Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले,... तर मराठा समाज त्या व्यक्तींना सोडणार नाही

Prakash Ambedkar: मराठा समाजाच्या आग्राराहामुळे मी उपचार सुरु केले आहेत. जर असा कुठला प्रकार घडला तर मराठा समाज त्या व्यक्तींना सोडणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

Ruchika Jadhav

लक्ष्मण सोळुंके

Marataha Aarakshan:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आठव्या दिवशी देखील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाल्यानंतर हायकोर्टाच्या सूचनेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जरांगे पाटील यांच्या उपचारावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केलीये. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपचाराच्या माध्यमातून जरांगेंना संपवण्यासाठी विषबाधा केली जाऊ शकते, अशी शंका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत. त्यांना तशा प्रकारची काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून त्यांनी शंका उपस्थित केली असेल. मराठा समाजाच्या आग्रहामुळे मी उपचार सुरु केले आहेत. जर असा कुठला प्रकार घडला तर मराठा समाज त्या व्यक्तींना सोडणार नाही."

प्रकाश आंबेडकर हे या समाजाचा एक मुलगा म्हणून बोलत आहेत. त्यांना अनुभव असल्याने ते असं बोलले असतील मात्र मी समजासाठी मरायला घाबरत नाही अशी, प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर

मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत, अशी मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे. मात्र, याच्यामागे नेमकं कोण आहे, ते सांगणार नाहीये?, असं आंबेडकरांनी म्हटलंय.

अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात

जरांगे यांच्यामुळे बऱ्याच राजकीय नेत्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या घातपाताची शक्यता आहे. त्यांना दिले जाणारे जेवण, औषध हे अतिशय घरातील विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावीत. मनोज जरांगे यांनी स्वतः स्वत:ची जास्त दक्षता आणि काळजी घ्यावी, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भयंकर! घटास्फोटानंतर नव्या संसाराचे स्वप्न, पण लग्नाच्या आदल्या रात्रीच नवरीचा मृत्यू, जळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Maharashtra Live News Update: विरारच्या पश्चिमेकडील मुख्य विवा कॉलेज मार्गावर मोठे झाड कोसळण्याची घटना

Shocking : मुसळधार पावसानं घराची भिंत कोसळली, वृद्ध महिलेचा झोपेतच मृत्यू

शिंदे गटातील आमदाराच्या भावावर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ, रात्री ११ नंतर 'नो पेट्रोल', नेमकं कारण काय?

Gmail Safety: हॅकर्सपासून तुमचे Gmail वाचवायचे का? वापरा 'हे' सोपे ट्रिक्स

SCROLL FOR NEXT