Maratha Reservation: मोदी सरकार घेणार मोठा निर्णय  Saam tv news
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : शिंदे सरकारमधील मंत्री मराठा आरक्षणाच्या बैठकीत, त्यांची पत्नी मात्र रास्तारोको आंदोलनात

Maratha Reservation News Update : अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Maratha Reservation :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वसामन्य जनता रस्त्यावर उतरली आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आता आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकाठिकाणी आज आंदोलने निघाली आहेत. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे.

दुसरीकडे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला उपस्थित आहेत. तर त्यांच्या पत्नी रास्तारोको आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात कडकडीत बंद आज पाळण्यात आला आहे. तसेच रास्ता रोको देखील करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महसूलमंत्री विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. लोणी गावासह परिसर कडकडीत बंद ठेऊन आरक्षण मागणीला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

'मंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही'

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत उपसमितीच्या बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे. राज्य सरकारने बैठकांचा फार्स न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा एकाही मंत्र्याला घराबाहेर पडू देणार नाही, असे साखळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad smell in car: कोणत्या कारणांमुळे कारमध्ये दुर्गंधी येऊ लागते?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT