पाटणमध्ये शहीद जवानाला अभिवादन करून पालकमंत्री शंभूराज देसाई साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भरतगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात झालेला त्यांच्या नजरेस पडला. अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि थेट जखमी दुचाकीस्वाराकडे धाव घेतली. जखमी व्यक्तीची त्यांनी आपुलकीने विचारपूस करत “तब्येत ठीक आहे का?” अशी चौकशी केली आणि त्याला धीर दिला.
अज्ञाताने छत्रपतींचा पुतळा शासकीय जागेत बसवल्यानंतर प्रशासनाने ती जागा केली होती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.
आज दुसऱ्या गटाने प्रतिबंधित क्षेत्रात जाळी तोडून केला प्रवेश.
महाराष्ट्र कुस्ती महासंघाच्या विरोधात पुणे न्यायालयात करण्यात आला दावा दाखल
इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन (ISWAI) ची पुणे न्यायालयात धाव
१८ तारखेपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला विरोध आणि स्पर्धा स्थगित करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला ISWAI कडून पारंपरिक कुस्ती स्पर्धा अशा ऐतिहासिक नावाखाली आयोजित करण्यासाठी किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणतीही संलग्नता किंवा अधिकार प्राप्त नसल्याचं याचिकेतून मत
जालन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे निदर्शने..
राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत केले भाजपाने जोरदार आंदोलन..
ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज कार्यालयात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन...
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्ष नेते शहाणू पठाण, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक अभिजीत पवार, नगरसेविका मनीषा भगत,नगरसेविका मार्झिया पठाण सह इतर पदाधिकारी यांची उपस्थिती...
महाराष्ट्र केसरी स्थगित करण्यासाठी पुणे न्यायालयात दावा दाखल
महाराष्ट्र कुस्ती महासंघाच्या विरोधात पुणे न्यायालयात करण्यात आला दावा दाखल
इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन (ISWAI) ची पुणे न्यायालयात धाव
देशात निर्माण झालेल्या घरगुती गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेस यांच्या वतीने आज अनोखे आंदोलन आयोजित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज सायंकाळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे स्थानिक नागरिकांची तारामबाळा उडाली... दिवसभर उखाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला... काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे.... जोरदार आणि गारांचा पाऊस पडल्यामुळे कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथं घराचं आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालेलं आहे.
यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात मनपूर वर्तुळात रान तुळस वाढलेल्या जंगलात पेटलेला वनवनवा विझवीताना वनपालाचा होरफळून मृत्यू झाला आहे.विजय शिंगनजुडे असे मृत वनपालाचे नाव आहे. जंगलात वनवा पेटल्याचे समजतात ते वरिष्ठांच्या आदेशावरून पथकासमवेत जंगलात पोहोचले, सहकाऱ्यांसोबत आग विझवित असताना ते पुढे निघाले, दरम्यान आग वाढली, त्यावेळी त्यांचे सहकारी बाहेर निघून आले मात्र शिंगनजुडे चारही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले. त्यामुळे बचावासाठी त्यांनी झाडावर आश्रय घेतला. आगीच्या ज्वाला भडकल्याने ते झाडावरून खाली कोसळले आणि आगीनच्या ज्वालात ते ६० टक्के भाजले गेले. गंभीर जखमी वनपाल शिंगनजुडे यांचे वर सुरुवातीला शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, दरम्यान त्यांचा आज श्वासोच्छ्वास घेताना त्रास होऊ लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वनपाल वनरक्षकांना वनवनवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही, त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटने ने उपस्थित केला आहे.
मुंबईतील Mulund परिसरात एक धक्कादायक पण सुदैवाने सुरक्षित अशी घटना समोर आली आहे. देवीदयाल रोडवरील जलाराम आशिष इमारतीमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या इंजिनमधून अचानक साप बाहेर आढळल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली.
होर्मुझमधून २ LPG टॅंकर भारतात रवाना झाल्याची बातमी समोर आली आहे. याने भारतातली टंचाई टळणार.
सिलिंडर टंचाई प्रकरणी देशभरात काँग्रेस आंदोलन करीत आहे. याप्रकरणी गोगावले यांनी काँग्रेसवर टिका केली आहे. काँग्रेसच्या हाती काही राहिल नाही म्हणून असं काही करून पत्रकार आणि जनतेच लक्ष वेधण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचा आरोप गोगावले यांनी केला आहे.
शिरपूर तालुक्यातील बुडकी शेतशिवारात गव्हाच्या पिकाला भीषण आग
वीज तारांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीने लागली आग
काढणीला आलेला सुमारे एक ते दीड एकर गहू जळून खाक
आगीत अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान
शेतकरी व ग्रामस्थांनी धाव घेत आग आणली आटोक्यात
सुदैवाने शेजारच्या शेतकऱ्यांचे पीक वाचले आहे
शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत काढून ठेवलेलं गावाचं पीक संपूर्णतः जळून खाक झाल्याने शेतकरी हतबल
* नवीन नाशिक परिसरातील ओम कॉलनी येथील घटना
* चार ते पाच नागरिक घटनेत जखमी
* संतप्त जमावाने कारचालकाला दिला चोप
* कारचालकासोबत असलेले दोन युवक घटनास्थळावरून फरार
* काल रात्री घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आखाती देशात युद्ध स्थितीमुळे गॅसचा निर्माण झालेला तुटवडा, त्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक शेगडी चा पर्याय स्वीकारला आहे.. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे इलेक्ट्रिक शेगडीचा देखील तुटवडा सांगली जिल्ह्यात निर्माण झाला आहे.. इलेक्ट्रिक शेगडीचा खप अवघ्या तीन दिवसात प्रचंड वाढल्याने,उपलब्ध असणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक शेगड्याची विक्री झाली आहे.. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक शेगडया खरेदी केल्याने, अनेक दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगड्या शॉर्टेज झाल्या आहेत.. त्यामुळे आता
शेगड्यांची बुकिंग घेण्यात येत असून दहा दिवसांच्यासाठी वेटिंग असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा तिढा सुटलेला आहे तशा प्रकारे पालक मंत्री पदाचा तिढा सुटेल
० मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील बुनियादी प्राथमिक शाळेला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. सुदैवानं शाळा सकाळ पाळीत असल्यानं ती सुटलेली होती, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीनं शाळेच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढले आहेत. दुपारच्या परिसरात अचानक आग भडकली. नशीब बलवत्तर म्हणून शाळेची वेळ सकाळी ८ ते ११ अशी होती, अन्यथा आज अनेक निष्पाप जीवांना धोका निर्माण झाला असता. या आगीच्या निमित्ताने एक भयंकर वास्तव समोर आलं आहे. ही शाळा की 'तळीरामांचा अड्डा'? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण आगीच्या जागी दारूच्या बाटल्या, ग्लास आणि सिगारेटची पाकिटे आढळून आली आहेत. एकीकडे शासन डिजिटल शाळांच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे भंडाऱ्यातील ही शाळा असामाजिक तत्त्वांच्या विळख्यात सापडली आहे. प्रशासनाची ही उदासीनता पालकांमध्ये संताप निर्माण करणारी आहे.
सोन्याच्या दरात गेल्या 24 तासात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली असून जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1 लाख 59 हजार रुपयांवर तर चांदीचे दर दोन लाख 65 हजार रुपयांवर आले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात ऑइलचे संकट निर्माण झाल्याने अनेक देशांनी गुंतवणूक ही ऑइल कडे वळवली असून त्यामुळे सोन्या चांदीच्या भावावर मोठा परिणाम होत असल्याचे मत सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे.
कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून नाशिकला जाऊन स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे
परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर अतिशय गंभीर घटना घडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन नराधमांनी आपल्या घरी लाडाने बोलावून घराचा दरवाजा बंद करून एका नराधमाने त्या चिमुकलीचे हात पाय बांधले तोंडामध्ये कपड्याचा गोळा कोंबून ठेवला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आणि कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकू असे धमकावून पीडित मुलीला सोडून दिले.
हा सर्व प्रकार त्या मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आई-वडिलांना सांगितला असता तिच्या आई-वडिलांनी लगेच परळी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून त्या दोन नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गु.र.न 125/2026 कलम 64,127(2),351(2),352,3(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 4,17 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल झाला. यामधील दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. त्या नराधमांचा तपास उपविभाग अंबाजोगाई पिंक पथक आणि स.पो.नी संतोष जाधववर हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.
सलग तिसऱ्या दिवशीही अमरावती ठरले देशात सर्वाधिक उष्ण शहर, आजही 41.8 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद
सलग तिसऱ्या दिवशी अमरावतीत सर्वाधिक तापमानाची नोंद, विदर्भातील सहा शहरांचे तापमान 40 अंशांच्या वर
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे
ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे
त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीत देशातील 41.8 अंश सेल्सियस सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया
पुढील १ महिन्यासाठी मोहोळ यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत
डॅाक्टरांनी केली मोहोळ यांच्या पायावर शस्त्रक्रिया
आखाती देशात युद्ध सुरू असल्याने सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाली आहे. नांदेड मध्ये देखील गॅस टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. नांदेडच्या कौठा भागात गॅस मिळवण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या. ऑनलाइन बुकिंग करून देखील गॅस मिळत नसल्याने नागरिक एजन्सी बाहेर रांगा लावत आहेत. घरात गॅस संपल्याने अनेकांनी चुली पेटवल्याचे नागरिक सांगत आहे.
पुण्यातील काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई
मटन दुकानदारांना दमदाटी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिपू पठाण आणि त्याचे साथीदार काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटन दुकानदार आणि हॉटेल चालकांना धमकवायचे आणि पैसे मागवायचे.
खरेदी करण्याच्या पाहण्याने दुकानदारांकडे जाऊन दर महिन्याला पाच हजार खंडणी देण्याची मागणी करायचे
पैसे दिले नाही तर मारून टाकण्याची देखील धमकी द्यायचे
या सर्व प्रकारानंतर दुकानदारांनी थेट काळेपडळ पोलीस स्टेशन गाठून टिपू पठाण आणि त्याच्यासोबतच्या सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून पोलिसांनी आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे
खातातील युद्धामुळे देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला असताना एलपीजीला पर्याय ठरू शकणारे ‘डायमिथिल इथर’ (डीएमई) हे इंधन संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार करण्याची कामगिरी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) केली आहे. ‘डीएमई’च्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक संप्रेरक (कॅटलिस्ट) ‘एनसीएल’ने विकसित केला आहे. ‘डीएमई’चा इंधन म्हणून स्वतंत्रपणे, तसेच ‘एलपीजी’मध्ये मिश्रण करून वापर शक्य असून, ‘डीएमई’च्या प्रायोगिक तत्त्वावरील व्यावसायिक उत्पादनासाठी पिरंगुटनजीक प्रतिदिन २५० किलो क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
भुमच्या गोलाई चौकात छञपती शिवाजी महाराजांचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून गेली अनेक वर्षापासूनचा आहे वाद
माञ भुम शहरातील गोलाई चौकात मध्यरात्री शिवप्रेमींनी बसवला छञपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर आज शिवप्रेमी पुजा करत असताना आंबेडकर प्रेमी बांधवांनी याच चौकात आंबेडकरांचा पुतळा आणत पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला सुरू
गोलाई चौकात दोन्ही महामानवाचे पुतळे आमने - सामने ठेवल्याने मोठा गोंधळ
गोलाई चौकात कोणताही पुतळा बसवण्यास प्रशासनाची परवानगी नाही
गोलाई चौक परिसरात तणावाचे वातावरण,पोलिस घटनास्थळी दाखल
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहराजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटर परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कोकणात शनिवार रविवार सुट्टीला आलेल्या पर्यटकांना मोठा सामना करण्याची वेळ आलीय. माणगाव ते खरवली दरम्यान 3 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहने कोंडीत अडकलीत.
पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर ते चाकण वाहतुककोंडी
कडाक्याच्या उन्हात १० किलोमीटर वाहनांच्या रांगा
अवजड वाहनांसह प्रवाशी वाहने अडकली वाहतुककोंडीत
वाहतुक पोलीसांची उन्हात वाहतुककोंडी काढण्यासाठी मोठी कसरत
वाहतुककोंडीतुन प्रवाशी हतबल रुग्नवाहिकाही अडकल्या
युद्धाचा परिणाम आता जगातील अनेक देशांवर दिसून येत आहे.
मंगल कार्यालय व्यवसायिकांनी पेटवल्या चुली
लग्नातील मेनू झाला कमी
मंगल कार्यालय व्यावसायिकांना पुढील काही दिवस करावा लागणार त्रास सहन
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा...
साईभक्तांना आजपासून मिळणार एकच लाडू प्रसाद पाकीट...
एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय...
गॅस वापरात काटकसर करण्यासाठी साई संस्थानचा मोठा निर्णय...
दिवसभरात 45 हजार लाडू पाकिटांची होते विक्री...
तर दररोज दर्शनरांगेत 50 हजार बुंदी पाकीटांचे भाविकांना होते मोफत वितरण...
गॅसटंचाईमुळे साईसंस्थानला बसणार आर्थिक फटका...
तळोद्यात किरण गॅस एजन्सीचा मनमानी कारभारामुळे नागरिक संतप्त....
गॅस एजन्सी समोर नागरिकांचा गोंधळ....
गॅस सिलेंडर साठी तळोद्यात महिलांचा संताप..
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटात भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना
सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही मात्र दोघेजण गंभीर जखमी
घाटातील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती
अपघातात कारच मोठ नुकसान
घाटात काही ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाल्याने अशा अपघातांची संख्या वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे
अपघाताची माहिती मिळताचं पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत, क्रेनच्या सहह्याने ही कार दरितून बाहेर काढली.
धाराशिव - बोरफळ रस्त्यावर सांजा गावाजवळ बसचा अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली
दुचाकी वाहनाला साईड देताना बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात गेली
बसमध्ये 10 ते 15 प्रवासी असल्याची माहिती, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही
धाराशिव ते बोरफळ या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहन धारकांना करावी लागेतय मोठी कसरत
रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी
ठाण्यातील वर्तक नगर नाका परिसर येथे असलेल्या खुल्या मैदानात आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली होती. सदरची आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये..
अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या या युद्धामुळे आखाती देशांतील वाहतूक आणि निर्यात व्यवस्थेवर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसतोय
- महामेट्रोचे हिंगणा मार्गावर वानाडोंगर परिसरात मेट्रो कार्य निर्माणाधिंन कार्य सुरू आहे...याच कामादरम्यान अपघात, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली
- नागपूरच्या वानाडोगरी परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान मध्यरात्री घडला अपघात
- मेट्रो सेगमेंट बसवण्याचे काम सुरू असताना क्रेनमधील पट्टी अचानक तुटल्याने सेगमेंट खाली कोसळल्याची घटना घडली.
- घटनेनंतर कामगारांमध्ये काही काळ भीतीच वातावरण पसरल. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- मेट्रो प्रकल्पाच्या हेवी मटेरियल लावण्याच काम सुदैवानं मध्यरात्री चालते, अन्यथा मोठी दुर्घटनेची भीती टाळता येत नाही...
- मेट्रोकडून जीवितहानी झाली नसल्याचं केलं स्पष्ट
केळीचे पीक अज्ञातांनी कापून नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी या गावातील हा प्रकार आहे. या गावातील जवळपास सहा ते सात शेतकऱ्यांची केळी आज्ञातांनी कापून टाकली. मध्यरात्री शेतात कोणी नसल्याचे पाहून अज्ञातांनी हे कृत्य केले. केळी सोबतच केळीतील ठिबक पाईपलाईन देखील आज्ञातांनी तोडून टाकली आहे. या प्रकारामुळे पार्डी गावातील जवळपास सहा ते सात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान आरोपीचा तात्काळ शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
द्वारका अंडरपास कामात सापडली 125 वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कलवर सुरू आहे अंडर पासचे काम
द्वारका सर्कलवर काम सुरू असताना 10 फूट रस्ता खोदल्यानंतर सापडली पाण्याने भरलेली विहीर
विहीर पूर्ण पाण्याने भरलेली असून तिच्यात पाण्याचे जिवंत झरे
पाण्याने भरलेली ही विहीर 1900 सालातील असल्याची स्थानिक नागरिकांची माहिती
या विहिरीचे प्रशासनाने जतन करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
भविष्यात या विहिरीच्या पाण्याचा नाशिककरांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने या विहिरीचे जतन करण्याची मागणी
शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात खा. सुनिल तटकरे यांनी दाखल केला आब्रु नुकसानीचा दावा
आ. थोरवे यांच्यासह गुगल आणि गुगल LLC विरोधात माणगावच्या सत्र न्यायालयात दावा दाखल
27 डिसेंबर 2025 ला कर्जत येथे मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी आ. थोरवे यांनी मुलाखतीत तटकरे यांच्यावर केले होते गंभिर आरोप
रायगडमध्ये रक्तरंजित राजकरण, सुनिल तटकरे, कार्यकर्त्यांना जीवे ठार मारण्यात येत आहे आदी मुद्द्यांवर थोरवे यांनी दिली होती मुलाखत
०65 कोटी रूपयांचा दाखल केला आहे दावा
इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाच्या परिणामांची झळ आता शेगावपर्यंत पोहोचली आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गॅस सिलेंडर मिळत नसल्याने व गॅस सिलेंडरच्या दरवाढी मुळे छोटे व्यवसायिक वर संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे काही व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत तर काहींनी खाद्य पदार्थचे दरवाढ़ केली आहे.. कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता आणि पोह्यांचे दर वाढवले आहेत. काही छोट्या हॉटेल्सना तर सिलेंडरअभावी दुकाने बंद ठेवावी लागली. दरम्यान, सर्वांना घरगुती गॅस मिळेल, नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून, येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्यमहाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या काळात प्रामुख्याने दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल
विशेषतः अठरा ते वीस मार्च दरम्यान या नैसर्गिक घडामोडींची तीव्रता वाढणार असून काही भागात गारपीटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे
धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या पुढाकारातून १४ वर्षे पूर्ण परंतु १५ वर्षे पूर्ण नसलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम ८ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे.भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळावे हा या मोहिमेचा उद्देश असून ही लस जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात आली आहे.पात्र मुलींनी वेळेत ही लस घेऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
गुढीपाडवा ते मृग नक्षत्र दरम्यान दररोज करण्यात येणाऱ्या विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेची नोंदणी फूल्ल झाली आहे.
मंदिर समितीने 13 मार्चपर्यंत भाविकांना पूजेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरातील भाविकांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चंदन ओटी पूजेची ऑनलाईन नोंदणी केली. अवघ्या दोनच दिवसांमध्ये पूजेची नोंदणी फुल्ल झाली आहे.
ग्रीष्म ऋतू मध्ये विठुरायाला शितलता मिळावी यासाठी गुढीपाडव्यापासून ते मृग नक्षत्रापर्यंत दररोज सायंकाळी चार वाजता चंदन उटी पूजा केली जाते. यासाठी दररोज एक ते दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाच्या सर्वांगाला लावला जातो.
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार रुपये तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 9 हजार रुपये देणगी शुल्क आकारण्यात आले आहे. यादरम्यान विठ्ठलाच्या 48 तर रूक्मिणी मातेच्या 46 पूजा होणार असून यातून मंदिर समितीला 14 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
पुणे परिमंडळात महावितरणची मोठी थकबाकी
३१९ कोटी रुपये वीजबील थकल
ग्राहकांना वीजबील भरण्याचं आवाहन
आता पर्यंत ७ हजार १२२ ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित
वीजबील भरा अन्यथा आम्ही वीज कनेक्शन बंद करण्याचा इशारा
अमरावती ठरले देशात सर्वाधिक उष्ण शहर,शुक्रवारी तब्बल 41.8 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद
सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीत सर्वाधिक तापमानाची नोंद, विदर्भातील सहा शहरांचे तापमान 40 अंशांच्या वर
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे
ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे
गुरुवारी अमरावती येथे पारा सरासरीपेक्षा 6.8 अंशाने वाढून 42.2 अंशांवर पोहचला होता
त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीत देशातील 41.8 अंश सेल्सियस सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली
याशिवाय अकोला येथे 41.5, यवतमाळ 40.4, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी 41.4, नागपूर 39.4 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले
पश्चिम विदर्भातील शहरांमध्ये दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
नागपुरात समोसे आणि तरी पोह्याच्या किमती वाढणार
अमेरिका इस्त्रायल विरुद्ध इराण युद्ध आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले व्यावसायिक गॅस तुटवडामुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत आहेत.. आर्थिक ताळमेळ बसवताना प्रचंड अडचणी येत आहे
यांमुळे काही हॉटेल व्यवसायिकांनी समोसे आणि तर्री पोहा यांच्या किमती वाढवल्या आहेत... नागपुरातील समोसा उद्यापासून 35 रुपये प्लेट ऐवजी40 रुपये प्लेटने (दोन समोसे ), तर तर्ररी पोह्याच्या किमतीत पाच रुपये प्लेटने वाढणार... पोहे 35 रुपये प्लेट ऐवजी चाळीस रुपये किमतीने मिळणार
आखाती देशातील युद्धाचा गैरफायदा घेत भंडाऱ्यात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचा वापर करून भंडाऱ्यात काही व्यावसायिक व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या दिवशी भंडाऱ्यात छापेमारी करण्यात आल्या. या कोष्टी भोजनालय, भाऊची खानावळ आणि मोठा बाजार येथील दामोधर हॉटेल इथं छापा टाकून घरगुती वापराचे ८ सिलेंडर जप्त करण्यात आले. पुरवठा विभागांना सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी करीत आतापर्यंत ४५ सिलिंडर जप्त करून व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असून नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केलं आहे.
पश्चिम विदर्भात पाणी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे..
पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा अप्पर वर्धा धरणात सध्या 57% जलसाठा आहे..
पश्चिम विदर्भात एकूण 288 प्रकल्प आहेत..
यामध्ये 9 मोठे, 7 मध्यम आणि 272 लघु प्रकल्प आहेत..
सर्वात कमी जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात आहे. 34% सध्या जलसाठा खडकपूर्णा प्रकल्पात शिल्लक आहे..
त्यामुळे येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे..
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शाळेच्या अधिकृत वेळेत हजेरी दाखवून विद्यार्थी चक्क खासगी शिकवणीला (ट्यूशन) जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आता संपूर्ण जिल्ह्यातील शाळांच्या तपासणीचे आदेश दिले असून, या प्रकाराला थेट मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरले जाणार
वाशिमच्या हिंगणवाडी येथे विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीच्या घटनेतून 6 एकर गहू आगीत जळून खाक झाला आहे.. पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यात वीज वितरण च्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं बघायला मिळालं. वाशिम जिल्ह्यातील ही तिसरी घटना असून तिन्ही घटनेत वेगवेगळ्या ठिकाणी गहू जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झालं.
यवतमाळ शहरातील उमरसरा भागात तीन फोटो मागे असलेल्या गल्लीत एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला भर वस्तीत ही थरकाप उडविणारी घटना रात्री दरम्यान घडली या प्रकरणात पोलिसांना तिघांवर संशय असून त्यांचा शोध घेतला जात आहे खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही अमोल खडसे राहणार पाठीपुरा असे मृतकाचे नाव आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युदधपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामात येणारा कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर हाईल आणि 1 जून पर्यंत दोन्ही बायपास सुरू होतील अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोकण रेल्वेच्या वरीष्ठ अधिकारयांशी चर्चा केली. कोकण रेल्वेच्या विद्युत पोलमुळे बायपासच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. हे अडथळे लवकरच दूर केले जातील असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.