Maharashtra Live News Update साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: अखेर ७ तासानंतर अशोक खरातची SIT चौकशी संपली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध सुरूच, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

अखेर ७ तासानंतर अशोक खरातची SIT चौकशी संपली

- तब्बल ७ तासानंतर खरातची आजची SIT चौकशी संपली

- SIT टीमकडून ७ तास घेतले गेले खरातचे जाब जबाब

मुंबईतील रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई क्राईम ब्रांचने रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणातील १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई यूपी एसटीएफच्या मदतीने करण्यात आली. आरोपीला मुंबईत आणले जात असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीकडून अधिक चौकशी करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

भोंदूबाबा कॅप्टन खरातची 5 तासांपासून SIT चौकशी सुरूच

नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची सामोरासमोर चौकशी सुरू असल्याची माहिती

चौकशी दरम्यान कॅप्टन खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती

गुन्हा दाखल झाल्यानंतर नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची पहिल्यांदाच सामोरासमोर चौकशी होत असल्याची माहिती

रुपाली चाकणकरांच प्रदेशाध्यक्षपद जाणार? देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांचा सत्कार केला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर, रुग्ण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा मुक्तपणे वावर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवरही टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील अपघात कक्ष २४ तास कार्यरत असतो. येथे अपघातग्रस्त, गंभीर अवस्थेतील तसेच विषप्राशन केलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होतात.

अजित दादांचे काम ज्या पद्धतीने चालते, त्याच शैलीचे काम अमित शहांमध्ये दिसते- बाबासाहेब पाटील

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केली. “अजित दादांचे काम ज्या पद्धतीने चालते, त्याच शैलीचे काम अमित शहांमध्ये दिसते,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

संविधानिक संस्थांवर टीका; इंडिया आघाडीवर शहजाद पूनावाला यांचा हल्लाबोल

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला की, संविधानिक संस्थांचा अपमान करणे ही इंडिया आघाडीची ओळख बनली आहे. निर्णय त्यांच्या बाजूने आला तर संविधानाचा आधार घेतात, मात्र विरोधात गेल्यास संस्थांवर हल्ले करतात. कुटुंबवादी राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या या नेत्यांकडून लोकशाही मूल्यांचा अपमान होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

बदलापुरात व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार ?

अमेरिका-इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं शासनानं व्यावसायिक सिलिंडर बंद केले आहेत. त्यामुळे बदलापूर मधील अनेक लहान हॉटेल व्यवसायिक संकटात सापडलेत, मात्र दुसरीकडे मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना काळ्याबाजारातून सिलिंडर दिले जात असल्याचा आरोप छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी केलाय. एकीकडे व्यावसायिक सिलिंडर बंद केल्यानं या लहान हॉटेल व्यवसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर अन्नपदार्थ करण्यास सुरुवात केलीय. मात्र सध्या उन्हाचा पारा चाळिशी पार गेल्यानं या तळपत्या उन्हात बसून चुलीवर जेवण बनवणं शरीरासाठी त्रासदायक ठरतय, त्यामुळे कामगार आजारी पडतायेत. शासनानं सिलिंडरचा काळा बाजार तत्काळ रोखावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी दिलाय.

आंबा काजू शेतकरी 23 मार्चला मुंबई गोवा महामार्ग रोखणार- राजू शेट्टी

23 मार्च रोजी मुंबई गोवा महामार्ग रोखणार ठरलेलं आंदोलन होणार म्हणजे होणार.. राजू शेट्टी यांचा चक्का जाम चा निर्धार.. 12 मार्च रोजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तळ कोकणातील बागायतदारांनी काढला होता मोर्चा.. शासन दरबारी आपल्या मांडल्या होत्या मागण्या मात्र सरकारने कोकणातील शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय. त्यांची मागणी बेदखल केलीय. 10 दिवसांत निर्णय न झाल्याने नांदगाव तिठ्यावर रास्तारोको होणार... जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत उठणार नाही राजू शेट्टी यांचा इशारा..

कोल्हापूरात गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर वाहनांची तोडफोड

राजारामपुरी 9 व्या गल्लीत एका मिसळ सेंटर वर आलेले ग्राहक आणि स्थानिकांमध्ये वादावादी

स्थानिकांच्या घरासमोर तरुणांनी गाडी पार्क केल्यानंतर झाली वादाला सुरुवात

गाडी काढल्यामुळे तरुणांच्या जमावाने स्थानिक व्यक्तीला मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत कैद

तरुणांनी चारचाकी वाहनांची तोडफोड करत बिअर बॉटल सुद्धा फोडल्याचे व्हिडिओ समोर

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलाचे शक्तिप्रदर्शन..

आगामी सण आणि उत्सवांच्या काळात जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. याच तयारीचा भाग म्हणून शहरातील संवेदनशील भागांमध्ये दंगा काबू पथकाद्वारे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कोणत्याही अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासन किती सक्षम आहे, याचे दर्शन या प्रात्यक्षिकातून घडवण्यात आले. यानंतर पथकाने शहराच्या मुख्य मार्गांवरून रूट मार्च काढला.

नागपूरात 'भारतीय युवा संसद परिषदे'चे उदघाटन उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडले.

- रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात तीन दिवसीय युवा संसद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

- या परिषदेत देशभरातील 800 वर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी स्मृती मंदिरातील डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

- याप्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा देखील उपस्थित होते.....

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली फळ पिकांची पाहणी

युद्धामुळे माढा तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतात पडून असलेल्या केळी,आंबा,पेरू आदी फळ बागांची पाहणी आज फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी करून शेतकर्यांना दिलासा दिला.

आज सुरली,आढेगाव आणि अकोले या भागात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सध्या इस्त्राईल इराण युद्धामुळे केळीची निर्यात थांबली आहे. यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेल्या केळी बागांची पाहणी केली. सरकारकडून लवकरच शेतकर्यांना मदत केली जाईल असे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

Mumbai: मुंबई लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये भांडण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई -

मुंबई लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये भांडण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई लोकलच्या दरवाज्यात फूटबोर्डवर उभे राहण्यावरून दोन तरुणांमध्ये वाद

शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर झटापटीत; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका तरुणाने दुसऱ्याला चालत्या लोकलमधून ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे दृश्य

इतर प्रवाशांनी आरडाओरडा करत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

Pandharpur: पंढरपूरमध्ये फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली फळ पिकांची पाहणी

पंढरपूर

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली फळ पिकांची पाहणी

युद्धामुळे माढा तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतात पडून असलेल्या केळी, आंबा, पेरू आदी फळ बागांची पाहणी आज फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी करून शेतकर्यांना दिलासा दिला.

आज सुरली,आढेगाव आणि अकोले या भागात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सध्या इस्त्राईल इराण युद्धामुळे केळीची निर्यात थांबली आहे.

यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेल्या केळी बागांची पाहणी केली. सरकारकडून लवकरच शेतकर्यांना मदत केली जाईल असे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

Wardha: वर्ध्यातील भारीजवळ मिनी ट्रॅव्हलरने घेतली पेट

भारी जवळ मिनी ट्रॅव्हलरने घेतली पेट

वर्धा येथून नांदेडकडे जात असलेल्या मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी विमानतळ परिसराजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली.

आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण ट्रॅव्हल्स आगेच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णतः जळून खाक झाली.या मिनी ट्रॅव्हल्समध्ये सुमारे दहा प्रवासी प्रवास करत होते.

आग लागल्याचे लक्षात येताच चालक व प्रवाशांनी तत्काळ वाहनाबाहेर पडत जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pandharpur: पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

पंढरपूर -

पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

एंकर - वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील‌ शेतकरी दत्तात्रय डोंगरे यांची पाच एकर द्राक्ष बाग कोलमडून पडली आहे.

यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.‌

मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांडरे यांनी नुकसान झालेल्या बागेची पाहणी करून सरकारने तत्काळ शेतकय्रांना मदत करावी अशी मागणी केली आहे.

दोन तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि गारपिटी सुरू आहे. अनेक शेतकय्रांना याचा मोठा फटका बसला आहे.

Nashik: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या SIT चौकशीला सुरुवात

नाशिक -

- स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या SIT चौकशीला सुरुवात

- SIT टीमकडून अशोक खरातची चौकशी सुरू

- महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरातवर दाखल आहे गुन्हा

- SIT टीमकडून आज पुन्हा खरातची चौकशी

Gadchiroli: गडचिरोलीत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली जातेय 

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात ईद-उल-फित्र रमजान ईद ची नमाज मुस्लिम बांधवांनी साजरी केली

मुस्लिम समाजाच्या सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईद साजरी केली जाते

या ईद निमित्त मुस्लिम बांधव जवळपास 30 दिवस उवपास ठेवतात नंतर ही ईद उत्साहात साजरी करतात

नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकींना शुभेच्छा देत असताना..

Solapur: ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; रंगभवन अहले हदीस ईदगाहवर हजारोंची उपस्थिती

सोलापुरातील रंगभवन अहले हदिस ईदगाह येथे आज सकाळी मोठ्या उत्साहात ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली.रमजान महिनाभर उपवास,इबादत आणि संयम पाळल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धा आणि आनंदाने ईद साजरी केली.

या वेळी मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी इमामत केली.नमाजनंतर दिलेल्या संदेशात त्यांनी कुरआननुसार जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतता,सौहार्द आणि बंधुभाव टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकमेकांविषयी आदर आणि प्रेम कायम ठेवणे गरजेचे आहे,”असे आवाहनही त्यांनी केले.

Amravati : अमरावती शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

ईद निमित्त आज अमरावती शहरामध्ये विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज अदा करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर अमरावती काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा मुस्लिम भागात भेट देऊन सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

सकाळपासून अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवांच्या या पवित्र ईद सणात खासदार बळवंत वानखडे आणी यशोमती ठाकूर उत्साहात सहभागी झाल्या होत्या

Nagpur : कमर्शियल एलपीजी गॅसच्या दरात ५ रुपयांनी कपात झाल्याने रिक्षा दिलासा

- कमर्शियल एलपीजी गॅसच्या दरात ५ रुपयांनी कपात झाल्याने रिक्षा चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

- पूर्वी ५६ रुपयांपासून ८५ रुपयांपर्यंत असलेले कमर्शियल गॅसचे दर सध्या ८० रुपये ९२ पैशांवर स्थिर आहेत.

- मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा असल्याने परिस्थितीनुसार दरात बदल होऊ केले जाणार अशी फलक लागले आहे..

Nanded : शहरा जवळच्या वाजेगाव पुलावर दुचाकीसह युवक जळाला

नांदेड शहरातील वाजेगाव येथील पुलावर दुचाकीसह एक युवक जळाला.सकाळीं साडे नऊ ते दहा ते सुमारास ही घटना घडली.जळताना दुचाकीतून आणि त्या जळत असलेल्या युवकाच्या अंगातून अनेक स्फोट झाले.त्यामुळें हा घातापाताचा प्रकार होता का अशा चर्चा सुरु झाल्या. दुचाकीला नेमकी आग कशी लागली.त्या युवकाला आग कशी लागली हे अजुन स्पष्ट नाही.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रूपाली चाकणकर यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

चिकनचे दर गगनाला भिडले, 

सांगली आणि मिरज मध्ये चिकनच्या दराने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. वाढत्या उन्हामुळे पक्षी उत्पादनात घट होत आहे. उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे याचा परिणाम पोल्ट्री व्यवसाय आणि चिकन दुकानात जाणवत आहे. साधारणता 45 दिवसांमध्ये होणाऱ्या पक्षी आता 60 दिवसाचा कालावधी घेत आहे. त्यात उन्हाच्या तीर्वता मुळे पक्ष्यांचे प्रमाण हे कमी झाले आहे. त्यामुळे चिकन मार्केटमध्ये पक्षी हे दिशेने असे झाले आहेत. पक्षांचे जाळे हे मोकळे दिसू लागले आहेत. चिकन मार्केटमध्ये तुटवडा जाणवू लागला आहे. पक्षी नसल्यामुळे ग्राहकांना चिकन देणेही अवघड झाले आहे. चिकन हे 280 ते 300 रुपयांनी विकले जात आहे..

वादळी वाऱ्यामुळे शाळेचे छत उडाले, विद्यार्थ्यांचे शिक्षण उघड्यावर

सातपुड्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे खडकला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे छत पूर्णपणे उडून गेले. 1995 मध्ये बांधलेली ही इमारत आधीच जीर्ण झाली होती, मात्र आता छत नसल्याने विद्यार्थ्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे.भर उन्हात शाळा भरवणे कठीण झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.घटनेची माहिती मिळताच सरपंचांनी पाहणी करून तातडीने दुरुस्तीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Amravati : अमरावतीत रमजान ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर हजारोंची सामूहिक नमाज पठण

अमरावती शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह मैदान,जुना कब्रस्तानतसेच विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करून देशात शांतता, बंधुता व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

मौलाना सईद अख्तर मुरादाबादी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले.

Eid: आमदार राजू कारेमोरे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा..

पवित्र रमजान महिन्याच्या सांगतेनंतर साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्रनिमित्त आज तुमसर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या आनंदाच्या क्षणी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी स्थानिक मशिदीला भेट देऊन मुस्लिम बांधवांची भेट घेतली आणि त्यांना ईदच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

Malegaon: मालेगाव मध्ये मोठ्या उत्साहात व शांततेत सामूहिक नमाज पठण

उल फ़ित्र आर्थात रमजान ईद नाशिकच्या मालेगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,शहरातील पोलिस कवायत मैदानावर मुख्य ईदगाह सह 12 ईदगाह मैदानावर सामूदायिक नमाज पठन करण्यात आले . नमाजनंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या .देशात सुख शांती व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली .ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही लावण्यात आले होते.

Shahapur: शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांचा अपघात; भरधाव कारने दिली धडक

मुंबई नाशिक महामार्गावर पायी जाणाऱ्या साई भाक्तांना वेगवाने येणाऱ्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली

या अपघातात पाच साईभक्तांना उडवले यात येकाचा मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले एक

कसारा बायपास जवळ अपघात झाला आहे.

बायपास जवळ उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिली

उभी असलेली गाडी साई भक्तांवर पाठीमागून जाऊन धडकली

अपघातात एक साई भक्ताचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

3 जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तर एक जखमींस एसएमबीटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी केले दाखल

Pune: पुण्यात ७२ किलो गांजासह कार जप्त

पुण्यात १९ लाख ९३ हजार ८०० रुपये किंमतीचा ७२ किलो गांजा जप्त

गुन्हे शाखा ७ ची कारवाई

एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार तीस पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या मधुन विक्रीसाठी गांजा घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली.बोल्हाईमाता मंदिराचे जवळ, केसनंद वाडेबोल्हाई वाघोली टेकडीचे बाजुला मोकळ्या जागेत सापळा रचुन कारचे डिक्कीमधून बारदान चार पोत्यामध्ये गांजा वेगवेगळ्या २९ प्लॅस्टिक बॅगमध्ये गुंडाळलेल्या पाकीटामध्ये ५८.५८ किलो गांजा हा अंमली पदार्थ व स्विफ्ट कार असा एकूण १७ लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Bhandara: 'ईद मुबारक!' भंडाऱ्यात रमजान ईदचा उत्साह...

रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदानं भंडाऱ्यात साजरा केला

महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर (रोजा) आज मुस्लिम बांधवांनी सकाळीच मशिदी आणि ईदगाह मैदानांवर एकत्र जमून विशेष नमाज अदा केली

नमाजनंतर एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा देण्याचे चित्र भंडाऱ्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे

सकाळपासूनच शहरातील प्रमुख ईदगाह मैदानं आणि मशिदींमध्ये लगबग पाहायला मिळाली

Washim: वाशिमकरांच्या चिंतेत वाढ,शहरावर पाणी टंचाईच संकट...

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये केवळ 31 टक्के पाणी जलसाठा शिल्लक असल्याने वाशिमकरांच जल संकट अधिकच गडध झालंय...15 दिवसात 9 टक्के पाणी साठा झपाट्याने कमी झाल्याने जून महिन्या पर्यंत कसा जलसाठा पूरणार असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी वापर काटकसरीने करून येत्या जलसंकटावर मात करण्याची वेळ आलीय... अन्यथा पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ शहर वासीयांना येण्याची शक्यता निर्माण होणार आहे...

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगर शहरात रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी आज सकाळी सामूहिक नमाज अदा करून एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. शहरातील प्रमुख छावणी ईदगाह येथे हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकवटले होते. यासोबतच शहरातील सर्वच मशिदींमध्येही नमाजासाठी समाज बांधवांची मोठी गर्दी होती.

नगर तालुक्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकऱ्याला अश्रू अनावर

नगर तालुक्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

शेतकऱ्यांना हकीकत सांगताना अश्रू झाले अनावर...

नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या परिसरत्व कलिंगड, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान...

गारपीट आणि पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान...

पीक काढणीला आलेली असतांना झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला..

प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी..

Nashik: नाशिकमधील २४ आयव्हीएफ केंद्रांची मनपाकडून झाडाझडती

नाशिकमधील २४ आयव्हीएफ केंद्रांची मनपाकडून झाडाझडती

तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी पूर्ण

गोविंदनगर येथील मालती आयव्हीएफ केंद्रावर कारवाईनंतर हालचाल

मनपा आरोग्य विभागाची शहरभर तपासणी मोहीम

प्राथमिक चौकशीत या केंद्रात आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा

पुढील आठवड्यात विशेष पथक बदलापूरला जाणार

आयव्हीएफ प्रकरणाची अधिक सखोल चौकशी सुरू

गुन्हा दाखल झाल्यानंतर मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Tuljapur: तुळजापुर शहरातील अवैध धंदे बंद करा,नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांची पोलिसांकडे मागणी

तुळजाभवानी मातेच्या तुळजापूरात सुरु असलेले अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी तुळजापूर पोलिसांकडे केली आहे. तुळजापूरात जुगार,मटका,चक्री,देहविक्री असे अवैध धंदे सुरू असुन हे धंदे मोठ्या प्रमाणावर चालु असुन तुळजापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे माञ याच ठिकाणी अशा प्रकारे सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे व केवळ चालक एटंजवर कारवाई न करता मुळ मालकावर कारवाई करावी अन्यथा आठ दिवसात पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Buldhana: आखाती युद्धाचा परिणाम; बुलढाण्यात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून, बुलढाणा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील एचपी गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

Jalna: जालन्यातील सोमनाथ शिवारातील गहू पिकाला अवकाळीचा फटका

जालन्यातील सोमनाथ शिवारातील गहू पिकाला अवकाळीचा फटका बसलाय.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोमनाथ शिवारातील शेतकरी अनिल चव्हाण या शेतकऱ्याचं गहू पीक भुईसपाट झाल आहे.जालना जिल्ह्यात रब्बी हंगामीतील पिकासह फळबागाला देखील गारपीटीचा फटका बसलाय

Sangli: आमदार रोहित पाटलांकडून नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी...

सांगलीच्या तासगाव तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसा व गारपीटमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षांची पंढरी म्हणून तासगाव तालुक्याची ओळख आहे.. हंगामातील उरल्यास सूरल्या द्राक्षबागांना अवकाळीचा फटका बसला असून द्राक्षबाग शेतकऱ्यांचे मोठ आर्थिक नुकसान झाला आहे.या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी पाहणी केली आहे.

Buldhana: चिखलीत रात्री दमदार पाऊस; शेती पिकांचे नुकसान,

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात काल रात्री अचानक दमदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील शेतीपिकांना मोठा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पावसामुळे कांदा, हरभरा, करडी आणि हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसामुळे आणखी संकट ओढवले आहे. नुकसानीचे अचूक प्रमाण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी केली जात आहे.

Buldhana: बुलढाण्यात वादळी पावसाचा तडाखा; मका पिकाचे मोठे नुकसान

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंपळपाटी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मका पिकाला मोठा फटका बसला असून शेतात उभे असलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Ashok Kharat: स्वयंघोषित कॅप्टन उर्फ अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ समोर

स्वयंघोषित कॅप्टन उर्फ अशोक खरातचा आणखी एक फंडा समोर

अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल

‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून करत होता भोंदूगिरी

उपचाराच्या नावाखाली भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ

भोंदू अशोक खरातने मुलीच्या पोटावर ‘इंटरनेट केबल टूल’ने उपचाराचा केला बनाव

धक्कादायक बाब म्हणजे महिलेसमोरच अल्पवयीन मुलीला तिचा शर्ट वर करण्यास सांगून पोटावर केबल टूल फिरवत उपचाराचा बनाव

अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा गंभीर प्रकार उघड

भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू

फोनवर १०० कोटींची खंडणी मागत ठार मारण्याची धमकी दिल्यान एकच खळबळ उडाली होती...

या प्रकरणात शुक्रवारी न्यायालयीन कार्यवाहीला सुरुवात

सरकारी वकील अॅड. लीलाधर शेंदरे यांनी तीन साक्षीदारांची तपासणी

धातोली पोलिसांकडून दोन आरोपींविरोधात खटला दाखल

जयेश उर्फ शाहीर उर्फ शशिकांत पुजारी तर दुसरा अफसर पाशा उर्फ बशिरुद्दीन नूर मोहम्मद अशी आरोपींचे नाव आहे..

कर्नाटकातील बेळगाव येथील कारागृहातून कट रचल्याचा आरोप आहे..

Kharat Case: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात

SIT टीमने दीपक लोंढेची केली कसून चौकशी

लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय

लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार

Yavatmal:यवतमाळात तुरीच्या दराची आठ हजारांच्या दिशेने वाटचाल

खरीप हंगामातील तुरीचा हंगाम संपला असून तुरीची काढणी संपताच शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी बाजारात आणायला सुरुवात केलीये नव्याने दरात थोडी सुधारणा झाली असून सुरूवातीला सहा हजार 420 रूपये क्विंटल दराने विकली जाणारी तूर आता 7 हजार आठशे रूपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात तुरीच्या दराची आठ हजार रूपयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये गॅसची ऑनलाईन सेवा विस्कळीत, नागरिक त्रस्त

यवतमाळ जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याच्या वल्गना प्रशासनाकडून केल्या जाताहेत, दिवसभर ऑनलाईन सेवा ठप्प राहते तर पहाटे पाच ते सात या वेळेत बुकिंग केल्या जातेय परंतु बुकिंग केल्यानंतरही सिलेंडरची प्रतीक्षा कायम आहे.परिणामी ग्राहक थेट गॅसएजन्सी समोर सिलेंडर साठी रांगा लावत आहे या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Pune: दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला

पुण्यात दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला

हात जोडून माफी मागायला लावली..

कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या १२ तरुणांच्या टोळक्याने चांगलाच राडा घातला. या

टोळक्याने केवळ रॅश ड्रायव्हिंगच केले नाही,तर रस्त्याने जाणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याला आणि एका कुरिअर बॉयला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली.

गाड्यांची तोडफोड आणि नागरिकांना शिवीगाळ केवळ मारहाण करून हे टोळके थांबले नाही,तर त्यांनी गल्ली क्रमांक ११ मध्ये पार्क केलेल्या गाड्यांचेही नुकसान केले.

स्थानिक रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीची या टोळक्याने तोडफोड केली. यावेळी परिसरात उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता,आरोपींनी त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

Navi Mumbai: नवी मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर

नवी मुंबई -

नवी मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर

सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला ॲक्शन प्लॅन प्रदूषणाचा होणार बिमोड हवेची गुणवत्ता सुधारणार

Hingoli: हिंगोलीच्या सराफा मार्केटमध्ये 2 गटात हाणामारी

हिंगोली -

हिंगोलीच्या सराफा मार्केटमध्ये 2 गटात हाणामारी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहानीचा व्हिडीओ व्हायरल

परस्परांच्या तक्रारीवरून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT