Controversial posters of Devendra Fadnavis in Mumbai spark a banner war targeting Manoj Jarange ahead of his protest. Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

CM Fadnavis Poster In Mumbai: मनोज जरांगे मुंबई येण्याआधी लागलेल्या बॅनरमुळे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.. कारण या बॅनरमधून जरांगेंना डिवचवण्यात आलंय. मुंबईत लागलेल्या बॅनरवर नेमकं काय आहे? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • मुंबईत फडणवीसांचे फोटो असलेले वादग्रस्त बॅनर लागले.

  • या बॅनरमधून मनोज जरांगेंना डिवचवण्यात आलं.

  • मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवी ठिणगी पडण्याची शक्यता.

मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईच्या वेशीवर आलंय..मात्र त्याआधीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आलीय. हा बॅनर नीट पाहा.. इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि न्यायालयात टिकवून दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अशा आशयाचे बॅनर लागले आणि त्यावरुन नव्या वादाची ठिणगी पडलीय.मात्र या वादाची सुरुवात झाली ती मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्यानं याच वक्तव्यामुळे वाद पेटला आणि जरांगेंनी चूक लक्षात येताच यु-टर्न घेतला.. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जुनं वाक्य पुन्हा चर्चेत आलंय.

दुसरीकडे याच वाक्याचा धागा पकडत जरांगे मुंबईत पोहचण्याआधीच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील आणि निरंजन डावखरेंनी बॅनरबाजी केलीय.तर जरांगेंच्या आंदोलनाची वेळ चुकली म्हणत निरंजन डावखरेंनी मराठा आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंय. मनोज जरांगेंची रॅली मुंबईत येत असतानाच बॅनरबाजीतून जरांगेंना डिवचण्यात आलंय. त्यामुळे याच बॅनरबाजीमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

SCROLL FOR NEXT