Maratha Andolan Explainer Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Andolan Explainer: मराठा आरक्षण आंदोलनाची सर्वाधिक झळ कोणत्या राजकीय पक्षाला?; राजकीय तज्ज्ञांना काय वाटतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Andolan Explainer

मराठा आरक्षणासाठी दिलेली 'डेडलाइन' संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. मराठा समाजानं आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू केली आहे. मराठा समाजबांधव आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपासून संपर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावागावांत प्रवेशबंदी केली आहे. या आंदोलनाची सर्वाधिक झळ कोणत्या राजकीय पक्षाला बसलीय? याबाबत राजकीय वर्तुळातील जाणकारांना काय वाटतंय? हे सविस्तरपणे जाणून घेऊयात!

आरक्षणासाठी मराठा समाजानं आंदोलन तीव्र केलं आहे. मोर्चे काढले जात आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. रस्त्यांवर टायर पेटवून वाहतूक रोखली जात आहे. नेत्यांचे ताफे अडवले जात आहेत.

बीड जिल्ह्यात शुक्रवारी दोन विद्यमान आमदार प्रकाश सोळंके ( अजित पवार गट ) आणि संदीप क्षीरसागर ( शरद पवार गट ) यांची घरे पेटवण्याचाही प्रयत्न झाला. काही समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही जाळण्यात आले. भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यालयांवरही दगडफेक करण्यात आली. आंदोलनाची झळ राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक बसल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा नेते सर्वाधिक असल्याचे मानले जाते. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. मराठा समाजाच्या पाठिंब्यावर मोठे झालेल्या राजकारणी किंवा लोकप्रतिनिधींनी आरक्षण मिळवून देण्यासाठी काहीही केले नाही, असा समज झाला आणि त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१७ साली मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे निघाले होते. या मोर्चाचे आयोजन करणारे मानसिंह पवार होते. त्यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मराठा समाजाचा राष्ट्रवादीवर रोष असण्यामागे अनेक कारणे आहेत, असे सांगितले. राजकीय निरीक्षक डॉ. कुमार सप्तर्षी, राजकीय विश्लेषक व मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे माजी प्राध्यापक सुरेंद्र जोंधळे यांनीही मराठा नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सरकारमध्ये अनेक मोठी पदे भूषवलेले अजित पवार हे देखील मराठा नेते आहेत. ५० दिवस झाले तरी मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर मराठा समाजाचा राग आहे, असे मानले जाते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रातील आणि मराठा समाजाचे मोठे नेते मानले जातात. महाराष्ट्रात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा आदर करतात. जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी आल्या तेव्हा शरद पवारांनीच ओबीसीचा कोटा वाढवला, असं मानसिंह पवार म्हणाले. जेव्हा शरद पवार जरांगे पाटील यांना भेटायला गेले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. आता हाच रोष अजित पवारांनाही पत्करावा लागत आहे. असे मानसिंह पवार म्हणाले.

मराठा तरुणांना आपल्याच नेत्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे, असे मत राजकीय निरीक्षक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. गरीब आणि श्रीमंत मराठ्यांमधील हा संघर्ष आहे. राज्यात मराठ्यांची सत्ता असली तरी काही प्रभावशाली नेत्यांकडेच ती राहिली आहे. याचा शेती कसणाऱ्या मराठा समजाला मोठा त्रास होत आहे. ग्रामीण भागात मराठा समाजाची परिस्थिती बिकट आहे. ग्रामीण महाराष्ट्रात प्रस्थापित मराठ्यांनी उभारलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते, असे निरीक्षणही सप्तर्षी यांनी नोंदवले आहे.

राजकीय विश्लेषक सुरेंद्र जोंधळे म्हणाले, ''प्रस्थापित मराठा नेत्यांनी इतकी वर्षे आपल्याच समाजासाठी काहीही केलेले नाही या भावनेतून नेते आणि जनतेत दुरावा निर्माण झाला आहे. या नेत्यांनी शैक्षणिक संस्था उभारल्या, तरीही मराठा समाजातील तरुणांना त्या संस्थांमध्ये शिक्षण घेता येत नाही. नोकऱ्या मिळत नाहीत. राजकारणात घराणेशाही असल्यामुळे समाजातील नव्या नेतृत्त्वाला संधी मिळत नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT