी रेकी करून काही होणार नाही.

चंदन साळुंखे यांनी ड्रोन केला फडगेट पोलिसांकडे जमा. फडगेट पोलिसांकडून ड्रोनच्या मालकाचा शोध सुरू

Pandharpur: भगीरथ भालके माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भेटीला

पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेल्या प्रणिता भालके यांचे पती भगीरथ भालके यांनी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सोबत मनसेचे नेते दिलीप धोत्रे व नगरसेवक नागेश भोसले ही उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके सावंत भेटीला महत्व आले आहे.

Prashant Jagtap: प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

प्रशांत जगताप दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

मुंबईमध्ये करणार प्रवेश

जगताप यांच्या समोर होते अनेक पर्याय

भाजप,काँग्रेस,शिवसेना,शिवसेना उबाठा गट याच्याकडून विचारणा झाली होती

दुपारी दादरभवन येथे काँग्रेस मध्ये करणार प्रवेश करत असल्याचे जवळपास निश्चित...

Taloja: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

तळोजा एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता या आगरबत्ती बनविणाऱ्या कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रम साठवलेले असल्याने आग वेगाने पसरत होती.

आगीची माहिती मिळताच तळोजा अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि फॉगच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी वेळीच बाहेर पडल्याने या घटनेत कोणीही जखमी किंवा मयत झालेले नाही.

सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली असून मात्र या आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्गात थंडीचा जोर वाढला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात नागरिकांनी शेकोट्या पेटविल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या रात्रीचे तापमान घसरून १३ ते १६ अंश सेल्सियस झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी थंडीचा जोर जास्त असल्याने आंबा, काजू, फणस, जांभूळ पिकाला चांगला मोहर आला आहे. पुढील आठवडाभर थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

 Latur: लातूरमध्ये ऊस तोडणी हार्वेस्टरमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

संदीप भोसले लातूर(प्रतिनिधी)- ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून लातूरच्या औसा तालुक्यातील "आशिव" येथील शेतकरी शंकर प्रभाकर सावंत या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी शंकर प्रभाकर सावंत यांना केवळ एक एकर जमीन त्यात त्यांनी ऊस पिक घेतलेलं, शेतात ऊस तोडणी साठी हार्वेस्टर मशीन आली, बाजूला पडलेला ऊस मशीन मध्ये टाकण्यासाठी शेतकरी जवळ गेल्याने अचानक तोल गेला आणि मशीन मध्ये शेतकऱ्याचे तुकडे तुकडे झाले, सहकाऱ्यांनी तत्काळ मशीन बंद करून त्याला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता

Ratnagiri: नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची पसंती

मुंबई पुणे नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल

रत्नागिरी, गणपतीपुळे, कर्दे, गुहागर, मुरुड आशा सर्वच समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची पसंती

गणपतीपुळे समुद्रकिनारी देखील पर्यटकांची मोठी गर्दी

नाशिकमध्ये जागावाटपासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न

- नाशिकमध्ये जागावाटपावरुन होणारे वाद टाळण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न

- प्रभागात ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार असेल ति जागा त्या पक्षाला सुटणार

- काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा

- ठाकरे बंधू एकत्र येताच नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचा एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय

Nashik: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले ५ दिवस, मात्र नाशिकमध्ये अद्यापही महायुतीचं ठरेना

- नाशिक महापालिकेच्या जागावाटपासाठी आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात चर्चेची शक्यता

- शिंदेंची शिवसेना ४५ जागांवर ठाम, सन्मानपूर्वक जागा न भेटल्यास स्वतंत्र लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी

- मागील काही दिवसांपासून युतीबाबत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरुय चर्चांच्या फेऱ्या

- एक दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय होण्याची शक्यता

Navi Mumbai:नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युती करावे असा आग्रह वरिष्ठांकडून असला तरी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा स्थानिक पातळीवर युती होण्याची शक्यता कमी आहे कारण भाजपने शिवसेनेकडे 91 जागेचा प्रस्ताव पाठवला आहे तर शिवसेनेने भाजपकडे 57 जागांचा दावा केला आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या जागा 111 असून त्यामुळे भाजपने मात्र शिवसेनेला 20 जागा देऊ त्यामुळे सेना भाजपच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी झाली आहे

Panvel: पनवेल महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार

पनवेल महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार स्पष्ट झालय.. या निवडणुकीच्या तिकीट वाटपाचे तिढा देखील सुटला आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही नगरसेवक नसताना देखील महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी शिवसेनेला जागा सोडल्यात..

तसेच भाजपच्या विरोधामध्ये सर्व महाविकास आघाडीतले मित्रपक्ष एकत्र येत ही निवडणूक लढवली जाणार आहेत शेतकरी कामगार पक्ष 40 इतक्या जागा लढवणार आहे इतर जागा मित्र पक्षाला देण्यात येणार आहेत एकूणच पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 78 जागा आहेत

शाळकरी विद्यार्थ्याना घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोचा अपघात

शाळकरी विद्यार्थींना घेऊन जाणाऱ्या पिक अप टेम्पो चा अपघात झाला असून या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना नाशिक येथील केळकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोखाडा तालुक्यातील चप्पलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यींना घेऊन शिक्षक

शाळेय क्रीडा स्पर्धेसाठी पिक अप टेम्पो मध्ये मागे बसवून घेऊन जात होते या टेम्पो चा चालक दारूच्या नशेत होता यामुळे पिक अप टेम्पो वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोखाडा तालुक्यातील सातुर्ली जवळ हा अपघात झाला या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या मध्ये अरूण देविदास लाखन इयत्ता चौथी व कुणाल संतोष भोळे इयत्ता चौथी या दोन विद्यार्थ्याना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथील केळकर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षकाने एका पिक अप टेम्पो मध्ये मागे बसवून घेऊन जाणे कुठपर्यंत योग्य होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pune: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची जागावाटप बाबत आज पुन्हा बैठक

दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही

कॉंग्रेस पक्ष स्वबळावर जाण्याच्या मार्गावर असल्याने जागा वाटपाचे गणित बिघडले आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा वाटपाचे गणित पुन्हा एकदा जुळवावे लागणार आहे.

या बैठकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासमवेत जागांसंदर्भातील वाटाघाटीवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

पुढच्या दोन दिवसात जागाचा तिढा सुटण्याची शक्यता

Pune: पुण्यात भाजप शिवसेना जागांचा तिढा सुटेना

महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम

पुण्यात महायुतीमध्ये जागावाटप सन्मानाने व्हावी अशी अपेक्षा करून महायुतीमध्ये महायुतीमध्ये 35 ते 40 जागांवर ठाम राहणार असल्याची भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे

पुण्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपने 125 जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने शिवसेनेच्या मागणीनुसार शिवसेनेला एवढ्या जागा मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतो

पुणे महापालिका निवडणुकी महायुती म्हणून लढवण्याचे निश्चित झाल्यानंतर ही शिवसेना आणि भाजप जागा वाटपाचा फेस सुटलेला नाही

शिवसेनेकडून 35 जागांची मागणी केली जात असताना भाजपकडून अवघ्या 15 जागांचा प्रस्ताव सेनेला दिला आहे

शिवसेनेच्या काही अस्वस्थ कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली आहे

BJP: भाजप यादीवर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब

भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता

पुणे महापालिकेच्या निवडणूक साठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली

शंभरहून अधिक नावावर शिक्कामोर्तब ं करण्यात आल्याची माहिती

मुख्यमंत्री फडणवीस या यादीतील नावांना मान्यता देऊन आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात बुधवारी झालेल्या भाजपच्या कोर कमिटी बैठकीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन भाजपचे प्रमुख पदाधिकारी काल मुंबईला गेले होते

अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा करून 41 प्रभागातील प्रमुख उमेदवारांनी यादी कोअर कमिटी बैठकीत तयार करण्यात आली होती.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार आज पुन्हा एकदा भेटीगाठी घेणार

कार्यकर्त्यांच्या,भेटीगाठी,पक्षप्रवेश आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अजित पवार चर्चा करणार

पुण्यातील बारामती होस्टेल येथे अजित पवार काही वेळात पोहचत आहेत

Prakash Mahajan: प्रकाश महाजन आज करणार शिवसेनेत प्रवेश

प्रकाश महाजन आज करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश.

ठाण्याला साडेबारा वाजता शिंदे घरी होणार प्रवेश.

महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.

Chhtrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीची समन्वय समिती गठीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली समिती गठीत

जागावाटप आणि त्यानंतर निवडणुकीतील समन्वयासाठी समिती गठित करण्यात आली आहे

समितीमध्ये पाच भाजपचे आणि पाच शिवसेने शिंदे गटाचे सदस्य

भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, खासदार डॉ. भागवत कराड, समीर राजूरकर

तर शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भूमरे, आमदार, प्रदीप जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, ऋषी जयस्वाल

हे समिती सदस्य असतील.

महायुती मधील समन्वयासाठी आणि निवडणुकीतील कामकाजासाठी ही समिती असणार आहे

शेकापच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेला भोपळा ठाकरेसेनेने मिळवला दोन जागांवर विजय

रायगडच्या अलिबाग नगर पालिका निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या शिंदेसेनेला एकही जागा जिंकता आली नाही मात्र त्याच ठिकाणी दोन जागा लढवुन दोनच्या दोन्ही जागा जिंकुन आणण्याची किमया ठाकरे सेनेने करून दाखवली आहे. अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी कायम शेकाप सत्तेत राहिल आहे. महाविकास आघाडीत असताना देखील शेकापने ठाकरेंच्या सेनेला एकही जागा दिली नाही. अशा वेळी ठाकरे सेनेच्या झेंड्याखाली संदिप पालकर आणि पालकर या पती पत्नीने निवडणुक लढवली आणि शेकापच्या बालेकिल्ल्यात शेकाप उमेदवारांचा पराभव करीत विजय मिळवला.

अमोल कोल्हे साहेब हे अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत इतरही काही कार्यकर्ते होते गेले. काही तास मी इथं भीमथडीमध्ये आहे, आज भीमथडी चा शेवटचा दिवस होता
रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार

थंड हवेचं ठिकाण असलेलं तोरणमाळ गारठलं

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला तापमानाचा पारा घसरला...

तापमानाचा पारा तब्बल 8° पेक्षा खाली...

गारठा वाढल्याने तोरणमाळचा यशवंत तलाव परिसरात पसरली दाट धुक्याची चादर....

सातपुड्याचा दुर्गम भागात सातत्याने तापमानात घट....

गारठा वाढल्याने मानवी जीवनावर परिणाम....

कल्याण पूर्वेत आपला कल्याण महोत्सवची धूम; आर्ची अर्थात रिंकू राजगुरुची खास हजेरी

कल्याण पूर्वेत सुरू असलेल्या आपला कल्याण महोत्सवने यंदा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. या महोत्सवात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने खास उपस्थिती लावून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

रिंकू राजगुरुने आपल्या फेव्हरेट डायलॉगने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर तिने कल्याणकरांचे मनापासून कौतुक करत, कल्याणकर हे शिस्तप्रिय, प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे आहेत,असे गौरवोद्गार काढले. तिच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

यंदाच्या आपला कल्याण महोत्सवचे खास आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती. या प्रतिकृतीसमोर दररोज सायंकाळी गंगा आरतीचा अलौकिक अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. अध्यात्मिक वातावरणामुळे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या वाढत्या घटनांमुळे देहुरोडच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मावळच्या देहूरोड शहरातील थॉमस कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी-संध्याकाळी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा अचानक कुत्र्यांचा हल्ला होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ठोस व प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. देहूरोड येथील थॉमस कॉलनीत भटक्या कुत्र्यांनी एका ज्येष्ठ महिलेला चावा घेतल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव मावळच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

मावळच्या ग्रामीण भागात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. ख्रिसमस निमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. ग्रामीण भागातील चर्च आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आली होती. रंगीबेरंगी दिवे, ताऱ्यांची सजावट, तसेच प्रभू येशूच्या जन्मदृश्याचे(क्रिब )दर्शन भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. रात्रीच्या वेळी ही रोषणाई विशेष आकर्षण ठरत होती.

या प्रसंगी विशेष प्रार्थना सभा, कॅरोल गीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवांसह इतर धर्मीय नागरिकांनीही उपस्थित राहून शुभेच्छांची देवाणघेवाण केली. शांतता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सण सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.

औरत शहाजनी पोलीस ठाण्याबाहेर मयत युवकाच्या नातेवाईकांचा मोठा जमाव, पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण.

लातूरचा निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे एका युवकांने औरत शहाजान येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, तर आत्महत्या पूर्वी मयत युवकांनी मोबाईलवर व्हिडिओ देखील बनवलाय, दरम्यान या घटनेनंतर औराद शहाजनी पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमलाय, पोलीस ठाण्याबाहेर तणावाच वातावरण पाहायला मिळते आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur : हार्वेस्टरमध्ये ऊस टाकताना तोल गेला, मशीनमध्ये अडकून शरीराचे तुकडे तुकडे झाले, लातूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

Government Scheme: ना कोणतेही व्याज, ना गॅरंटी... मिळणार ५ लाखांचे लोन, अट फक्त ८वी पास

Ganpatipule : गणपतीपुळेमधील या हिडन प्लेसेसवर तुम्ही गेले आहात का? मग या न्यू ईयरला नक्की करा फिरायला जायचा प्लॅन

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Crime : मोठी बातमी! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या कारमधून आले अन् वार केले

SCROLL FOR NEXT