maratha community make a big plan to replay Chhagan Bhujbal criticize Manoj Jarange Patil jalna  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; प्रत्युत्तर देण्यासाठी आखला मोठा प्लान

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange: छगन भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी मराठा समाजाने मोठा प्लान आखला आहे.

Satish Daud

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जालन्यातील अंबड येथील ओबीसी एल्गार मोर्चात त्यांनी जरांगे यांच्या शाब्दिक हल्ला चढवला. यावरून आता मराठा समाज आक्रमक झाला असून छगन भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी जालन्यात मोठा प्लान आखण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांच्यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेली टीका मराठा समाजाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी जालना शहरात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात येणार आहे.

१ डिसेंबर रोजी ही सभा होणार असून सभेआधी शहरात रॅली काढण्यात देखील काढली जाणार आहे. जालना शहरात आयोजित केली जाणारी सभा राज्यभरात रोल मॉडेल म्हणून राबवली जाणार आहे.

या सभेला जवळपास १२ ते १५ लाख मराठा बांधव येणार असल्याची माहिती मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळं आता या सभेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) नेमकी काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. पोलिसांनी या सभेला परवानगी दिली की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाजाने घोषणाबाजी केली आहे. काही ठिकाणी भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारण्यात आले .

छगन भुजबळांच्या सुरक्षेत वाढ

छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी पोलीस सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. कुठल्याही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी भुजबळ फार्मवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तर परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT