Mumbai Crime: सागरी सुरक्षा यंत्रणेला भगदाड; कुवेतमधील बोट थेट गेट वे ऑफ इंडियाला धडकली

Mumbai Crime News: मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष उलटूनही सागरी सीमा आजही म्हणावी तितकी सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. आजच कुवेतमधील एक बोट कोणतीही पूर्व सूचना न देता थेट गेट वे ऑफ इंडियाला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Digital
Published On

Mumbai Crime News

मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष उलटूनही सागरी सीमा आजही म्हणावी तितकी सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. आजच कुवेतमधील एक बोट कोणतीही पूर्व सूचना न देता थेट गेट वे ऑफ इंडियाला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांही खडबडून जागे झाल्या आहेत. तीन लोक बोटीवर असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. काही घातपात करण्याचा इरादा होता का? या अनुषंगाने संरक्षण यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

KDMC आयुक्त कार्यलायाबाहेर राडा

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर पालिका कर्मचारी आपापसात भिडल्याचे आज पाहायला मिळालं. पालिका कर्मचारयास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केलाय. या घटनमुळे आयुक्त दालनाबाहेर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रमेश पौळकर असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून पौळकर याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Ajit Pawar: राष्ट्रवादी अजित पवारांचीच; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांनी ९२,५३५ जणांचा घेतला चावा

नवी मुंबईत भटक्या, मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. २०१६ ते २०२३ डिसेंबर आठ वर्षांत शहरात ९२ हजार ५३५ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेकडे आहे. तर दुसरीकडे दोन वर्षात १६० जणांना सर्पदंश झाले असून उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली आहे. नवी मुंबई शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गेल्या आठ वर्षात ९२ हजार ५३५ नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे.

Mumbai Crime News
Govt. Job Vacancy: 1.50 लाख तरुणांच्या हाताला मिळणार काम, कुठे मिळेल माहिती? कुठे कराल नोंदणी? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com