Maratha Aarakshan News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan News: "चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष"; नगरमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी

Maratha Reservation Latest News: मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केलं असून राज्यभरात अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

Ruchika Jadhav

सचिन बनसोडे

Ahmednagar News:

अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. "चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष" अशा आशयाचे बॅनर लावत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांना ग्रामस्थांनी गावात प्रवेश बंदी केली आहे. (Latest Marathi News)

सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज अधिक आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केलं असून राज्यभरात अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील ग्रामस्थांनी देखील जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. करंजी गावच्या युवकांनी गावात फ्लेक्स बोर्ड लावत आजी माजी मंत्री आणि राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण चांगलच तापलंय. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यामुळे मराठा समाजातील व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतल्यात. आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत संपण्यासाठी फक्त ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या तीन दिवसांनी आरक्षण मिळणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT