Maratha Reservation Breaking Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation : ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर सात दिवस उपोषण, 'अग्निशमन'च्या टीमकडून रेस्क्यू

Maratha Reservation: सुधाकर विश्वनाथ शिंदे या व्यक्तीने तब्बल 300 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलकाला खाली उतरविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान संभाजीनगरमधील शेकटा गावात सुरू असलेल्या एका आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुधाकर विश्वनाथ शिंदे या व्यक्तीने तब्बल 300 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलकाला खाली उतरविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याची समजूत काढून सुखरूप खाली उतरवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातही मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनाचं लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल आहे. दरम्यान संभाजीनगरमध्ये शेकटा गावात मराठा आंदोलक तब्ब्ल सात दिवसांपासून एका ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून उपोषण करत होता. त्याची प्रशासनाने गावातील लोकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही.

शेवटी आज अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि सकाळपासून त्याला खाली उतरवण्याची मोहीम सुरू होती. अखेर त्याची समजूत काढण्यात यश आलं आणि दोरीच्या साहाय्याने त्याला खाली उतरविण्यात आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

SCROLL FOR NEXT