लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद दौरा करत आहेत. आज शुक्रवारी ते धाराशिव दौऱ्यावर आले असता, परिसरातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला. यावेळी काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मराठा तरुणांची समजूत काढत शांतपणे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर सगेसोयरे कायद्याची अंबलबजावणी तसेच आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत देखील ठाकरेंनी मराठा तरुणांसोबत चर्चा केली. यावेळी मराठा समाजाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवेदन देखील देण्यात आलं.
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटासह भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरेंनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आज ठाकरे धारशिव दौऱ्यावर असून येथील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये दाखल होताच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी त्यांची जंगी स्वागत केले. यावेळी ठाकरे उपस्थितांना संबोधित करण्यासाठी स्टेजवर आले. त्याचवेळी मराठा तरुणांनी स्टेजला घेराव घालत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठा तरुणांची समजूत काढत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच सोहळ्याला संबोधित करताना महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं. समस्त महिला वर्गानं भारतमातेचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, असंही ठाकरे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.