Nanded News: Congress MLA's car Vandalized in Nanded Saam tv
महाराष्ट्र

Attack on Congress MLA's Car: मोठी बातमी! नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडली

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, नांदेड

Nanded Political News:

गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.

सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे.

आमदार मोहन हंबर्डे हे या भागात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

गुहाघरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

गुहागरमध्ये शुक्रवारी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी ठाकरे गटच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक केली. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत घटनास्थळी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडत कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT