Maharashtra Live News Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: दानवाड संगमावर ३०० वर्षांपूर्वीचा पुरातन घाट सापडला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

kolhapur : दानवाड संगमावर ३०० वर्षांपूर्वीचा पुरातन घाट सापडला

शिरोळ तालुक्यातील दानवाड येथे कृष्णा आणि दूधगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा पुरातन दगडी घाट पुन्हा उजेडात आलाय. राधाकृष्ण मंदिरासमोर मातीखाली दबलेला हा घाट ग्रामस्थ आणि युवकांनी स्वच्छता मोहिमेतून बाहेर काढलाय.

मुंबई-गोवा महामार्गावर तरुणाने केला जीवघेणा स्टंट

० मुंबई गोवा महामार्गावर तरुणाचा जीवघेणा स्टंट

० दोन्ही पाय वर घेत मोटरसायकलवर चक्क मांडी घालून केला प्रवास

० ताशी 80 ते 90 km च्या वेगात सुरू असलेल्या प्रवासामुळे स्वतःसह इतरांचं जीव देखील धोक्यात

० मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर दरम्यानची घटना

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात १९ वर्षीय तरुणाची हत्या

सिंहगड रस्ता परिसरातील आनंद नगर चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाली असून चार ते पाच जणांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. मृत तरुण धायरी भागातील रहिवासी असून करण काशीद नाव असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पूर्वी तो माणिक बागेतील अमृता नगर परिसरात राहत होता गेल्या दोन-तीन महिन्यापासून धायरीत वास्तव्यास आहे. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

मुंद्रा बंदरात 'शिवालिक' एलपीजी जहाज दाखल; ४६ हजार मेट्रिक टन एलपीजीची वाहतूक

शिवालिक हे एलपीजी वाहून नेणारे जहाज आज मुंद्रा बंदर येथील एलपीजी टर्मिनलवर दाखल झाले. या जहाजातून एकूण ४६ हजार मेट्रिक टन द्रवरूप एलपीजी आणण्यात आले आहे. त्यापैकी २० हजार मेट्रिक टन एलपीजी मुंद्रा येथे उतरवण्यात येणार असून उर्वरित २६ हजार मेट्रिक टन मंगळुरू येथे उतरवण्यात येणार आहे. ही एलपीजी खेप इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) साठी मागवण्यात आल्याची माहिती अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) कडून देण्यात आली.

मालेगावमध्ये पुरवठा विभागाची कारवाई; हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर, दोन सिलेंडर जप्त

वाशिम जिल्ह्यात पुरवठा विभागाने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत मालेगाव शहरातील दोन हॉटेल्सवर धाड टाकली. तपासणीदरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात दोन सिलेंडर जप्त करण्यात आले. ही कारवाई मालेगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून करण्यात आली असून संबंधित हॉटेलचालकांविरुद्ध पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

शिवरायांवरील वक्तव्यामुळे विधानसभेत गोंधळ; आव्हाडांनी सभागृहात मागितली माफी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून विधानसभेत मोठा गोंधळ झाला. मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करत माफीची मागणी केली. नितेश राणे यांनीही महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप करत माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर शब्दांत आव्हाडांना माफी मागण्याचे निर्देश दिले. अखेर आव्हाडांनी सभागृहासमोर हात जोडून माफी मागितली.

शिवरायांवरील वक्तव्यामुळे विधानसभेत गोंधळ; आव्हाडांनी माफी मागावी – शंभूराज देसाई

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ निर्माण झाला. मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदारजितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांना माफी मागण्याची मागणी केली. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध रंगले.

मुंबईत गॅस तुटवड्यामुळे आंदोलन

मुंबईसह राज्यात गॅस तुटवड्यामुळ आता राजकीय वातावरण ही तापले आहे. आज कांजूरमार्ग मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. डोक्यावर महिला शिवसैनिकांनी सिलेंडर घेत , हातात काळे झेंडे घेऊन मोर्चा काढला. सिंपल टेक्नॉलॉजी म्हणत गटारांमध्ये पाईप टाकून सिलेंडर भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.या वेळी मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक यात सहभागी झाल्या होत्या.

पिंपरीतील वाकडमध्ये कार गॅरेजला भीषण आग

पिंपरी शहरातील वाकड इथे एका कारच्या गॅरेजला भीषण आग लागली आहे. वाकड हिंजवडी रोड वर असलेल्या कार गॅरेजला दुपारी दीड वाजता दरम्यान अचानक भीषण आग लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने दोन अग्निशमन विरोधी बंबच्या मदतीने कार गॅरेजला लागलेली आग आटोक्यात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

पुण्यातील बालगंधर्व चौकात एन एस यु आय चा आंदोलन

गॅसची टाकी आणत सरकारी विरोधात जोरदार घोषणाबाजी

पिंपरी शहरातील वाकड इथे एका कारच्या गॅरेजला भीषण आग

पिंपरी शहरातील वाकड इथे एका कारच्या गॅरेजला भीषण आग लागली आहे. वाकड हिंजवडी रोड वर असलेल्या कार गॅरेजला दुपारी दीड वाजता दरम्यान अचानक भीषण आग लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने दोन अग्निशमन विरोधी बंबच्या मदतीने कार गॅरेजला लागलेली आग आटोक्यात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे

नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

- मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर धर्म लपवून फसवणूक केल्याचा आरोप

- लग्न करण्यासाठी धर्मांतरणासाठी बळजबरी केल्याचा तक्रारीत उल्लेख

- 2022 मध्ये युवती अल्पवयीन असताना बलात्कार केल्याची तक्रार

- इगतपुरीच्या कपालेश्वर मंदिर परिसरात बोलावून धमकावल्याचा आरोप

- कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याची पीडितेची तक्रार

- कुटुंबाला संपवण्याची धमकी देत अत्याचार केल्याची तक्रार

- घरात घुसून दोन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप

- धर्मांतर करण्यासाठी वेळोवेळी दबाव टाकल्याची फिर्याद

- 19 वर्षीय युवतीची इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

- संशयित आरोपी मुस्तफा शेख याच्यावर गुन्हा दाखल

- पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 64(2)(d), 329(2), 351(2) लावले

- पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल इगतपुरी येथे गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

जालन्यातील घनसावंगी तालुक्यात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापरांविरोधात धडक मोहीम राबवत आज 27 धाडी टाकत 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. घनसावंगी परिसरातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली.यावेळी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापर होत असल्याचे आढळून आले होते.या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत 7 सिलिंडर जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

विरोधी पक्षनेता नेमणुकीची आठवण करून देण्यासाठी घेतली भेट- उद्धव ठाकरे

चिपळूणमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रदूषण कार्यालयात नागरिकांची धडक

महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांच्या यादीत वाशिष्टी नदीचा समावेश झाल्याचा अहवाल समोर आला आहे यामुळे नागरिकांची थेट कार्यालयात धडक

या अहवालानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला

नगरसेवक साजिद सरगुरुरो आणि नागरिकांनी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात धडक दिली.

यावेळी प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला.

नदी प्रदूषित होण्यास प्रदूषण मंडळ जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

कार्यालयात जोरदार वादावादी

नागरिकांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी

क्षेत्रीय अधिकारी उत्कर्ष शिंगारे यांनाही याबाबत प्रश्न आणि

विचारण्यात आला जाब

या घटनेमुळे वाशिष्टी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Nashik: नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

नाशिक -

- म्हाडा घोटाळा प्रकरणात आरोपी सोनू मनवाणीला अटक, घोटाळ्यातील पहिली अटक

- नाशिक महापालिकेत भूसंपादन आणि नगररचनामधील प्लॅन मंजूर करण्यामध्ये सोनू मनवाणीचा हातखंडा

- कोट्यवधीचे भूखंड हडपणे तसच भूसंपादनाचा बेकायदेशीर मोबदला मिळवण्यातील अनेक प्रकरणात सहभाग

- मनवाणीला आज नाशिक न्यायालयात करणार हजर

- मनवाणीच्या अटकेनंतर नाशिक शहरातील बहुतांशी प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक नॉट रिचेबल

- २६२ एकरचे भूखंड हडपल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बड्या बिल्डरांसह १९४ जणांविरुद्ध दाखल आहे गुन्हा

Jalgaon: जळगावातील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ कामगार जखमी

जळगाव -

जळगावच्या पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला

या दुर्घटनेमध्ये 7 कामगार जखमी

साईबाबा मंदिराच्या परिसरात भक्त निवासाचे बांधकाम सुरू आहे

या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या सहस्थानिकांनी घेतली धाव

Latur: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

लातूर -

लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता

जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपाच्या उषा पाटील, तर उपाध्यक्षपदी दयानंद सुरवसे यांची निवड करण्यात आली

उषा पाटील या वलांडी जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत

उपाध्यक्ष दयानंद सुरवसे हे जानवळ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत

दरम्यान लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा सस्पेन्स हा शेवटपर्यंत पाहायला मिळाला

Nashik: नाशिकमध्ये दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू 

नाशिक -

दुचाकी अन् सायकलचा भीषण अपघात

ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नाशिकच्या येवला-कोटमगाव रोडवर ही अपघाताची घटना घडली

Mumbai: मुंबईच्या कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

मुंबई -

मुंबईच्या कांदिवली पूर्वेत अशोक नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

अशोकनगर परिसरात एका मोकळा मैदानामध्ये पोलिसांच्या मोठा बंदोबस्तामध्ये एचपी गॅस कंपनीकडून नागरिकांना पहाटेपासून सिलेंडर वितरण केले जात आहे

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा असून मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्यामुळे आज पहाटेपासून कांदिवलीमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे

गॅस कंपनीकडून आव्हान केला जात आहे सर्वांना सिलेंडर मिळणार मात्र काही अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा भीतीच्या वातावरण पसरले आहे

700 ते 800 मीटर पर्यंत लांब सिलेंडर हातात घेऊन लोकांनी भर उन्हात रांगा लावल्याचे दिसून येत आहे

Pimpari-Chinchwad: पवना नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पवना नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अग्निशमन दलाने मृतदेह काढला नदी बाहेर

पिंपरी- चिंचवड शहरातील रावेत येथे घडली घटना

पवना नदी पात्रात पोहायला गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणाचा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

तरुणाला नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पोहताना बुडून मृत्यू झाला

Pimpari-Chinchwad: पिंपरी शहरातील वाकडमध्ये कारच्या गॅरेजला भीषण आग

पिंपरी शहरातील वाकड इथे एका कारच्या गॅरेजला भीषण आग लागली आहे.

वाकड हिंजवडी रोडवर असलेल्या कार गॅरेजला दुपारी दीड वाजता दरम्यान अचानक भीषण आग लागली

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने दोन अग्निशमन विरोधी बंबच्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

Nashik: नाशिकमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थीने घेतला गळफास, तीन दिवसापासून होता बेपत्ता

नाशिक -

- त्र्यंबक तालुक्यात आश्रमशाळेतील विद्यार्थीने घेतला गळफास

- तीन दिवसापासून होता बेपत्ता

- त्र्यंबक तालुक्यातील पिंप्री माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता १० वीत शिकत होता विद्यार्थी

- संजय सदू नडगे हा विद्यार्थी गुरुवार पासून बेपत्ता झाला होता

Malval: एमआयडीसीने दोन गावांची स्मशानभूमीच केली गिळंकृत

मावळ -

एमआयडीसीने दोन गावांची स्मशानभूमीच केली गिळंकृत

संतप्त नागरिकांनी आज तहसील कार्यालयावर आणला प्रेतयात्रा मोर्चा

मावळ तालुक्यातील नवलाखउंबरे, बदलवाडी, में ठेवाडी आणि जाधववाडी परिसरातील नागरिक आक्रमक

ग्रामस्थांनी वडगाव येथून प्रेत यात्रेला सुरुवात करत पंचायत समिती चौकात येऊन ठिय्या आंदोलन केले

जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही

दरम्यान एमआयडीसीसाठी आम्ही जमीन दिलेल्या, भूमिपुत्रांनाच आज मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

Kalyan: केडीएमसी महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड

केडीएमसी महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड

स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आज महासभा आयोजित करण्यात आली होती

या महासभेमध्ये शिवसेना-भाजप महायुतीकडून सभागृह नेते पदासाठी भाजपचे नगरसेवक वरून पाटील यांची निवड करण्यात आली

Chandrapur: चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतीपदी ठाकरे सेनेच्या मनस्वी गिऱ्हे

चंद्रपूर -

ठाकरे सेनेच्या मनस्वी गिऱ्हे झाल्या स्थायी समिती सभापती

चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतीपदी ठाकरे सेनेच्या मनस्वी गिऱ्हे.

काँग्रेसचे वसंत देशमुख आणि गिऱ्हे यांना पडली समान मते

आठ- आठ मते मिळाल्यावर काढण्यात आली ईश्वरचिठ्ठी यात ठाकरेसेनेच्या मनस्वी गिऱ्हे विजयी

Pune: पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे -

पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन

विद्यार्थ्यांकडून घातला महाविद्यालयातील प्राचार्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

वसतीगृह,रस्ते आणि कँटीनच्या समस्यांबद्दल विद्यार्थी आक्रमक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला आहे ठिय्या

Kalyan: KDMC तील नगरसेवक मधुर म्हात्रे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

केडीएमसीतील नगरसेवक मधुर म्हात्रे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

मधुर म्हात्रे यांच्यावर अखेर पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात आली आहे

वारंवार नोटीस देऊनही पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे तसेच पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाज बांधवांचे आंदोलन

बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलावाडगाव येथे असलेले संत रविदास महाराज यांचे अध्ययन केंद्र व गोपीनाथ गाडे यांचे घर गावातीलच काही जणांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक न झाल्याने चर्मकार समाज बांधवांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे... गोपीनाथ गाडे यांचे घर पेटवून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली असून गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप पर्यंत अटक न होण्या मागे आमदार सुरेश धस यांचे पाठबळ असल्याचा आरोप देखील या आंदोलकांनी केला आहे.. या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार देखील या आंदोलकांनी व्यक्त केला.

आखाती देशातील युध्दाचा फटका झेंडुच्या फुलशेतीला

आखाती देशात सुरू असलेल्या युध्दामुळे मोठ्या शहरातील झेंडु फुलाची मागणी कमी झाल्याने झेंडु उत्पादक शेतकरी आर्थीक अडचणीत आला आहे.धाराशिव जिल्ह्यातुन हैद्राबाद,मुंबई,पुणे या मोठ्या शहरात फुलांची मागणी असते,या मोठ्या शहरातुन ही फुल परदेशात देखील निर्यात केली जातात माञ याच मोठ्या शहरातुन फुलांची मागणी कमी झाल्याने झेंडु चा दर हा 20 रुपये किलो पर्यंत घसरला आहे परिणामी उत्पादन खर्च ही निघत नसल्याने झेंडु लागवड करणारा शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद काम

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे दादा साईल यांची निवड झाली आहे. आज अकरा वाजता या दोघांनी अर्ज दाखल केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत पन्नास जिल्हा परिषद सदस्य असून भाजपचे 27, शिंदे सेनेचे 14, ठाकरे सेनेचे तीन तर अपक्ष सहा सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असताना अखेर प्रमोद कामात यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

विमान तिकिटांचे दर गगनाला

विमान तिकिटांचे दर गगनाला

सलग सुट्या, देवदर्शन आणि लग्न मुहूर्तामुळे सोलापूर विमानसेवेला मोठी गर्दी

सोलापूर–मुंबई विमान तिकिटाचा दर प्रथमच तब्बल ४३ हजारांपर्यंत

सामान्य भाडे ३,५००, पण मागणी वाढल्याने दरात १२ ते १८ पट वाढ

सोलापूर–गोवा विमान तिकिटही १८ हजारांपर्यंत

महागडे तिकीट असूनही विमानातील सर्व ६० सीट फुल्ल

रविवारच्या फ्लाइटमध्ये शेवटचे एक तिकीट ४३ हजारांवर

१९ ते २२ मार्च दरम्यानच्या सर्व फ्लाइट्स आधीच हाऊसफुल

सलग सुट्या, पर्यटन आणि देवदर्शनासाठी प्रवाशांची मोठी गर्दी

पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानावर महाप्रसाद बंद करण्याची वेळ

युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता धार्मिक स्थळांना देखील बसताना पहायला मिळत आहे. अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी एक असलेल्या रायगडच्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरातील प्रसादालय बंद झाल आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅस सिलेंडर अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाविकांना फक्त दर्शन घेऊनच मंदिरातून जाण्याची वेळ आली आहे. व्यवसायीक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल, ढाबे बंद होत असताना आता याचा फटका थेट धार्मिक स्थळांच्या प्रसादालयाला बसताना दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्यासाठी धावपळ

उन्हाच्या झळा वाढू लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झालीय. शहरातील ८५ पेक्षा अधिक वसाहतींमध्ये ८३ टँकरद्वारे ४८० फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळं महापालिका पाण्याच्या टाक्यांवर पाणी भरण्याची टँकरची संख्या वाढली आहे. हळूहळू एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या आणि फेऱ्याही वाढतील अशी शक्यता आहे. नव्या पाणी योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्यानं शहरात उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी पुन्हा मागच्या वर्षां सारखी स्थिती निर्माण होईल असं दिसतंय. सध्या शहरातील सातारा-देवळाईसह निसर्ग कॉलनी पडेगाव, मिटमिटा, जालना रोडवर चिकलठाणा, हिनानगर, नारेगाव, ब्रीजवाडी, हसूल, पहाडसिंगपुरा आणि केम्ब्रीजपर्यतच्या ८५ पेक्षा अधिक वसाहतींना पाणी देण्यात येत आहे. नागरिकांना एक ग्रुप तयार करून अॅडव्हान्समध्ये पाण्यासाठी पैसे भरावे लागतात. एका फेरीत एक किंवा दोन ड्रम पाणी दिल्या जाते. आठवड्यातून दोनदा हे पाणी नागरिकांना मिळते.

सेलसुरा येथे जिल्हास्तरीय कृषि व स्ट्राबेरी महोत्सव

- सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्रात अन्न व षोषण सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कृषि व स्ट्राबेरी महोत्सव

- महोत्सवात जिल्ह्यातील प्रयोगशिल शेतकरी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार

- शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच पालकमंत्री पंकज भोयर यांचं आवाहन

- मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे संचालक धनराज उंदीरवाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे आदींची उपस्थिती

- कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, कृषि विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गॅस टंचाईचा फटका, ग्राहकांच्या सकाळपासूनच गॅस एजन्सी समोर मोठ्या रांगा

इराण इजराइल अमेरिका युद्धाचा फटका आता थेट भारताला बसताना दिसून येत असून घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहक गॅस एजन्सी उघडण्याआधीच रांगा लावून उभा असल्याचा चित्र आता रोज पाहायला मिळू लागले आहे. एकीकडे प्रशासन गॅस टंचाई नसल्याचं सांगत असताना मात्र नागरिक रोजच गॅस एजन्सी समोर भर उन्हात रांगा लावून ध्यास घेण्यासाठी उभा असल्याचे चित्र पाहायला मिळते गॅस वितरण एजन्सी मात्र घरगुती टाक्या मुबलक प्रमाणावर असून मात्र व्यावसायिक टाक्या अद्याप उपलब्ध झाल्या नसून शासनाने आम्हाला व्यावसायिक टाक्या ग्राहकांना कशा पद्धतीने आणि किती टाक्या उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत माहिती मागवली आहे. ती माहिती दिल्यानंतर गॅस वितरण कंपनीला व्यावसायिक टाक्या मिळणार आहेत. त्यामुळे सध्या तरी घरगुती गॅस नव्हे तर व्यावसायिक गॅस टंचाई हळूहळू निर्माण होऊ लागली आहे.

डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

व्यवसायिक सिलेंडर मिळत नसल्याने पुणे शहरातील अनेक बडे हॉटेल सह अनेक उपरागृह चालकांवर त्यांची आस्थापना बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या "जोशी वडेवाले" यांच्या शहरातील विविध भागात शाखा आहेत पण यातील अनेकांना आता टाळं लावण्याची वेळ आली असल्याची माहिती स्वतः जोशी वडेवाले यांनी दिली आहे. बटाटा वड्याला इतर पदार्थांपेक्षा जास्त तेल लागत असल्याने स्वाभाविकपणे गॅस सुद्धा अधिक लागतो. व्यवसायिक सिलेंडर चे बुकिंग होत नसल्याने तसंच एजन्सी यांच्याकडे सुद्धा सिलेंडर उपलब्ध नसल्याने जोशी वडेवाले यांनी थेट इंडक्शन वर वडे तळण्याचा निर्णय घेतलाय

Dharashiv: हवामान बदलामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.सीझनच्या वेळी हवामान बदल झाल्यामुळे आंब्याचा तौर आणि नव्याने लागलेले आंबे गळती सुरू असल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय यासंदर्भात प्रशासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

Ambadas Danve: विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन

अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून धमक्या येत असल्याची दिली माहिती

११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च,१४ मार्च रोजी सातत्याने ९५९५९५९३०३ या मोबाईल क्रमांकाहुन फोन येत असल्याची तक्रार

१५ मार्च रोजी रात्री ०१. ५४ वाजता, ०१. ५५ वाजता आणि ०२.०० वाजता धमक्या व शिवीगाळ या मला दिल्या जात असल्याचं पोलिस आयुक्तांना कळविले

फोनवरून दोन-तीन व्यक्ती बोलत होत्या, कापून टाकू, ठोकून टाकू अशा धमक्या दिल्या जात होत्या.

या घटनेमुळे माझ्या व कुटुंबियांच्या सुरक्षेस धोका संभवू शकतो, आपण सदर घटनेची रीतसर चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Lonar Sarovar: लोणार सरोवराची पाणीपातळी वाढली; आयुक्तांचे मौन

जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवरातील पाणीपातळीत गेल्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे परिसरातील प्राचीन मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी सरोवराची पाहणी केली; मात्र त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देणे टाळले... दरम्यान, जिल्हाधिकारी किरण पाटील यांनीही ठोस भूमिका न मांडता सर्वसाधारण उत्तरे दिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाढती पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सरोवरात येणारे गोडे पाणी अडवून ते बाहेर काढण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

Jalgaon: जळगावात रिक्षा चालकांनी प्रवासी भाड्यात केली दरवाढ

जळगावात रिक्षा चालकांनी प्रवासी भाड्यात केली दरवाढ

LPG गॅसच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांनी देखील प्रवासी भाड्यात वाढ केली आहे

20 रुपयांप्रमाणे घेतले जाणारे प्रति सीट प्रवासी भाडे आता 30 रुपये

भाडे वाढीबाबत फलकही अनेक रिक्षांवर लावण्यात आले आहेत.

पंप बंद असल्याने रिक्षा चालवणे कठीण झाले असून उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड होत आहे.

गॅसच्या दरात वाढ झाल्याने नाईलाजास्तव भाडेवाढ करावी लागली असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

Buldhana: बुलढाण्यात गॅस गैरवापरावर मोठी कारवाई; १४ सिलेंडर जप्त

बुलडाणा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाने धडक कारवाई केली. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरातील सुमारे ४० हॉटेल्स व प्रतिष्ठानांची तपासणी केली.

या कारवाईदरम्यान ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून एकूण १४ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. अनेक ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅसचा सर्रास वापर होत असल्याचे उघड झाले. काही ठिकाणी कारवाईची माहिती मिळताच सिलेंडर लपवण्याचाही प्रयत्न करण्यात आला... प्रशासनाने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अशा प्रकाराला अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Bhiwandi: भिवंडीत रमजान ईद निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी शेवई खरेदीसाठी झुंबड

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत असून तीन ते चार दिवसावर ईद येऊन ठेपली आहे. ईद निमित्त शहरातील तीन बत्ती बाजारपेठ परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून. नागरिकांनी रमजान निमित्त महिलची व नागरिकांनी एकच गर्दी दिसत आहे . ईद साठी लहान मुलांना कपडे, चप्पल, महिलांसाठी विविध प्रकारचे ड्रेस तसेच महिलांसाठी कॉस्मेटिक सामान घेण्यासाठी महिलांनी बाजार पेठेत एकच गर्दी केली आहे तर दुसरीकडे रमजान निमित्ताने

शेवई खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. आखाती देशात युद्ध सुरू असून याचा परिणाम गॅस सिलिंडर देखील झाले आहे. शेवई च्या किंमती वाढतील असी भिती मनात बाळगून नागरिकांना शेवई च्या दुकानात देखील गर्दी केली आहे.

पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन कडून देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचे दिसत आहे .

Pune: पुण्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला

शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे.

दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा आणि वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.

मात्र, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

लोहगाव परिसरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि कोरेगाव पार्क परिसरात ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगरसह मगरपट्टा, चिंचवड आणि पाषाण परिसरात हे तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके होते. किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट होऊन ते १७. ७ अंश सेल्सिअस इतके होते

सकाळी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत असले, तरी दुपारी मात्र उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.

LPG Gas: गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या अन्नपुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनाला आदेश

गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या अन्नपुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनाला आदेश

गॅस वितरकांवर काही ठिकाणी हल्ले होत असल्याने त्यांच्या सह वितरण कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आदेश

गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनासह गॅस एजन्सीला देखील संरक्षण देण्याच्या सूचना

अन्न व पुरवठा विभागाने एक परिपत्रक काढले असून गॅस स्थिती पूर्वस्थितीवर येत नाही तोपर्यंत हे लागू असणार आहे

पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून त्यात पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत

Amravati: अमरावती महापालिकेच्या ५ शाळांमध्ये भौतिक सुविधांच्या कामांचे भूमिपूजन...

अमरावती जिल्हा नियोजन समिती तर्फे प्राप्त अमरावती महानगरपालिकेच्या शाळांच्या भौतिक सुविधांकरिता २ कोटी इतक्या निधी अंतर्गत महापालिकेच्या ५ शाळांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा बुधवारा येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे., मनपा हिंदी शाळा क्रमांक ७ विलास नगर येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. मनपा मराठी शाळा शेंगांव येथील कंपाऊंड वॉल व वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. मनपा शाळा वडाळी येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. मनपा शाळा नूर नगर येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. अशी विविध कामे करण्यात येत आहे. यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाचा औपचारिकता साधली. अमरावती क्षेत्रात मनपाच्या एकुण ६३ शाळा सद्यास्थितीत कार्यरत असुन यात मनपाच्या व जिल्हापरिषद कडुन वर्ग (हस्तांतरित) झालेल्या शाळांचा समावेश आहे.

Pune: 16 मे ते 14 जून मध्ये पुणे महापालिकेकडून होणार जनगणना

16 मे ते 14 जून मध्ये पुणे महापालिकेकडून होणार जनगणना

भारताची जनगणनाच्या पहिल्या फेरीचे कामकाज १६ मे ते १४ जून रोजी पार पडणार

पुणे महापालिका हद्दीतील १५ क्षत्रिय कार्यालय अंतर्गत करण्यात येणार जनगणना

जनगणना कामकाज निर्देशानुसार १ मे ते १५ मे असा नागरिकांसाठी स्वयंगणना कालावधी असणार

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदी शिंदेसेनेच्या अस्मिता केंद्रे आणि नेत्रा ठाकूर यांची नावे चर्चेत असून, यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे. तर उपाध्यक्षपदासाठी शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास चाळके यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गटांमध्ये शिंदेसेनेचे ४१ सदस्य, भाजपचे ४, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि उद्धव सेना यांना प्रत्येकी ५, तर मनसेचा एक सदस्य आहे.. जिल्ह्यात महायुती असली तरी जिल्हा परिषदेवर शिंदेसेनेची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे. त्यात अध्यक्षपदाचा मान उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, गुहागरातून जिल्हा परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर की मंडणगडमधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अस्मिता केंद्रे अध्यक्षपदाच्य मानकरी ठरणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दोघांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे, हे आज निश्चित होणार आहे.

Pune: बोर्ड परीक्षा कॉपी प्रकरणी राज्यातील १०३ कर्मचारी निलंबित

बोर्ड परीक्षा कॉपी प्रकरणी राज्यातील १०३ कर्मचारी निलंबित

सी सी टिव्ही, ड्रोन तरीही कॉपीबहाद्दर नाही थांबले

सर्वाधिक निलंबित कर्मचारी वाशिम जिल्ह्यात

वाशिम जिल्ह्यात तब्बल ५० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

काही परीक्षा केंद्रांवर मास कॉपी, मोबाईलचा वापर करून उत्तर मिळवणे, बनावट प्रवेश पत्रांच्या आधारे परीक्षेला बसणं तसेच कॉपी करण्यास मदत करणे असे विविध प्रकार

राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात आले होत्या

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा भरारी पथके तसेच काही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात असताना सुद्धा कॉपी चे प्रकरणं

वाशिम मध्ये 50 त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर मध्ये 21 तर बीडमध्ये 18 कर्मचारी निलंबित

जालना जिल्ह्यात पाच गडचिरोली मध्ये चार धाराशिव मध्ये तीन तर नांदेडमध्ये दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

शेवगाव तालुक्यातील बोधेगावात गोळीबाराची घटना..

शेवगाव तालुक्यातील बोधेगावात गोळीबाराची घटना..

कुखायत गुंड सुरेश उर्फ पिण्या कापसे यांनी गणेश कापसेवर केला गोळीबार..

गणेश कापसे यांच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी...

जखमीला उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल..

आरोपी सुरेश उर्फ पिण्या कापसे काही दिवसापूर्वीच जामीनावर आला आहे बाहेर..

गोळीबाराच्या घटनेनंतर अज्ञाताकडून केली आरोपी पिण्या कापसेलाही बेदम मारहाण...

मारहणीत आरोपी कापसेही गंभीर जखमी; त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले दाखल..

पोलीस आरोपी पिण्या कापसेला पाठीशी घालत असल्याचा जखमी गणेश कापसेने केला आरोप..

अहिल्यानगर जिल्ह्यात काही दिवसापासून गोळीबाराच्या घटनेत वाढ..

कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथे काल झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मोठ नुकसान झालं आहे... आठ ते दहा घरांची पूर्णतः पडझड झाली असून शेतीचही मोठं नुकसान झालं आहे... आज कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी नुकसानग्रस्त घर आणि शेतीची पाहणी केली... या पाहणी नंतर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अंमल महाडिक यांनी दिल्या आहेत.. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील या पाहणीनंतर आमदार महाडिक सांगितलंय

नागपूर विद्यापीठाच्या कराटे संघासोबत रेल्वेत गैरवर्तन

- राष्ट्रीय स्पर्धेसाठी ओडिशातील बालासोरकडे जाताना धावत्या ट्रेनमधील घटना

- मुलींच्या संघासोबत धावत्या रेल्वेत छेडछाडीचा प्रकार

- फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये काही टवाळखोरांची अश्लाघ्य शेरेबाजी

आंबेगावात कौटुंबिक वाद हिंसक; दिराने भावजईला कोयत्याने जखमी केले

कौटुंबिक वादाने टोक गाठत दिराने आपल्या वयस्कर सख्या भावजईवर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश धोंडीबा सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

केज तालुक्यातील नाव्होलीत मुलानेच वडिलांना केली बेदम मारहाण

बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात मुलानेच सासरच्या लोकांना सोबत घेऊन वडलासह बहिण आणि मेहुण्याला चटणी टाकुन लोखंडी पाईप आणि बेल्टने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर ची चावी आणि जमीन नावावर करून दे म्हणत स्वतःच्या मुलानेच वडिलांसह सोडवा सोडवा करण्यासाठी आलेल्या बहिण आणि मेहुण्याला देखील मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर मुलाने पालीच्या तलावात वडलाला हातपाय बांधून टाकण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीत घेऊन गेल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. काही फोटो समोर आले असून मारहाण झाल्याचे अंगावर मोठे व्रण दिसत आहेत. काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान हि घटना घडली असुन जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात केज पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सांगली... शॉर्ट सर्किटने ट्रॅव्हल्सला भीषण आग

संभाजीनगर ते सांगली मध्ये आलेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल्स गाडीला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. सांगलीच्या मारुती चौकात सकाळी सहा वाजता आल्यानंतर ही आग लागली. गाडीत सहा प्रवाशी होते ते सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणली. मात्र ट्रॅव्हल्स जळुन खाक झाली. यामध्ये प्रवास्याची बॅग ही जळुन खाक झाल्या. यावेळी बघ्याची एकच गर्दी झाली होती.

ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 30 दिवसानंतर मिळणार सिलिंडर

आखातामध्ये युद्ध भडकल्यानंतर गॅसचा पुरवठा करताना यवतमाळ जिल्ह्यात काही तांत्रिक अडचणी उभ्या झाल्या आहेत यातून ग्रामीण भागात 45 दिवसाच्या अंतराने गॅस पुरवठा केला जाणार आहे तर शहरी भागात 30 दिवसाच्या अंतराने गॅस पुरवठा करण्याच्या सूचना आहेत यामुळे पुढील काळात गॅसधारकांना गॅसचा वापर जपून करावा लागणार आहे निर्धारित काळाच्या मधात गॅस संपला तर पर्यायी व्यवस्थेवरच गॅस धारकांना अवलंबून राहावे लागणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सात लाख 70 हजार गॅस सिलिंडरधारक आहेत.

भंडाऱ्याच्या पवनीत ओमनीचा बर्निंग थरार

भंडाऱ्याच्या पवनीत मारुती कारमधील गॅस सिलिंडर गळतीनं आगीची मोठी घटना घडली. पवनी येथील या कारमध्ये गॅस सिलिंडर लावलेला होता. दुपारी दुधाच वाटप करून आल्यावर चालकानं ही कार गांधी चौक परिसरात उभी केली असताना गॅस गळती झाली आणि कार नं अचानक पेट घेतला. बघताबघता आगी नं रौद्ररूप धारण केल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली. पवनी नगर पालिकेच्या अग्निशमन पथकानं तातडीनं घटनास्थळ गाठतं आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाल्यानं कार चालकांचं यात लाखो रुपयांचं नुकसान झालं. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही.

यवतमाळ जिल्ह्यात प्रारूप प्रभाग रचनेची डेडलाइन हुकली

पाच वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रारूप प्रभाग रचना तयार करून सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या मात्र 12 मार्चपर्यंत ही प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले नाही त्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासनाला 17 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अपर आयुक्तांनी दिले आहे.

युद्धाची झळ...भंडाऱ्याच्या जंगलात चाललेल्या कुऱ्हाडीपर्यंत

इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात त्याचे विदारक पडसाद उमटत आहेत. भंडाऱ्यात सध्या गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तासनतास ताटकळत राहूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा संताप आहे. काही ठिकाणी गॅससाठी अवाच्या सव्वा किंमत मोजावी लागत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. गॅस मिळत नसल्याने ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे. कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या चुली पुन्हा पेटल्या आहेत. मात्र, या चुली पेटवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला डोक्यावर लाकडाच्या मोळ्या वाहून नेताना दिसत आहेत. एकीकडे आपण प्रदूषणमुक्तीच्या गप्पा मारतोय, तर दुसरीकडे इंधनाच्या टंचाईमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय. युद्ध परदेशात सुरू आहे, पण त्याचे चटके भंडाऱ्यातील सामान्य जनतेला बसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT