Narendra Patil On Maratha Youth In Politics SAAM TV
महाराष्ट्र

Maratha Youth In Politics : 'मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये, डिपॉझिट जप्त होईल'

Jalna Breaking News : मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये, असे मोठे विधान नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

लक्ष्मण साळुंखे

Maratha Kranti Morcha Worker In Elections : मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये, असं वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. नरेंद्र पाटील हे सिंदखेडराजाला जात असताना जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज, गुरुवारी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी निवडणूक लढवली तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे नरेंद्र पाटील म्हणाले.

मराठा समाजातील (Maratha Samaj) तरुणांनी वेगळा पक्ष काढून काहीही उपयोग नाही, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना उपसमितीवरून हटवण्याची मागणी करणारे कट्टर मराठा नाहीत, असेही ते म्हणाले.

नेमके काय म्हणाले नरेंद्र पाटील ?

नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी जालन्यात आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये, असे विधान केले. पाटील हे सिंदखेडराजाला जात असताना ते बोलत होते.

जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) राज्यव्यापी गोलमेज परिषदेमध्ये मराठ्यांनी वेगळा पक्ष काढून निवडणूक लढवावी, असे एक सूर उमटला होता. पण मराठा समाजानं वेगळा पक्ष काढून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल आणि मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येवू नये. समाजासाठी काम करावं, असा सल्लाही नरेंद्र पाटील यांनी दिला.

'...ते कट्टर मराठा नाहीत'

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) असून, त्यांना हटवण्याची मागणी होत आहे. त्यावर उपसमितीसाठी चंद्रकांत पाटील ही योग्य व्यक्ती आहे. त्यांना हटवण्याची मागणी करणारे हे कट्टर मराठा आहेत का, की एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे तपासावं लागेल, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar death News LIVE Updates : अजित पवारांच्या निधनानंतर मुलगा पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना

EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Bharat Gogawale emotional reaction: महाराष्ट्राने निर्भीड व्यक्तीमत्त्व गमावलं, दादांच्या निधनाने मंत्री भरत गोगावले भावूक

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

Ajit Pawar Death: अजित पवारांचे विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT