Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक; मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

Maratha Protesters : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध ठिकाणी मराठा आंदोलकांकडून साखळी आंदोलन केले जात आहे.

Bharat Jadhav

(विनोद जिरे )

Maratha Reservation:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. मराठा आंदोलक सत्ताधारी नेत्यांवर नाराज झाले असून त्यांच्या विरोधात ठिकाठिकाणी आंदोलन केले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध ठिकाणी साखळी आंदोलन केले जात आहेत. (Latest News)

बीडच्या धारूरमध्ये मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आलाय. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार निर्णय घेत नसल्याने धारूर मधील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून धारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आलीय. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं ,एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. दरम्यान या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते.

मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केलाय. संभाजीनगर-जालना हा मार्ग तासाभरापासून रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. टायर जाळून रस्त्यात निषेध करण्यात आलाय.

कोल्हापुरात साखळी आंदोलन

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आजपासून साखळी आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील मराठा शौर्य पिठाच्यावतीने आजपासून साखळी आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलं जात आहे.

सोलापुरात आजपासून आमरण उपोषण

सोलापूरच्या कोंडी गावातील मराठा बांधवांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केलीय. मागच्या ३५ दिवसांपासून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात सहभाग व्हावा, या मागणीसाठी हे मराठा बांधव साखळी उपोषण करत होते. मात्र आजपासून या गावातील मराठा बांधवांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. यापुढील आंदोलनाची दिशा ही मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्यानुसार ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यक्रम रद्द

बारामती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकील्ला. या बाल्ले किल्यातच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की अजित पवारांवर ओढवलीय. मराठा क्रांती मोर्चानं केलेल्या विरोधामुळं अजित दादांना माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम रद्द करावा लागलाय. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन तीव्र होताना दिसतंय. राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी आणि त्यांच्या कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतलीय. त्यांचा हा विरोध कीती तीव्र आहे, याची प्रचिती बारामतीमध्ये आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone Discount Price: आयफोन झाला स्वस्त प्रत्येकाचा वाढणार स्वॅग; जाणून घ्या आयफोन १५, १६ प्लसचे नवे दर

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायु गळती.

SCROLL FOR NEXT