maratha samaj took 10 decisions in gevrai beed  Saam TV
महाराष्ट्र

Ek Maratha Lakh Maratha : मराठा समाजाने घेतले 10 महत्त्वपूर्ण निर्णय, एकमताने ठराव मंजूर

Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एसआयटी चौकशी समिती स्थापन केली आहे. या निर्णयाचा समाज बांधवांनी बैठकीत निषेध नाेंदविला.

विनोद जिरे

Beed :

कोणत्याही राजकीय सभेला उपस्थित राहायचे नाही असा निर्णय बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मराठा समाज बांधवांनी बैठकीत घेतला आहे. या बैठकीत मराठा समाजाने एकूण नऊ ठराव मंजूर केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन सुरु आहे. या आंदाेलनस्थळी मराठा समाजाची एक बैठक झाली. या बैठक काही महत्त्वाचे ठराव आज झाले. (Maharashtra News)

यामध्ये सरकारने जे 10 टक्के आरक्षण दिले आहे, हे मराठा समाजाला मान्य नसून यापुढे मराठा समाजातील कोणताही व्यक्ती राजकीय सभेला जाणार नाही किंवा राजकीय पुढार्‍याच्या स्टेजवर जाणार नाही. त्याचबरोबर आरक्षणासाठी जे संविधानिक पद्धतीने आंदोलन सुरू आहे. हे जर आंदोलन चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला तर समाज जेलभरो आंदोलन करेल.जनतेला आणि व्यापाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल अशा पद्धतीचे आंदोलन मराठा समाज बांधव करणार नाही असे ठराव एका महत्त्वाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

कोणत्याही तरुणावर किंवा मराठा समाजातील व्यक्तीवर दबाव टाकून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असाही ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

मनाेज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एसआयटी चौकशी समिती स्थापन केली आहे. या निर्णयाचा समाज बांधवांकडून निषेध नाेंदविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT