Manoj Jarange Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम! आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला

Manoj Jarange On Maharashtra Government: मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. ते आंदोलनावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला बसणार आहेत.

Priya More
  • मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

  • पत्रकार परिषद घेत जरांगेंनी आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

  • उद्या आंतरवारी सराटीमध्ये ते उपोषणाला बसणार

  • मागण्या मान्य न झाल्यास ते मुंबईला जाणार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरूवात करणार आहेत. आधी आंतरवाली सराटीमध्ये ते एल्गार करणार त्यानंतर चलो मुंबईचा नारा देणार आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला.

मनोज जरांगे यांनी आंदोलनाबद्दल सांगितले की, 'आंदोलन आंतरवाली सराटीतच होईल. मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला जाणार आहोत. मी उपोषणावरती ठाम आहे मरेपर्यंत उठत नाही. मेल्यावर मला मराठा समाजाने मुंबईकडे घेऊन जायचं.' यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दोन टप्प्यात तयार राहायचं आहे असे सांगितले.

प्रमाणपत्र रद्द केल्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'आमचं वाटोळं केलं सरकारने. सोनवणेच्या पोरीचं वाटोळं झालं आणि फडणवीस-शिंदेंनी तळतळाट घेतला. कोणत्याही पोरांनी आत्महत्या करू नये मी त्यांचा बाप बसलो आहे इथे. यांनी प्रमाणपत्र दिले नाही तर मी बघतो यांना. पण एकाही पोराने प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून आत्महत्या करू नये. आताच सधी आहे घरात बसू नका. मराठ्यांनी आता जागं व्हावं.'

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटीत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना जरांगे यांनी , 'एखादया वेळेस सरकार इंटरनेट बंद करू शकतं. देवेंद्र फडणवीस यांनी लय पोलिस आणलेत कुस्ती खेळायची आहे का?', असा सवाल केला आहे.

मनोज जरांगे यांनी यावेळी विखे-पाटलांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'विखे-पाटलांकडून खूप अपेक्षा होती आम्हाला. विखे पाटील म्हणाले की लोकांनी अर्ज दिले नाही. मराठा समाजाने अर्ज दिलेले आहेत. हे खोट बोलतात. मराठा समाजात उदासीनता आहे असं म्हणतात तर मग करोडोने लोक एकत्र येतात कसं काय? देवेंद्र फडणवीस सांगेल तसं विखे बोलायला लागले. फडणवीस- शिंदेंचे ऐकून विखे पाटलांनी मराठ्यांचे वाटोळं करू नये. विखे पाटलांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त कारखाना कळतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

SCROLL FOR NEXT