काल सकाळी मराठ्याचं भगवं वादळ हे मुंबईत दाखल झालं.मनोज जरांगे पाटील यांनी काल सकाळी आंदोलनाचा एल्गार केला. महाराष्ट्रातील गावाखेड्यातून हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्यासाठी आणि राहण्यासाठी खूप हाल झाले. कुठे राहायचं काय खायचं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. दरम्यान, आता यावर एक शक्कल शोधून काढली आहे. 'फक्त १० रुपयांत मुंबईत राहा मोफत' असा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही १० रुपयांत मुंबईत राहू शकतात, असं या मेसेजमधून सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी मराठा आंदोलकांना फ्री वेवर थांबवण्यात आले. त्यामुळे त्यांना काही किलोमीटर लांब चालत जावे लागले. दरम्यान, अशा परिस्थितीत त्यांना राहण्यासाठी सोय व्हावी, यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.
फक्त १० रुपयात मुंबईत राहा
सध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सांगितले आहे की, सीएसएमटी ते मश्चिद बंदर किंवा भायखळा रिटर्न दहा रुपयांचे तिकीट काढा. यामध्ये तुम्हाला २४ तास फिरण्याची परवानगी मिळेल. तसेच प्लॅटफॉर्मवर राहण्यासदेखील मिळेल. याचसोबत रेल्वेचे स्वच्छतागृह वापरण्यासाठी मिळेल, याचसोबत पिण्याचे पाणी मिळेल. याचसोबत या स्थानकांवरुन आझाद मैदान जवळ आहे त्यामुळे तुम्हाला तिथे जाता येईल. तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट असल्याने तुम्हाला कोणीच अडवणारदेखील नाही. फक्त १० रुपयांत तुम्हाला मुंबईत राहता येईल.
आतापर्यंत मराठा आदोलकांचा दिवस कसा होता?
काल सकाळी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते.त्यानंतर दिवसभर मराठा आंदोलक आझाद मैदान, सीएसएमटी स्टेशन अशा विविध ठिकाणी थांबले. रात्रीदेखील त्यांनी स्वतः आझाद मैदानात आपले जेवण बनवले. त्यानंतर तिथेच जेवले. अनेकजणांनी सीएसएमटी स्टेशनवर जेवण केले आणि तिथेच झोपले. काल रात्री मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्यासाठी आणि राहण्यासाठी खूपच हाल झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.