उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहे
जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची सुनेत्रा पवार घेणार भेट
उद्या सकाळपासून सुनेत्रा पवार सर्किट हाऊस मध्ये राहणार उपस्थित
जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या घेणार भेटीगाठी
प्रत्येक तालुक्यासाठी वेळ राखीव
जिल्हा परिषद अध्यक्ष कोण करायचा? यावर सुद्धा उद्या चर्चा होण्याची शक्यता
पुण्यातील संगमवाडी येथे धावती रिक्षा झाली पलटी
रिक्षा चालकाच नियत्रण सुटल्याने रिक्षा झाली उलटी
सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही तसेच रिक्षा चालक बचावला
ही संपूर्ण घटना एका बाइकरायडरच्या कॅमेऱ्यात कैद झाली
सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद उघड झाले आहेत. आमची भूमिका ठरवणारा भाजपा कोण, असा सवाल उपस्थित करत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. गरज भासली की हे आमचेच आहेत असे म्हणायचे, मात्र आमची भूमिका आम्हीच ठरवू, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेत कोणासोबत जायचे, याचा निर्णय नूतन सदस्य आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाईल. त्यानंतर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल आणि अंतिम आदेशानंतरच निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अवघ्या दोन दिवसांत झालेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. बुधवारी रात्री एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच चोवीस तास पूर्ण होण्याआधीच नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दोन गटांतील वादातून गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली. बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारात अबरार शेख हा युवक गोळी लागून जखमी झाला होता. तर गुरुवारी घोडेगाव येथे झालेल्या घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सलग दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
विमानातील ब्लॅक बॉक्स सोबत आणखी एका अनुषंगाने तपास होणार
अपघातग्रस्त विमानाच्या "फ्लॅप" संदर्भात तांत्रिक बाबींची होणार तपासणी
विमान उतरवताना केलेल्या प्रयत्नावेळी विमानाचे फ्लॅप खाली घेतले होते का याचा तपास महत्वाचा
लँडिंगदरम्यान फ्लॅप्स पूर्णपणे उघडलेले होते का? जास्त ड्रॅग आणि जास्त लिफ्ट निर्माण झाला होता का?
ज्यामुळे विमान स्टॉल न होता कमी वेगात तीव्र उताराने खाली आलं होतं का?
- मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- मराठीला गावठी भाषा म्हणून हिनवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फिजिक्सवाला विद्यापीठ क्लासेसमध्ये घातला होता राडा
- क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग
० रायगड जिल्हा परिषदेत सर्वात मोठ पक्ष शिवसेना असला तरी सत्ता स्थापने करीत भाजपच्या मदतीची गरज
० राष्ट्रवादीने आधीच भाजप सोबत सत्ता स्थापनेचा दावा केल्याने निर्माण झाला होता पेचप्रसंग
० दक्षिण रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादी सोबत तर उत्तर रायगडमध्ये शिंदेसेने सोबत युती केली होती
० दक्षिण रायगडमध्ये शिंदे सेनेला तर उत्तर रायगडमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या
० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता समिकरणावर चर्चा शिवसेना आमदारांची चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती
० मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडियावर ठेवल्याने रायगडच्या राजाकारणात खळबळ
पुणे महापालिकेच्या पहिल्या सभेत अनेक कार्यकर्ते सभागृहात रिल्स काढत होते
या घटनेचा निषेध करत आता पुणे शहर माजी महापौर संघटनेने नागपुरे यांना पत्र पाठवले आहे
पहिल्या सभेत महापालिका सभागृहात अनेक कार्यकर्ते अनधिकृतपणे रिल्स काढत होते, यापुढे हे असं होणार नाही याची काळजी घ्यावी आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल अशी भूमिका ठेवावी
पुणे माजी महापौर संघटनेचे महापौर मंजुषा नागपुरे यांना पुणेरी स्टाईल पत्र
अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा तिवसा रोडवर भीषण अपघात..
मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात..
या अपघातात दुचाकीवर असलेल्या वाढोना येथील सरपंच प्रशांत हुडे जागीच मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल
ठाण्यातील कल्याण शिळफाटा रोड वरील शिळफाटा सर्कल या ठिकाणी एका टेम्पोला अचानक आग लागली होती. त्या टेम्पोमध्ये प्लास्टिकचे ड्रम अणि कलरची पावडर होती. सदर घटनेनंतर वाहनचालक बाहेर आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दल विभागाला यश आले आहे.
नंदुरबार रेल्वे स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवण्यात यावा भीम आर्मीची मागणी
पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांकडे डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याची मागणी भीम आर्मीची मागणी
अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणीची रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे ठिय्या आंदोलन
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन मिळेना
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ११ महिने कार्यरत होते, मात्र शिक्षण विभागाच दुर्लक्ष झाल्याने तालुक्यातील १५७ युवा प्रशिक्षणार्थी गेल्या ५ महिन्यांपासून विद्यावेतनपासून वंचित असून पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेल्या ५ महिन्यांपासून हजेरी अपलोड झालेली नाही. १५७ पैकी ३० टक्के प्रशिक्षणार्थी यांच्या हजेरी अपलोड झाल्यात तर उर्वरित प्रक्षणार्थींकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्यानं हजेरी अपलोड झालेली नाही. त्यामुळे विद्यावेतनापासून वंचित प्रशिक्षणार्थींनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
खाजगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण मनसे पदाधिकाऱ्यांना भोवले
मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मराठीला गावठी भाषा म्हणून हिनवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फिजिक्सवाला विद्यापीठ क्लासेसमध्ये घातला होता राडा
क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल
चंद्रपूर महापौर पदग्रहण समारंभात उफाळून आली भाजपमधील गटबाजी.. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महापौर संगीता खांडेकर यांनी स्वीकारला पदभार. मात्र या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करीत, आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील सतरा नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर टाकला बहिष्कार..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दर्यापूरच्या तामसवाडी फाट्यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या वतीने शिवछत्रपती शंकरपटाचे आयोजन करण्यात आले... 9, 10 आणि 11 फेब्रुवारी पर्यंत या शंकरपटात अवघ्या 7 सेकंदात मध्यप्रदेशच्या बैतुल येथील महिला शेतकरी आण्विका राठोड यांच्या देवा आणि कॅप्टन या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावलं.. यावेळी मध्यप्रदेश सह संपूर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने बैलजोडी दाखल झाल्या होत्या.. शंकरपट पाहण्यासाठी सुद्धा मोठया चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकासह विभागातील विविध स्थानकांचा आढावा घेतला. स्थानकांवरील उपलब्ध सुविधा, प्रवाशांच्या अडचणी तसेच देखभाल व सुरक्षेच्या बाबींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेकडून वार्षिक तपासणी मोहीम राबविण्यात येत असून उधना ते नंदुरबार दरम्यानच्या सर्व स्थानकांची बारकाईने पाहणी केली जात आहे. रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांचाही आढावा महाव्यवस्थापकांनी घेतला असून भविष्यात नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतही प्रशासन सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदीप कुमार यांच्या दौऱ्यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या सुविधा आणि विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साधणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद
पुढील आठवड्यापासून सुनेत्रा पवार पक्षातील प्रत्येक आमदारासोबत करणार संवाद
पक्ष संघटन मजबुतीसाठी, तसेच आमदाराच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार बैठक
प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता अॅक्शन मोड मध्ये
श्रीरामपूर न्यायालयाच्या परिसरात संतप्त महिलांनी केला आरोपीवर हल्ला...
पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना घडला प्रकार...
आरोपी सचिन गोनारकर याला महिलांनी दिला चोप...
अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्यारच प्रकरणात गोनारकर याच्यावर दाखल झालाय गुन्हा...
न्यायालयाच्या आवारात आरोपीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण...
देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला जिंतूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोली पुलावर भीषण अपघात झाला. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात रोहन संजय राठोड (वय 25, रा. गंगाखेड), कृष्णा बालाजी गुट्टे (वय 25, रा. गंगाखेड),बालाजी आश्रोबा आवटे (वय 27, रा. गंगाखेड),बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय 27, रा. गंगाखेड) आदींचा मृत्यू झाला. या अपघातात गोपाळ गणेश रोकडे (वय २५, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नवापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गुजराती आणि मराठी हायस्कूल परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माकडे थेट वर्गखोल्यांत शिरून विद्यार्थ्यांचे दप्तर, जेवणाचे डबे हिसकावत असून खिडक्या-दरवाजांचेही नुकसान करत आहेत. धक्कादायक म्हणजे, माकडांच्या हल्ल्यात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. येत्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. परीक्षेपूर्वीच माकडांनी वर्गात हैदोस घातल्याने गोंधळ उडाला होता. वनविभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. पालक आणि शिक्षक तक्रार देण्यासाठी वनविभागाचा कार्यालयात गेल्यास त्या ठिकाणी अधिकारीच जागेवर नसल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात आता पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका नव्या व्यापारी कराराविरोधात देशभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सिटू संघटनेच्या वतीने आज देशव्यापी संप पुकारला असून किसान सभा, शेतमजूर युनियन आणि विविध कामगार संघटना यात सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.. अमेरिकन कृषी मालासाठी भारतीय बाजारपेठ खुली केल्यामुळे देशातील शेती व्यवस्था धोक्यात येईल, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हमीभाव, वाढती इनपुट खर्च, कामगार विरोधी कायदे आणि मनरेगा संदर्भातील धोरणां विरोधातही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाभर मोर्चे आणि निदर्शने करून हा करार रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
१९७१ साली झालेल्या भारत–पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची आणि ऐतिहासिक भूमिका बजावणारे ठाण्यातील कळवा परिसरातील रहिवासी माणिक हिराजी सांगळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कळवा परिसरासह संपूर्ण ठाणे शहरावर शोककळा पसरली आहे.
भारत–पाक युद्धाच्या काळात माणिक हिराजी सांगळे हे भारतीय नौदलाच्या INS कमोर्ता या युद्धनौकेवर कार्यरत होते.... पाकिस्तानच्या अत्यंत शक्तिशाली गाझी या पाणबुडीचा नाश करण्यात भारतीय नौदलाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशामध्ये त्यांचा सक्रिय आणि धाडसी सहभाग होता... या पराक्रमामुळे भारताला युद्धात निर्णायक विजय मिळवण्यात मोठी मदत झाली होती...देशसेवेसाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध सैन्य पदकांनी सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये संग्राम मेडल तसेच भारतीय नौदलात सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दलचा विशेष गौरव यांचा समावेश आहे.
ऑनलाईन पद्धतीने बैठक सुरू
मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार
विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील अर्थ नियोजनाच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकांना ऑनलाइन हजर
पुण्याच्या मुळशी येथील लवळे फाटा या ठिकाणी एक अपघात घडला. काल दुपारच्या सुमारास एका नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने 5 वाहनांना उडवलं. रिक्षा, कारसह दोन दुचाकींना या टेम्पोने धडक. यामध्ये 1 दुचाकीस्वाराच्या पायावरून चाकं गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी झालायं तर इतर 4 ते 5 जण किरकोळ दुखापत होऊन जखमी झालेत तर धडक बसलेल्या वाहनांचही यात मोठं नुकसान झालयं. आयशर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. आता याचं घटनेचा थरकाप उडवणारा cctv समोर आलय.. यामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकी स्वारांना उडवतानाचं दृश्य कैद झालंय.
पिंपरी चिंचवड शहरातील थरमॅक्स चौकात आज कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तसेच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केला आहे. यूएस इंडिया ट्रेड डील आणि कामगार श्रम संहिता विरोधात आज प्रत्येक राज्यात आणि देशात कामगार वर्ग आंदोलन करत आहे त्याच्याच एक भाग म्हणून उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कामगार अस्तित्व बचाव आंदोलन करण्यात आला. कामगारावर अन्याय करणाऱ्या चार कामगार श्रम संहिता रद्द करा, सर्व असंघटित कामगारांना प्रभावी सामाजिक सुरक्षा लागू करा, निश्चित मुदत कामगार कर्मचारी पद्धत रद्द करा, कामगारांना नुकसानकारक कामाचे 12 तास रद्द करा.... अशा विविध मागण्या या आंदोलनात कामगार वर्गांने केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील युवा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामुळे देशभरातील अंगणवाडी केंद्रांना टाळे लागले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पोषण ट्रॅकर ॲप बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी डिजिटल बहिष्कार टाकला आहे.
परंतु, या लढ्यात एक विदारक दृश्य पाहायला मिळाले. नेहमीप्रमाणे पोषण आहाराच्या आशेने आलेल्या चिमुकल्यांना बंद दाराचा सामना करावा लागला. अंगणवाडी केंद्राबाहेर हातात रिकाम्या ताटल्या घेऊन बसलेली ही मुले अन्नाच्या प्रतीक्षेत होती. एकीकडे शासकीय दर्जा आणि हक्काच्या वेतनासाठी भगिनींचा आक्रोश सुरू असताना, दुसरीकडे पोषण आहार न मिळाल्याने लाखो बालके आज पोषक आहारापासून वंचित राहिली आहेत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे.
जालन्यात ठिबक कंपनीला अचानक भीषण आग लागलीय.आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.जालना शहरालगत नागेवाडी परिसरातील एका ठिबक कंपनीला ही भीषण आग लागली आहे. दरम्यान घटनास्थळी चंदनझीरा पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहे.
बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश व पंचक्रोशी भागात रिलायन्स जिओ मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या महिनाभरा पासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क रेंज पूर्ण दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे, कॉल न लागणे व कॉल ड्रॉप होणे यासारख्या गंभीर तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला, बँक व डिजिटल व्यवहारांना, व्यापारी उलाढालींना तसेच आरोग्य व शासकीय सेवांना बसत आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ऑनलाईन पेमेंट, पैसे ट्रान्सफर व सरकारी पोर्टलवरील कामे ठप्प झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
पुणे सातारा महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीत खाजगी लक्झरी बसचा अपघात झाल्याची घटना
बसची पुढं चाललेल्या ट्रकला, मागून धडक बसल्याने हा अपघात झाला..
अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, बसच्या पुढील बाजूच मात्र मोठं नुकसान
अपघातानंतर बसचा चालक स्टेरिंग आणि सीट यामध्ये अडकून बसला होता.. मात्र काही काळानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं..
पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली
-अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती..त्यानंतर बस क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली
महापौर पदासाठी सात पैकी पाच जणांची माघार
भगवान वाघमारे, गुलमीर खान, (काँग्रेस) यांची माघार, तर ठाकरे गटाकडून श्याम खोबे आणि भाजपकडून तिरूमला खिल्लारे, विश्वजीत बुधवंत यांची माघार
उपमहापौर पदासाठी आता काँग्रेसचे गणेश देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीच्या नाझीमा बेगम अब्दुल रहीम यांच्यात लढत होणार
10 मतांनी गणेश देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या नाजमा अब्दुल रहीम यांचा पराभव केला
काँग्रेसचे गणेश देशमुख यांना 37 तर राष्ट्रवादीच्या नाझीमा अब्दुल रहीम यांना 27 मते मिळाली
राष्ट्रवादीचे अक्षय देशमुख मात्र अक्षय तटस्थ राहिले
नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथे शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषद शाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याच्या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे गुजरात राज्यात तयार केलेल्या मुक्तारपत्राच्या माध्यमातून विंचूर येथील शाळेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित खरेदीदाराने शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची नोंद शासन दरबारी केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकाराविरोधात शाळेचे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर गेल्या दोन तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. “शाळा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले असून शाळेची नोंद रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऑनलाईन बैठकीला लावणार हजेरी
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी वार्षिक आराखडा सादर करणार
वार्षिक आराखडा 1हजार 32 कोटींचा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने जिल्ह्याची धुरा आता पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने वर्षाची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे.
सन 2026 27 या वर्षाचा सुमारे 1032.88 कोटीचा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सादरीकरण करण्यात येणार असून त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या साठ वर्षाच्या तुलनेत सुमारे 60 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे
जिल्ह्यातील मंत्री,खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार ...
स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टी हब मेट्रो स्टेशनला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदन दिले आहे. दरम्यान, हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासकीय पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि शहरी विस्तार लक्षात घेऊन आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रो प्रकल्प साकारण्यात त्यांच्या पुढाकाराची भूमिका महत्त्वाची होती, असे नमूद करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यता मिळवणे, निधीची उपलब्धता आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे या बाबींमध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे निवेदनात म्हटले आहे.स्वारगेट हे पुणे शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून बसस्थानक, मेट्रो सेवा आणि इतर प्रवासी सुविधांचा एकत्रित संगम येथे होणार आहे. त्यामुळे हे ठिकाण ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून विकसित होत आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणाशी दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव जोडणे ही त्यांच्या कार्याला योग्य आदरांजली ठरेल, असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागातील प्रसिद्ध गावरान आंब्याला यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातपुडा पट्ट्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.हवामानातील या बदलामुळे आंब्याच्या झाडांवर करपा आणि भुरी सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा थेट परिणाम आंब्याच्या मोहोरावर होत असून, मोठ्या प्रमाणावर मोहर गळती सुरू झाली आहे. प्रामुख्याने धडगाव, मोलगी आणि अक्कलकुवा या भागात बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत ४१ इमारतींची झडती घेण्यात आली; तर शेकडो महिला-पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर, अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली.
शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात अवैध धंदे सुरू असून, काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती
दोन बांगलादेशी महिला ताब्यात
नाकाबंदीदरम्यान, रामेश्वर बिभीषण बिराजदार (वय ३१, रा. बाजीराव रस्ता; मूळ रा. तांबरवाडी, ता. औसा, जि. लातूर) याच्या ताब्यातून सात ग्रॅम चरस आणि तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले. तसेच, दोन संशयित बांगलादेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज नवी मुंबईत जनता दरबारचा आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा गणेश नाईकांचा जनता दरबार
नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून जनता दरबारचा आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे
या जनता दरबारला भाजपचे नगरसेवक सिडको अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत
गडचिरोली, मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अधिक निधीची मागणी राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आली.
जळगाव देशातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी व अभियंते गुरुवारी देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार असल्याने वीज सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रस्तावित विद्युत कायदा २०२५, वीज क्षेत्राचे खासगीकरण, स्मार्ट प्रीपेड मीटर आणि आउटसोर्सिंग धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. प्रमुख १० ट्रेड युनियन, स्वतंत्र फेडरेशन, संयुक्त किसान मोर्चा व वीज क्षेत्रातील संघटना आंदोलनात सहभागी होणार आहे. महाराष्ट्रात वीज कामगारद्वार सभा, निदर्शने आणि काळ्या फिती लावून संपास पाठिंबा देणार आहे. यात जळगावातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहे. ग्राहक सेवेत अडथळा येऊ नये असे, आवाहन संघटनांनी केले आहे. जुनी पेन्शन योजना व नियमित नोकऱ्यांसह विविध मागण्या यावेळी मांडल्या जाणार आहे.
बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.. यापूर्वी गावात पाण्यासाठी महाजल तसेच जलजीवन सह विविध योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला.. मात्र प्रत्यक्षात, नियमित गावाला नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे.. दोन महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंतांच्या दालनात धडकल्या.. ग्रामीण पाणी पुरवठा अभियंत्यांसमोर महिलांनी आपली कैफियत मांडली आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केलीय ...
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटातून जायंट किलर ठरलेल्या प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत
इथं शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव केलेल्या प्रमोद अधटराव यांना भाजपकडून मिळणार उपाध्यक्ष पदाचं गिफ्ट
कोसुंब गटात भाजप विरुद्ध शिवसेना अशी होती लढत, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ४ जागांवर मिळालाय विजय
शिंदे शिवसेना आणि भाजपची जिल्ह्याच युती असल्याने भाजपची जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची मागणी
परभणी महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवड आज होणार आहे. असे असताना काल रात्री काँग्रेसचे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्या मध्ये बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत स्थानिक पातळीवर 2 नेत्याने एकत्र राहण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे चा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे शिवसेनेच्या या 6 नगरसेवकमधून महापौर निवडला जाईल.तर काँग्रेसच्या 3 नगरसेवकमधून उपमहापौर निवडला जाईल
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
नवनियुक्त महापौर मंजुषा नागपूर यांनी आपल्या पहिल्याच पत्रात पालिका प्रशासनाला इशारा देऊन शहरातील प्रमुख नाले पावसाचे पाणी वाहून येणाऱ्या वाहिन्यांची साफसफाई 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य असून यामध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याची तंबीकली आहे याशिवाय नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती आणि पावसाळ्यातील सुरक्षिततेबाबत सविस्तर अहवाल तीन दिवसात सादर करावा असा आदेशही दिला आहे.
एमसीए हॉटेल मॅनेजमेंट साठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत...
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026 27 साठी घेण्यात येणाऱ्या एमसीए आणि एमएचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी? भाजप युवा मोर्चाकडून कार्यक्रमाला आक्षेप
सुदान च्या विद्यार्थ्यांचा सादरीकरणाला विरोध
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल
तसेच बांगलादेश च्या विद्यार्थ्यांनी लावलेला स्टॉल भाजप युवा मोर्चा ने लावला उधळून
पुण्यात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात स्टॉल आणि सादरीकरण
पुणे शहराच्या भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त
भाजप युवा मोर्चाकडून कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार
भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे नवजात बालिकेची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन वरठी पोलिसांनी पाच आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात डॉ नितेश वाजपेयी बालाजी क्लिनिक रामनगर गोंदिया समावेश आहे.२ फेब्रुवारी २०२६ रोजी महिला व बाल विकास विभागाच्या 'चाइल्ड हेल्पलाइन'वर माहिती मिळाली की, पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे (वय ४४) या महिलेने १० दिवसांची नवजात बालिका बेकायदेशीररित्या घरी आणली आहे.
प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल गुलाबाला परदेशी नागरिकांची भुरळ पडलेली आहे. त्यामुळे परदेशात मोठ्या प्रमाणावर मावळतील गुलाबाला मागणी वाढली आहे. सध्या मावळात गुलाब फुले परदेशात पाठवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परदेशात मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिले आहे..
अबरार शेख याला मनपा निवडणुकीच्या वेळेस किरकोळ कारणातून मारहाण करण्यात आली होती त्यावेळी अबरार शेख याने पोलिसांमध्ये तक्रार केली होती याचा राग मनात धरून अबरार शेख यांच्यावर रात्री अकराच्या सुमारास चार गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती..
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू केली जाणार आहे,या दृष्टीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात असून याच वेळी राष्ट्रीयकृत बँकांकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची कुठलीच माहिती अद्याप गोळा झालेली नाहीत, यामुळे शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली तर याचा लाभ जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय असा प्रश्न विचारला जाताहेत यातून राष्ट्रीयकृत बँकांमधील शेतकरी संभ्रमात सापडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.