नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
मंदिरापासून त्र्यंबकेश्वर गावात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा
एका भाविकाला दर्शनासाठी लागतोय तब्बल 8 ते 9 तासांचा वेळ
26 जानेवारी आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड करीत असतात,सध्या अनेक भागात उन्हाळी कांद्याची लागवड सुरू झाली आहे.
मात्र लागवडीसाठी मजुरांची टंचाई,वाढीव मजुरी हे शेतकऱ्यानं साठी डोकेदुखी ठरत असल्याने नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकरी हरिभाऊ महाजन यांनी थेट यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड करण्यास सुरुवात केलीय.
पुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्ला
बॅनर लावण्यावरून झाला होता वाद त्यावरून केली मारहाण
टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे
१४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली असून एकाच दिवशी तब्बल 836 ट्रक कांदा बाजारात दाखल झाला आहे.यंदाच्या हंगामातील ही आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली आहे.कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बाजार समितीत माल उतरविण्यास वेळ लागत असून त्याचा परिणाम लिलाव प्रक्रियेवर झाला आहे.लिलावास उशीर होत असल्याने तसेच बाजारात पुरवठा जास्त झाल्याने कांद्याचे दर घसरले आहेत.सध्या हंगामातील नवा कांदा बाजारात दाखल होऊ लागल्याने आवक सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल 2,200 रुपये,तर सर्वसाधारण कांद्याला किमान 900 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे.मात्र गेल्या महिनाभरात कांद्याच्या दरात तब्बल दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.मिळणारा भाव उत्पादन खर्चालाही पुरेसा नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे.
अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत…असं म्हणत पुतणे धनंजय सावंत यांनी काका आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत धनंजय सावंत यांनी हे वक्तव्य केलय
धृतराष्ट्राजवळ जसा एक संजय होता, तसाच आजच्या नेत्यांजवळही संजय आहे… असं म्हणत आमदार तानाजी सावंत यांच्या बगलबच्च्यांनाही धनंजय सावंतांनी सुनावलं
सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सुमारे दोन लाख भाविक पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रशेड पर्यंत गेली आहे. दर्शनासाठी पाच तासांचा अवधी लागत आहे. शनिवार, रविवार आणि उद्या भारतीय प्रजासत्ताक दिनाची सलग सुट्टी आल्याने पंढरपुरात गर्दी वाढली आहे. पंढरपुरातील सर्व मठ धर्मशाळा भाविकांनी भरून गेली आहेत. दरम्यान मंदीर परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थटाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत 67 हजार दुबार नावे
दुबार मतदान रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
जिल्हा प्रशासन दुबार मतदारांकडून घेणार हमीपत्र
मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र राज्य निवडणूक आयोगात करून लिहून घेतले जाणार आहे
जिल्ह्यात एकूण 29 लाख 76 हजार 454 मतदार आहेत त्यापैकी 67 हजार 12 मतदारांची नावे दुबार आहेत
मालाड रेल्वे स्थानकात किरकोळ वादातून आलोक सिंग या प्राध्यापकाची चाकू हल्ल्यात हत्या करणारा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णा ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगातील विकासकामे, तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा आदी अत्यावश्यक सेवांची कामे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे यांनी चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण दि. २३ जानेवारी २०२६ पासून पंचायत समिती कार्यालय, खामगांव समोर सुरू करण्यात आले आहे..
महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी वेगाने घडामोडी घडत असून वेगवेगळ्या पक्षां तर्फे गट नेते पदाची निवड ही करण्यात आली असून त्यात इस्लाम पार्टीच्या गट नेते पदी खालिद शेख, समाजवादीच्या गटनेते पदी मुस्तकीम डिग्निटी तर एमआयएमचे गटनेते पदी माजी महापौर अब्दुल मलिक यांची निवड करण्यात आली आहे,तर काल रात्री उशिरा शिवसेनेच्या गटनेते पदी माजी उपमहापौर निलेश आहेर यांची निवड करण्यात आली असून,महापालिकेच्या महापौर पदाची निवड ३०-३१ जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त 25 जागा मिळालेल्या आहे, भाजपचाच महापौर व्हावा असं जनतेने कौल दिला आहे, सर्वात जास्त जागा भाजपाला दिल्या आहे, अमरावतीचा महापौर बनवण्याकरिता ज्या ज्या पक्षाला आम्हाला सहकार्य करायचा असेल त्या पक्षाचं आमच्याकडे स्वागत आहे असे म्हणत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापौर पदासाठी सर्व पक्षांना खुली ऑफर दिली आहे.मात्र यावेळी त्यांनी एमआयएम सोडून सर्व पक्षांचे स्वागत आहे असा उल्लेख देखील केला. एम आय एम ला वाटले तरी आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही,ते त्यांचं पाहत बसतील असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं. भाजपचा महापौर व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके आमदार रवी राणा, बहुजन समाज पार्टी, आणखी काही अपक्ष असतील तर त्यांना देखील विनंती करणार आहोत, असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल. भारतीय जनता पक्ष रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष व शिवसेना शिंदे ,राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे नगरसेवक एकत्र आले तरी आम्ही सरकार बनवू शकतो असे देखील बावनकुळे यांनी सांगितले
सलग तीन दिवस असलेल्या सुट्टयांमुळे पर्यटन स्थळ गजबजली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदी वरील पुलावर पुन्हा पुन्हा वाहतुकीची कोंडी होत असल्यानं वाहनचालक, प्रवासी वैतागले आहेत. छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील भवन येथे काल दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पूर्णा नदीच्या पुलावर एक महाकाय कंटेनर अचानक नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तास चाललेल्या या कोंडीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या वाहतूक कोंडीत अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले देश-विदेशातील पर्यटक अडकून पडले होते. यामुळे शेकडो वाहन चालक व प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीचे तब्बल पाच जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे चार तर शिवसेना शिंदे गटाचा एक जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. यासोबतच सहा पंचायत समिती सदस्यही बिनविरोध निवडून आल्याने एकूण अकरा जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने महायुतीने ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.
एमआयएमच्या नगरसेविका सहर यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं नुकतेच वक्तव्य केलं तर एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांनीआम्ही सहर यांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया दिली यावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली...
अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल..यासाठी लागणारे आमचे मित्र पक्ष आम्हाला मदत करतील आणि भाजपचा महापौर बसेल..
जागा का कमी झाल्या यासाठी प्रदेशातून एक समिती अमरावतीत येणार आहे..
निवडणूकित जागा का कमी झाल्या कोर कमिटी सोबत अडीच तास चर्चा केली.. त्यात पराभवाचे कारण आम्ही शोधले..पराभूत उमेदवारांचे सुद्धा आम्ही त्यांचे मत घेणार आहोत... पराभवाचे विश्लेषण आम्ही करणार आहोत...
जागा वाटप मध्ये आम्ही अनेकांना तिकडे देऊ शकलो नाही पण दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणुका लढणे हे काही बरोबर नव्हतं... आमचे लोक वेगळ्या पक्षात जाऊन अपक्ष उभे राहिले तर काही वेगळ्या पक्षात जाऊन उभे राहिले,आठ ते दहा जागा आमच्या 200 मतांच्या आत होत्या ज्याठिकाणी आमचं पराभव झालेला आहे...
भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनी महसूल कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे, याप्रकरणी महसूल कर्मचारी रवी गुट्टे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या गजानन घुगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे कळमनुरी पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काल रात्री एक प्रकार घडलाय.. त्यामुळं जवळपास तासभर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला.. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसह पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ झाली..
कौंटुबिक वादाला कंटाळून एका व्यक्तीने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ब्रिज वरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करीत होता, सुदैवाने रेल्वे पोलिसांनी आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवले खरी. जवळपास तासभर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु होताय..
तिकडं ब्रिजच्या बाजूने रेल्वेची हाय होल्टेज तार होती.. दुसरीकडे बराच वेळ समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो स्वतः बद्दल कोणतीही माहीती देत नव्हता. तो कोणत्याही क्षणी खाली उडी मारू शकत असताना त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर हाय होल्टेज तारेच्या संपर्कात येताच त्याचा जीव धोक्यात येईल, असा अंदाज पोलिसांना होताय.
यवतमाळच्या वणी कोल्हारपिंपरी मार्गावर महिन्याला साडेतीन ते चार लाख मॅट्रिक टन कोळशाची वाहतूक केली जाते, परिणामी उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेती करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अक्षरशः श्वास गुदमरत आहे ही कोळसा वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाची धूळ शेतातील पिकांवर उडते त्यामुळे ही धूळ जीवावर बेतणारी ठरत आहे.अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहे. पिके काळवंडली आहेत एवढे नुकसान होऊ सुद्धा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही,यामुळे तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या मांदिवली गावात शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे. उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे प्रचंड धूळ, धूर आणि ध्वनीप्रदूषण पसरले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दखलेनंतर चौकशी समिती गावात दाखल झाली खरी, पण चौकशीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. समितीसमोरच नागरिक आक्रमक झाल्याने निष्कर्ष काढण्याआधीच समितीने काढता पाय घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते भावेश कारेकर आणि ॲड. अर्पिता कारेकर यांनी उपस्थित केलेल्या थेट प्रश्नांना बगल देत चौकशी अर्धवट सोडली गेल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे.“न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही,” असा ठाम इशारा पालकांनी दिला असून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपानंतरही प्रशासन गप्प का?की विद्यार्थ्यांचे भवितव्य खरंच धुळीतच जाणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
हमीभावाने तुर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.यवतमाळ जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तुरीची खरेदी होणार आहे.यासाठी 11 केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे,या केंद्रावर 20 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहेत.
महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार,फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित
30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार
तर 4 फेब्रुवारी ही महापौर निवडीची तारीख, मात्र यामध्ये एक दोन दिवस मागेपुढे बदल होण्याची शक्यता..?
नागपूर महानगरपालिकेत महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत..
भाजपमध्ये सध्या महापौर पदासाठी अनेक नाव चर्चेत, यामध्ये शिवानी दानी, विशाखा मोहोड, जेष्ठ नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या धुरडे, अश्विनी जिचकार, साधना बरडे यांचेही ही नावे चर्चेत..
मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौरपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे महत्त्वाचे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.