Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

Maratha, OBC Reservation News: छगन भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठा विरुद्ध नाभिक समाज अशी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील वातावरण दूषित करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

Sandeep Gawade

Maratha, OBC Reservation

एकीकडे राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूने उभा आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठा विरुद्ध नाभिक समाज अशी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील वातावरण दूषित करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारी (ता. ६) एका पत्रकार परिषदेत केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारी रोजी वाशीमध्ये पोहोचलेल्या मराठा आंदोलकांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे सरकार मराठा समाजाच्या बाजूने उभे राहत आहे; परंतु सरकारमधीलच एक मंत्री असलेले छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुठलाही निर्णय मंत्रिमंडळाचा सामूहिक असतो. तो एकट्या मुख्यमंत्र्यांचा नसतो. असे असताना त्याला एका मंत्र्याने जाहीर विरोध करणे योग्य नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर जाट मराठा गुर्जर पाटीदार संयुक्त कृती समिती आंदोलन सुरू करेल, अशी स्पष्ट भूमिका जगताप यांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. आज दादरमधील शिवनेरी सभागृहात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत कृती समितीने आपली भूमिका जाहीर केली.

पत्रकार परिषदेला भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत, अखिल भारतीय जाट महासभेचे जनरल सेक्रेटरी युद्धविर सिंग, पाटीदार संघर्ष समितीचे मनोज पणारा, राजस्थान गुर्जर महासभेचे हिम्मतसिंग गुजर, वीर गुर्जर महासभाचे सुभाष चौधरी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजी दहातोंडे, प्रवक्ता श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : ठाण्याहून CSMT चा प्रवास सुसाट होणार, महत्त्वाचा उड्डाणपूल BMC बांधणार, वाचा कसा असेल नवा मार्ग

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : तुमचा नगराध्यक्ष कोण? पालिकेवर सत्ता कुणाची? वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Cancer threat India: भारतासाठी मोठा धोका बनतोय कॅन्सर! 2040 पर्यंत रूग्णांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहोचण्याचा इशारा

Local Body Election: काय रे भाऊ! नगरपरिषद आणि नगरपंचायत यातील फरक काय?

Jaggery Tea Benefits: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT