Ahmednagar Politics : चर्चा मुंबईत झाली अन् राजकीय वर्तुळ नगरचं 'ढवळलं'; विखेंनी रोहित पवारांनाच काढला चिमटा

Maharashtra Political News : सुजय विखे पाटील यांच्याविरोधात रोहित पवार रिंगणात उतरणार असल्याची चर्चेनं तर अख्खं राजकीय वर्तुळ ढवळून निघालं.
Sujay Vikhe patil Vs Rohit Pawar, Ahmednagar Politics
Sujay Vikhe patil Vs Rohit Pawar, Ahmednagar PoliticsSAAM TV
Published On

सुशील थोरात, अहमदनगर

Sujay Vikhe patil Vs Rohit Pawar News :

लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही; मात्र, त्याआधीच अहमदनगरचं राजकीय रण तापलं आहे. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात रोहित पवार रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेनं तर अख्खं राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखेंनी थेट रोहित पवारांनाच टोला लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली. शरद पवारही उपस्थित होते. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवा, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर सुजय विखेंच्या विरोधात रोहित पवार रणमैदानात उतरतील अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चेनंतर नगरचं राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. आता विखेंनीच याबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांना टोला लगावला.

काय म्हणाले सुजय विखे?

लोकसभा निवडणुकीत रोहित पवार विरोधात लढणार असल्याच्या चर्चेबाबत सुजय विखेंना प्रश्न विचारला. त्यावर मी त्यांनाच विचारून घेईल. मी चर्चा करून विश्वास ठेवणारा माणूस आहे. त्यांना आधी विचारून घेतो. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतो. त्या अनुषंगाने मग तयारीला लागतो. ते हो म्हणाले तर जास्त तयारी करावी लागेल. पण आम्ही चर्चा करून ठरवू, असं उत्तर त्यांनी मिश्किलपणे दिलं.

सध्याची राज्यातील परिस्थिती कशी आहे हे सर्व जण पाहत आहेत. मित्र-वैरी आणि वैरी-मित्र असे सर्व एकसमान झालेले आहेत. त्यामुळे सर्वजण आपापल्या मित्राच्या शोधात आहेत. नवीन मित्रांच्या सानिध्यात राहून नवीन राजकारण करता येत असेल तर, करूयात, असेही ते म्हणाले.

शिंदे-लंकेंच्या एकत्रित प्रवासावर भाष्य

अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांनी एकत्र प्रवास करत मोहटादेवीचं दर्शन घेतलं होतं. तर काही दिवसांपूर्वीच राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) लंके यांचेही नाव चर्चेत आले होते. त्यामुळं लंके आणि शिंदे हे विखे यांचे विरोधक आहेत, असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. आता याच दोन नेत्यांनी एकत्रित प्रवास केल्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलं होतं. त्यावरही विखेंनी प्रतिक्रिया दिलीय.

Sujay Vikhe patil Vs Rohit Pawar, Ahmednagar Politics
BMC Khichdi Scam: कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; मुंबई महापालिका उपायुक्तांना ईडीकडून समन्स

टीव्हीच्या माध्यमातून त्या दोघांचा दौरा बघायला मिळाला. महायुती किती बळकट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं. महायुती सर्वात आधी नगर जिल्ह्यात यशस्वी झाली असं चित्र दिसतंय. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता आणि या निर्णयाची अंमलबजावणी मोहटादेवीच्या पावनभूमीमध्ये झाली. म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असं वाटत होतं, तोच आता यापेक्षा जास्त मताधिकाऱ्यानं निवडून येईल, अशी शक्यता निर्माण झालीये, असा विश्वास विखेंनी व्यक्त केला.

Sujay Vikhe patil Vs Rohit Pawar, Ahmednagar Politics
Maharashtra Politics: कंत्राटी भरतीवरुन राजकारण तापलं! भाजपचे महाविकास आघाडीविरोधात राज्यभर 'नाक घासो' आंदोलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com