Maratha Reservation Latest Update, Maratha Reservation High Court Hearing साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा समाजासाठी सर्वात मोठी बातमी! आरक्षणाची न्यायालयीन लढाई निर्णायक वळणावर, कोर्टात नेमकं काय झालं?

Maratha Reservation Latest Update : मराठा आरक्षणाच्या १० टक्के कोट्याच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. राज्य सरकारने आरक्षणाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला.

Namdeo Kumbhar

Maratha Reservation 10 Percent Quota : अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींप्रमाणेच मराठा समाजालाही उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण देणं शक्य आहे, असा युक्तीवाद राज्य सरकरानं हायकोर्टात केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य असल्याचा दावाही राज्य सरकारनं कोर्टात केला आहे. महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याबाबतचे बरेच मुद्दे मांडलेत. तसंच शुक्रे आयोगाच्या अहवालाच्या आधारावर मराठा समाजाच्या मागासलेपणाचे पुरावे न्यायालयात सादर केलेत.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर पूर्ण पीठासमोर (Full Bench) दीर्घ सुनावणी पार पडली. राज्य सरकारने हे आरक्षण घटनात्मक आणि योग्यच कसे आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला.

राज्य सरकारने हायकोर्टात मांडले की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या (शुक्रे आयोग) अहवालाचा सखोल अभ्यास करूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. हा निर्णय अचानक किंवा राजकीय दबावाखाली घेतलेला नसून, मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्यामुळेच घेण्यात आला आहे.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याबाबत सरकारने न्यायालयात स्पष्ट केले की, मराठा समाजाची बिकट सामाजिक स्थिती आणि मागासलेपण ही एक अपवादात्मक परिस्थिती (Exceptional Circumstance) आहे. त्यामुळे ही ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देणे कायद्यानुसार योग्यच आहे.

दुसऱ्या बाजूने आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. दोन्ही बाजूंचा (सरकार आणि याचिकाकर्ते) प्रदीर्घ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील आपला निर्णय राखून (Reserve) ठेवला आहे. लवकरच यावर हायकोर्टाचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Side Effects of Pomegranate: आरोग्यासाठी फायदेशीर डाळिंब पण ‘या’ ५ लोकांनी चुकूनही खाऊ नये; शरीराचे होऊ शकते नुकसान

Nepal Flood: '२० मिनिटांत पाणी पोहचेल ', नेपाळमध्ये पुन्हा महापूर येणार; ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी ३ हजार रुपये करा, रक्षाबंधनानिमित्त आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सातही तलावांत ९५.८७ टक्के पाणीसाठा; कोणत्या तलावात किती पाणी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT