महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने सक्ती केलेल्या मराठी भाषा शिकण्याच्या प्रशिक्षणाची आणि परीक्षेची अंतिम मुदत आता उलटून गेलीय.. आरटीओ आणि साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने राबवलेल्या या विशेष मोहिमेत लाखो चालकांनी सहभाग घेतला असला, तरी 7750 अमराठी चालत मराठीच्या परीक्षेत नापास झालेत. त्यामुळे अमराठी चालकांसमोरील अडचणी वाढल्या असून, प्रशासनाकडून आता कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जातेय. मराठी शिकण्याच्या मोहिमेत किती अमराठी चालक पास झाले आणि किती नापास झाले.पाहूयात.
एकूण अर्ज - 1 लाख 70 हजार
पास चालक - 1 लाख 40 हजार
नापास चालक - 7 हजार 750
प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेतील चालक - 17 हजार 427
नापास चालकांना पुन्हा दिलं जाणार प्रशिक्षण
दरम्यान अमराठी भाषक रिक्षा चालकांसाठी ‘मराठी माझी!’ अभियानाचा सांगता समारंभ ठाण्यात नुकताच पार प़डला.. या कार्यक्रमामुळे साम टिव्हीच्या प्रतिनिधीशी रिक्षाचालकांनी कसा मराठीत संवाद साधलाय. पाहा.
दुसरीकडे जे अमराठी चालक मराठीच्या परीक्षेत नापास झालेत.. त्यांच्यावर भविष्यात कारवाई होऊ शकते, यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले ऐका.
आता मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे मराठी न येणाऱ्या आणि परीक्षा न दिलेल्या चालकांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. प्रशासनाने यापूर्वीच मूलभूत मराठीचे ज्ञान अनिवार्य केले होते. त्यामुळे आता मराठी न बोलणाऱ्या किंवा परवाना अटींचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तसचं कारवाईनंतर 3 महिन्यात मराठी न शिकल्यास चालकांचे लायसन्स आणि परमिट रद्द होणार आहे, मात्र याची तंतोतंत अमंलबजावणी होते काय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.