शहरात वादळी वाऱ्यासह तुफानी गारपीट
मिरज पूर्व भागामध्ये ही वादळी वाऱ्यासह गारपीट
बेडग व आरग सह परिसरात गारांचा तुफानी पाऊस
माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची माहिती
पेपर चोरी प्रकरण स्ट्राँग रूम हाताळणी कर्तव्य कसूर केल्या प्रकरणी केंद्र संचालक अमोल गायकवाड आणि गट शिक्षण अधिकारी सुयोग नवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला जाणार.
सकीनाक्याच्या नाहर सोसायटीमध्ये दुबईवरून ईदनिम्मित मुंबईत आलेल्या १७ वर्षीय मुलाने मोटारीने प्रतीक माने या अल्पवयीन मुलाला चिरडले. भरधाव वेगात एर्टिगा गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रतीक माने आणि त्याचा भाऊ सुमितला धडक दिली. या धडकेत प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. साकीनाका पोलिसांनी तत्काळ तपास करीत अल्पवयीन कार चालकाला घेतले.
यवतमाळ शहरातील उमरसरा येथे 21 सिलिंडर तर दारव्हा शहरात 12 असे एकुण 32 सिलिंडर जप्त केल्याची कारवाई करण्यात आली.दारव्हा शहर व ग्रामीण भागात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर गोपनीय पथकाने धाड टाकून 12 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले तर दुसरीकडे यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात नफेखोरी करण्याच्या बेतात असलेल्या साठेबाज इसमावर धडक कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 21 गॅस सिलेंडर जप्त केले.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे काढणीसाठी तयार असलेले कांदा,ज्वारी आणि गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पुढील तीन तासासाठी लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट.
लातूर जिल्ह्यात आज सायंकाळी अवकाळी पाऊस झाला, तर यावेळी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली आहे. जिल्ह्यातल्या औसा निलंगा लातूर या भागात अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांसह फळबागेच्या देखील मोठं नुकसान झालं आहे. पुढील तीन तासासाठी लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व 88 शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, संगणक टंकलेखन परीक्षा, लघुलेखन परीक्षा, अशा सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत असतात यामध्ये गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.
युद्ध थांबण्याची वाट पहात थांबले टरबूज उत्पादक शेतकरी
युद्ध संपण्याची वाट पाहताना शेतकऱ्यांनी शेतातले टरबूज तोडणी थांबवली
युद्धजन्य स्थितीमुळे 16 रुपयांनी प्रति किलो विक्री होणारे टरबूज चक्क व्यापारी सात ते आठ रुपयांनी खरेदी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले
टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या अंधेरी गावातील भयावदृश्य
वीस शेतकऱ्यांनी शेतात तोडणीला आलेले टरबूज शेतात वेलींना ठेवले
11 वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. संगमनेरच्या वडगावपान गावातील धक्कादायक घटना घडली आहे. जखमी मुलीवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेचा यंदाचा मूळ अर्थ संकल्प मंजूर करण्यात आला.23 कोटी 26 लाख रुपयांच्या अर्थ संकल्पाला जिल्हा परिषदेच्या प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली.महीला सक्षमीकरण, आधुनिक शेती,शिक्षण आणि आरोग्यासाठी अर्थ संकल्पात विशेष तरतूद करण्यात आली.पाणी पुरवठा , सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागासह अन्य विभागासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकास वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इथेनॉलने भरलेला हा टँकर वारणा येथून गोव्याकडे जात होता. गगनबावडा पासून काही अंतरावर करून घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर डोंगराकडील बाजूला गटारात पलटी झाला. या अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालकाचा पाय स्टेअरिंग खाली अडकला होता. चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी गगनबावडा व वैभववाडी पोलीसांनी शर्तीचे प्रयत्न करून क्रेनच्या मदतीने त्याला बाहेर काढले. टँकरमध्ये असलेल्या ज्वालाग्राही पदार्थामुळे दुर्घटना घडू नये. याची खबरदारी म्हणून फायर ब्रीगेडची गाडी ही दाखल झाली होती.
गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरातील दीडशे ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अन्न पुरवठा अधिकारी शहरभरात आक्रमक झालेले आहेत. आठवड्याभरात शहरातील हॉटेल्स व गॅस वितरण केंद्रावर करण्यात तपासणी करण्यात आली.
धुळ्यात पारोळा चौफुलीच्या उड्डाणपुलावर शिवशाही बसला भीषण आग, आगीत बस पूर्णतः जळून खाक झाल्याची बातमी समोर आली आहे. बसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन भडका उडाला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप केले धारण केलेले पाहायला मिळाले. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे जीवित हानी टळली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशीरा असल्याची बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारने पटसंख्येच्या कारणावरुन हजारो मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे त्याविरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे.त्याअनुषंगाने श्रमशक्ती भवन येथुन यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरविणारे धोरण रद्द करण्यात यावे. अशा विविध मागण्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
पिंपरी चिंचवड दापोडी येथील मुळा नदीच्या पात्रात आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जलपरी या विशेष वाहनासह जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला आहे. संबंधित महिलेने नदीपात्रात कधी आणि कोणत्या कारणाने उडी मारली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, महिलेची ओळख पटविण्याचे सुरू आहे. पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, 'एमटी नंदा देवी' हा गॅस टँकर 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' यशस्वीपणे ओलांडून गुजरातमध्ये पोहोचला आहे. देशांतर्गत गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश
यवतमाळ येथील आरटीओ कार्यालयातील भोंगळा कारभार विरोधात प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.शेतकऱ्यांना मुद्दामून दंड आकाराला जात असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेच्या वतीने आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढून जाहीर निषेध नोंदविण्यात आलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना आरटीओ विभागाकडून त्रास देतात आला तर आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा तसेच जिल्हा कारागृहातील भोजन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, विद्यार्थ्यांना आणि कैद्यांना वेळेवर जेवण मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू केला आहे. आश्रमशाळा, होस्टेल, सेंट्रल किचन आणि कारागृहात घरगुती सिलेंडर पोहोचवून अन्नपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम तेल व गॅस पुरवठ्यावर होत असताना, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि कैद्यांना वेळेवर दोन वेळचे जेवण मिळत असल्याचे चित्र आहे.
अमरावती -
- अनिल बोंडे यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका
- शिवाजी महाराजांवर हसून हसून बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची कृती चीड आणणारी आहे.
- धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा करताना एक नाठाळ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला
- अशा लोकांना दिसतील तिथे बडवल पाहिजे, शिवप्रेमी निश्चितच ते करतील
- आव्हाडांना विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे, अनिल बोंडेंची राज्य सरकारकडे मागणी
कोल्हापूर -
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड सुरू
पीठासन अधिकारी म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे
महायुतीच्या विनंती नंतर काँगेस च्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे अर्ज मागे
त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्ष पदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड होत आहे
पुणे -
सांगोला भूगोल पेपर चोरी प्रकरणी बोर्डाने घेतली दखल
बोर्डाचे अधिकारी सांगोल्याला तात्काळ रवाना
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे उपसंचालक स्वतः देणार घटनास्थळी भेट
सांगोल्यात भूगोलाचे पेपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना
सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील तब्बल ५० प्रश्नपत्रिका गेल्या चोरीला
पोलिसात तक्रार दाखल
पुणे -
पुणे जिल्हा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
2026 27 वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर
301 कोटीचा अर्थसंकल्प जाहीर
मागील वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा 9 कोटी रुपये अधिकचा अर्थसंकल्प जाहीर
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प
नंदुरबार -
गॅस टंचाईचा आईस्क्रीमला फटका, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दर वधारले
आईस्क्रीम कोण चा वेफर्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर केला जात असतो
उत्पादन खर्च वाढल्याने आईस्क्रीम कोण चा दरात आता पाच टक्क्यांनी वाढ
उत्तर महाराष्ट्र सिलेंडरचा साठा करणाऱ्यांविरोधात कारवाई
नाशिक जिल्हा - ५०० सिलेंडर जप्त, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
धुळे जिल्हा - ३१ सिलेंडर जप्त
जळगाव जिल्हा - ४ सिलेंडर जप्त
अहिल्यानगर जिल्हा - ८५ सिलेंडर जप्त
नंदुरबार जिल्हा - ५ सिलेंडर जप्त
नागपूर -
- नागपूर शहरात सुमारे 15 ठिकाणी छापेमारी तपासणी मोहीम
- नागपूर ग्रामीणमध्ये उमरेड येथे 2 सिलेंडर जप्त
- यवतमाळ जिल्ह्यांचा पुसद येथे 40 सिलिंडर जप्त करून एका जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- बुलढाणा जिल्ह्यात 40 ठिकाणी छापे टाकून 14 सिलेंडर जप्त केले आहेत, ही कारवाई तहसीलदार यांनी केली आहे
- वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात 6 ठिकाणी हॉटेल्सवर धाड टाकून कारवाई करण्यात आली...6 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत...
- अकोला जिल्ह्यातील 2 जणांवर कारवाई. तर 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त.
- अमरावती जिल्ह्यात एकूण तपासणी 138 ठिकाणी गुन्हे दाखल, 44 सिलेंडर जप्त...
- हिंदू संमेलनात वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ट यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल
- नागपूर पोलीस आयुक्त गृह विभाग आयोजक निशांत गांधी आणि वक्ते पुष्पेन्द्र कुलश्रेष्ट यांना नोटीस जारी
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप..
- नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी दाखल केली याचिका
- पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा याचिकेत आरोप, करत केली याचिका दाखल
- १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपुरातील चिटणीस सेंटर येथे कार्यक्रमात वक्तव्य केल्याचा आरोप...
जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी आणि 2025 चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत गोदावरी नदीच्या पात्रात उतरून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत तब्बल 90 टक्के शेतकरी वंचित राहणार राहणार असल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलनास केला आहे.सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि पीक विमा तात्काळ मंजूर करावा,अशी ठाम मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाला देण्यात आलाय
फळांचा राजा असलेल्या आंब्याचे उत्पादन यंदा घटल्याने अवाक कमी झाली परिणामी यंदा मराठी नूतन वर्ष म्हणजेच चैत्र पाडव्याला आंब्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे मात्र अजून फळ तयार झालेले नाही त्यामुळे दरवर्षी प्रमाणे खरेदी चे प्रमाण सुद्धा कमी झालं आहे. दुसऱ्या बाजूला, आंबा कमी असला तरी सुद्धा काही नागरिक पाडव्याला फळ घरी नेण्यासाठी सकाळीच मार्केट मध्ये गर्दी करतायत. यंदा पुण्यात ३००० रुपये डझन हापूस आंब्याची विक्री होतेय तर पेटीचे दर सुद्धा यंदा वाढलेत.
शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करू नये असा शासन आदेश असतानाही मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जस्मिन शेख नियमांचे उल्लंघन करत चक्क कार्यालयात केक कापून स्वतःचा वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दरम्यान कामासाठी आलेल्या दिव्यांगासह अनेक ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयाबाहेर तिष्ठत उभा राहवे लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बनावट नोटा खरेदीसाठी आलेल्या मजुरासह विक्री करणाऱ्या पेंटरला काल शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून एक लाख ३१ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.
आखाती देशात सुरु असणाऱ्या युद्धामुळे सोलापुरातील 'प्रिती डायनिंग' मधील नाश्ता बंद करण्याची आली वेळ
शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवणासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या 'प्रिती डायनिंग'मध्ये नाश्ता बंद असल्याने सुरु असणारा फक्त थाळी
जवळपास 60 ते 65 कामगारांचा उदरनिर्वाह 'प्रिती डायनिंग'मुळे सुरु आहे.
मात्र पुढील एक ते दोन दिवस पुरेल एवढाच गॅस साथ शिल्लक असल्याने पुढील काळात 60 ते 65 कामगारांच्या रोजगारावर निर्माण झाली टांगती तलवार
नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा
- गॅस काळाबाजार प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल
- 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे
मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी
कॉलेजमध्ये सापडली चिठ्ठी
पोलिसांकडून तपास सुरु
इंदापूर जवळ लोणी देवकर एमआयडीसी परिसरात भीषण अपघात...
क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने गाडी
दुसऱ्या लेन वर ट्रकवर जाऊन धडकली..
दोन्ही गाडीचा समोरासमोर झाला अपघात..
या भीषण अपघातात क्रुझरमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू...
डाळज येथील महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल..
पोलिस अधिक तपास करत आहेत
धाराशिवमध्ये गॅस एजन्सीच्या पाहेर पहाटेपासून नागरीकांनी रांगा लावल्या असुन गॅस वितरण व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाला आहे.धारशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घरपोच सुविधेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केल आहे माञ प्रत्यक्षात घरपोच गॅस सुविधा मिळत नसल्याने लोक गर्दी करत आहेत.गॅस साठा शिल्लक असताना नियोजन नसल्यामुळे गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी नागरीकातून केला जात आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. सरहद्दीतील अनधिकृत बांधकामे, दुकाने आणि इतर आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवत अनेक आस्थापनांवर बुलडोझर चालवला. यावेळी काही ठिकाणी स्थानिकांकडून विरोध झाल्याचेही समोर आले, मात्र प्रशासनाने कारवाई कायम ठेवली.
अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळातही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
"अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा अशा प्रकारची कारवाई पुढेही करण्यात येईल."
वाघोलीतील या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या मोहिमेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा कारखान्याला भीषण आग .
प्लॉट क्रमांक जे मधील कारखान्याला आग .
आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ .
कारखान्यात लागलेल्या आगी नंतर काही स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती .
स्फोटांमुळे कामगारांमध्ये भीतीच वातावरण .
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल .
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू . कारखान्यात कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची माहिती .
नाशिकच्या येवला- मनमाड- मालेगाव रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व अपघातात टाळण्यासाठी इंदोर ते पुणे या राज्यमार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक दिनांक 24 मार्चपासून दिवसा बंद करण्यात आली असून,रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत अवजड वाहतूक सुरू राहणार आहे,तशी अधिसूचना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा छगन भुजबळ यांनी या अवजड वाहतुकीची व होणाऱ्या अपघातांची दाखल घेत मंत्रालयात बैठक घेऊन दिलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला.अवजड वाहतुकी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
स्री बीज तस्करी प्रकरणामध्ये नाशिकमधील तीन आयव्हिएफ सेंटर रडारवर
नाशिकसह राज्यातील 10 आयव्हीएफ सेंटर या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा संशय
अटकेत असलेला मालती आयव्हीएफ चालक आरोपी डॉक्टर अमोल पाटील घोटाळ्याच्या केंद्रस्थानी
मालती आयव्हीएफच्या मालक डॉक्टर पत्नी वंदना पाटील अद्याप फरार
आयव्हीएफ सेंटरच्या काळा कारभारबाबत संशय
शहरातील सर्वच सेंटर आरोग्य विभागाच्या निशाण्यावर
पुणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या प्रमुख पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव समोर
भारतीय पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव, तसेच मूलभूत सुविधांची दुरवस्था यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास रखडला असून,
यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांनी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
एके काळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या शनिवारवाड्याला २०१७-१८ मध्ये १४ लाख २४ हजार पर्यटकांनी भेट दिली होती.
मात्र, ही संख्या आता लक्षणीयरीत्या घटली आहे. येथील प्रसिद्ध 'लाईट अँड साऊंड शो' तांत्रिक कारणास्तव आणि निधीअभावी बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
केवळ शनिवारवाडाच नव्हे, तर पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजणाऱ्या लोहगड किल्ल्यावरही पर्यटकांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे.
कार्ले-भाजे लेणी आणि आगाखान पॅलेस या ठिकाणीही महसुलात मोठी घट झाली असल्याचे डॉ. गोहे यांनी या पत्रात नमूद केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड आज होणार आहे. सकाळी दहा वाजता उमदेवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर, दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड होईल. तसेच १५ एप्रिलला त्या-त्या समित्यांचे सदस्य निवडले जाणार आहेत.
जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर , आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
घरगुती गॅस सिलेंडर साठी कोणीही रस्त्यावर रांगा लावू नये कारण या सिलेंडर घरपोच मिळेल त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही असा आवाहन पुणे जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर आज सकाळपासूनच गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तिला सहा दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर सिलेंडर खरेदी करण्यासाठी रस्त्यावर रांगा लावत होते. मात्र काल झालेल्या बैठकीनंतर रस्त्यावर कोणीही रांगा लावणे असा शासन आदेश जारी केला गेला. त्यामुळे वितरकांच्या बाहेर येणाऱ्या नागरिकांना तुम्हाला गॅस सिलेंडर घरपोच मिळेल त्यामुळे रस्त्यावर लाईन लावू नका असं समजावून सांगत आहेत.
उड्डाणपूर्वीच इंडिगोच्या विमानातून इंधन गळती, पायलटच्या सतर्कतेने प्रवासी सुरक्षित
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रविवारची घटना
गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेल्या इंडिगोचे 6E 6049 या विमानातील 'नोज व्हील' मधून अचानक इंधन गळती सुरू झाली
सुदैवाने विमान धावपट्टीवर असतानाच विभाग तांत्रिक पथकाच्या लक्षात आली आणि उड्डाण थांबविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला
इंधन गळती झालेले विमान सध्या नागपूर विमानतळावरच ग्राऊंडेड करण्यात आले आहे
तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती होईपर्यंत हे विमान उड्डाण करू शकणार नाही
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सिद्धनाथवाडी आणि कणूर परिसरात लागलेल्या भीषण वणव्यावर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या वणव्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती.या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले.सहा तास अथक परिश्रम घेतले.या सर्वांच्या समन्वयातून आणि कठोर प्रयत्नांमुळे अखेर वणवा आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.त्यांच्या या धाडसी कार्यामुळे मोठे नुकसान टळल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत टुरिस्ट गाईड ट्रेनिंग
सात दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार
प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा तसेच पर्यटनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार
पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि १८ ते ४५ वयोगटातील सुमारे २०० युवक-युवतींना या प्रशिक्षणाची संधी
या प्रशिक्षणामध्ये ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार
अधिक माहितीसाठी प्रादेशिक पर्यटन कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन
गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले
पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना
गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या तेल कंपन्या व वितरकांना सूचना
नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहेत
मुल पळविणारी टोळी समजून घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथे जमावाने सात जणांना बेदम मारहाण केली होती
विशेष म्हणजे जमावाकडून वाहनाची तोडफोड करून नुकसान केले, या प्रकरणात घाटंजी पोलिसांनी डुक्कर व्यापारी रामा जाधव यांच्या तक्रारीवरून पांढुर्णा येथील दहा जनाविरोधात गुन्हा दाखल केलाय
सात जणांच्या टोयट्याने व्यावसायिक संजय सोनकर यांचे मुकुटबन येथून अपहरण केले याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार देण्यास नाकार दिल्याने त्या टोळक्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.