मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू.
जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’चा नारा देत १५ सप्टेंबरला मुंबईकडे रवाना होण्याची भूमिका घेतली आहे.
मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्याची माहिती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगेंनी पुन्हा एकदा 'चलो मुंबईचा' नारा देत आंदोलनावर ठाम भूमिका घेतली. 15 सप्टेंबरला समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत, दुसरीकडे मु्ंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकरलीय. त्याचदरम्यान जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आरक्षणासंदर्भात शासकीय हालचाली सुरू झाल्यात. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक होत असून मराठा आरक्षणावर खलबत्त सुरू झाली आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक होत आहे. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण आले असून ते वर्षा बंगल्यावर पोहचलेत. तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारलीय.
मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून ते उद्या पुन्हा परवानगीसाठी अर्ज करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा १७ वा दिवस आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन न केले जाईल, याचे हमीपत्र देण्यात आले होते. तरी परवानगी नाकारण्यात आलीय. दुसरीकडे परवानगी नाकारताच जरांगे आक्रमक झालेत.
उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येणारच असा इशारा दिलाय. या सर्व पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक होतेय. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करत होते मात्र सरकारच्या शिष्टमंडळाला त्यात अपयश आलंय. आता सरकार मराठा आरक्षण प्रकरणी काय निर्णय घेणार? आजच्या बैठकीत काय ठराव पास होणार ते पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.