maratha youth restricts mp sanjay mandlik entering in village near kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : गावबंदीवरुन मराठ्यांत जुंपली, खासदार संजय मंडलिकांनी भरला युवकांना दम

मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत आणि युवकांत बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (dudhganga vedganga sahakari sakhar karkhana election) निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी गावात प्रचारासाठी जाणा-या खासदार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) यांना गावातील सकल मराठा समाजाच्या युवकांनी गावबंदी असल्याचे सांगत अडवले. त्यामुळे काही काळ गावच्या वेशीवर खासदार मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत आणि युवकांत हमरीतुमरी झाली. खासदार मंडलिक यांनी त्यांची बाजू स्पष्ट केल्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला गेला. दरम्यान त्यानंतरही मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत आणि युवकांत बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. (Maharashtra News)

दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. खासदार संजय मंडलिक हे कागल तालुक्यातील हळदी गावांत कारखान्याच्या प्रचारासाठी गावातील मतदार सभासदांना भेटण्यासाठी आले होते.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण बाबत आपण कोणतीही ठोस भूमिका घेत नाही यावरून आपल्याला गाव बंदी केली आहे असं सांगत खासदार संजय मंडलिक यांना गावाच्या बाहेरच गाडी अडवून मराठा समाजातील युवकांनी जाब विचारला.

त्यानंतर खासदार मंडलिक यांनी मी देखील मराठा समाजातील आहे. सर्वपक्षीय मराठा नेते लाेकसभेत देखील मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहाेत. गावबंदी करणे याेग्य नसल्याचे मंडलिक यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावबंदीचा अधिकार काेणी दिला?

निवडणुका आल्या की नेते मंडळी गावात येतात नंतर गायब हाेतात असेही काही युवकांनी नमूद केले. त्यानंतर दाेन्ही बाजू एकमेकांची बाजू समजावून सांगू लागले. खासदार मंडलिक यांनी युवकांना तुमच्या भावानांशी सहमत असल्याचे स्पष्ट केले. तुम्हांला गावबंदी करण्याचा अधिकार काेणी दिला. आम्ही देखील आमच्या गावात येऊ नये असे म्हणू का. एकमेकांना सांभाळून घ्या असेही खासदार मंडलिकांनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT