Manoj Jarange Patil Shocking Claim in Latur Ahmadpur Maratha Reservation Meeting Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'कामधंदा सोडून अंतरवलीला या..' जरांगे पाटलांची मराठा बांधवांना हाक; येवल्याच्या सभेतून साधला भुजबळांवर निशाणा

Manoj Jarange Patil Sabha Nashik: जरांगे पाटील यांची नाशिकच्या येवल्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

अभिजीत सोनावणे

Manoj Jarange Patil News:

मराठा आरक्षणाचा लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत आहे. आज (सोमवार, ९ ऑक्टोंबर) मनोज जरांगे पाटील यांची नाशिकच्या येवल्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

येवल्याच्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे असे म्हणत सरसकट कुणबी आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हाटायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.

भुजबळांबर निशाणा...

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी "आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने त्यांचाही बंदोबस्त केला, असा टोला छगन भुजबळांना लगावला. तसेच ज्या मराठा आंदोलकावर हल्ला झाला त्यांच्यावर आज मुंबईत शस्रक्रिया आहे. आमच्यावर हल्ला का केला ? याचे उत्तर अजूनही दिले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

या सरकारला दिलेली मुदत 14 ऑक्टोबरला संपत आहे. तर आम्ही सरकारला दिलेला वेळ 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला सर्वांनी काम सोडून अंतरवलीला यायचे आहे.. असेही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT