Manoj Jarange Patil Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'दगाफटका केला तर..', जरांगे पाटील यांनी सांगितला पुढचा प्लॅन

Maratha Reservation: 'दगाफटका केला तर..', जरांगे पाटील यांनी सांगितला पुढचा प्लॅन

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil Latest News:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याच दरम्यान त्यांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला आहे. दगाफटका केला तर आमची तयारी पूर्ण असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच लवकरच ते राज्यभरात दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

साम टीव्हीशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, राज्य सरकारची मदार क्युरेटिव्ह याचिकेवर आहे. मात्र त्यावर आम्हाला फारसा विश्वास नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्युरेटिव्ह याचिका हा पूर्ण उपचार नाही, तो फक्त मलम लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आम्हाला सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे हीच आमची मागणी आहे. याचाच विचार राज्य सरकारने करावा, असेही जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

जरांगे म्हणाले, ''सरकारवर विश्वास असला तरी, आम्ही दुसरी बाजू भक्कम करतोय. दगा फटक्याची भीती आहे. त्यामुळे आंदोलनाची तयारी ही आमची सुरू आहे. येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे, तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल.''

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ''गुणरत्न सदावर्ते बाबत आम्हाला बोलायचं नाही. त्यांना जे वाटतं ते करू द्या, आम्हाला कुणाचेही वाईट चिंतायचे नाही.'' मनोज जरांगे पाटील म्हणाले, ''मुंबई बैठक आमंत्रण आले आहे. मात्र मी रुग्णालयात असल्याने जाऊ शकणार नाही. उलट मलाच इथं शिष्टमंडळ भेटायला येणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT