Maratha Andolan Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 'शोले स्टाईल' आंदोलन; 300 फूट ऊंच टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी

Maratha Andolan : आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक गावांमध्ये मराठा तरुणांनी उपोषण करायला सुरुवात केली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Maratha Reservation :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारला दिलेली ४० दिवसांची डेडलाईन काल म्हणजेच २४ ऑक्टोबरला संपली आहे. मात्र सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. त्यामुळे मराठा बांधव पुन्हा आक्रमक झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा येथे प्रहार पक्षाचे पदाधिकारी असलेले सुधाकर शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. ३०० फूट उंच असलेल्या मोबाईल टॉवर जाऊन ते बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा शासन निर्णय (GR) निघत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. (Latest News)

जालन्यात दोन तरुण झाडावर चढले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करण्यासाठी दोन मराठा तरुण झाडावर चढल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. जालना तालुक्यातील पाहेगाव येथे मागच्या 13 दिवसांपासून उपोषण सुरु आहे.

राज्य सरकारने ४० दिवसात मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे मराठा बांधव आता आक्रमक झाले आहेत. बालाजी तळेकर आणि राम शेळके अशी या मराठा तरुणांची नावं आहेत. सध्या त्याठिकाणी पोलीस दाखल झाले असून गावकरीही मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत. दोन्ही तरुणांना खाली उतरण्याची विनंती केली जात आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक गावांमध्ये मराठा तरुणांनी उपोषण करायला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली आहे. आंतरवाली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलन आता राज्याच्या कानाकोपऱ्यात परसत आहे. अशात सरकार आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT