MARATHA ACTIVISTS CONFRONT RADHAKRISHNA VIKHE PATIL  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: तुम्ही काढलेला आरक्षणाचा जीआर फसवा..., मराठा कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना घेराव घालत विचारला जाब; पाहा VIDEO

MARATHA ACTIVISTS CONFRONT RADHAKRISHNA VIKHE PATIL: मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना घेराव घातला. 'मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा आहे त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा.', असा जाब त्यांनी विचारला.

Priya More

Summary -

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घातला

  • कार्यकर्त्यांनी आरक्षणाचा २ सप्टेंबरचा जीआर फसवा असल्याचा आरोप केला

  • बीडमधील ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या मुक्कामावेळी हा तणाव निर्माण झाला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातला. '२ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा आहे त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली? हे सांगा.',असा जाब या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारला. छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते. ते हॉटेलमधून नगरकडे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून निवेदन दिले. संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण येथील मराठा कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना जाब विचारला.

बीड येथे छगन भुजबळ यांचा ओबीसी महाएल्गार मेळावा होत असताना छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षित मोठी वाढ करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला राहिली तिथे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त पहिल्यांदाच पाहायला मिळाला. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील चौकशी करण्यात आली.

दरम्यान, भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या झाडाझडती घेण्यात आली. खिशात काय आहे की नाही याची पाहणी करण्यात आली. काही गणवेशात तर काही बिना गणवेशातील पोलिस देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांचा ओबीसी मेळावा होत असताना प्रथमच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या दौऱ्यात एवढा मोठा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला.

मराठा समाजाला राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर दिला. यानंतर या जीआरला विरोध करण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती महाएल्गार मेळाव्याचा आयोजन केले असून या मेळाव्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे त्याचबरोबर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपस्थित राहणार असून मेळाव्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे. काही तास या मेळाव्यासाठी शिल्लक राहिले आहेत. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव बीडमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT