jalna, beed, Maratha Reservation saam tv
महाराष्ट्र

Maratha Arakshan Andolan : जालना धुमसतंय, अंबड चौफुलीत तणाव; माजलगावात दगडफेक

Jalna Maratha Reservation : ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार उदयनराजे भाेसले आदी मान्यवर आज जालन्यात घेणार मराठा आंदाेलकांची भेट.

Siddharth Latkar

- विनाेद जिरे / लक्ष्मण साेळुंके

Maratha Kranti Morcha Latest Updates : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शनिवार) बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान माजलगाव येथे बंदला हिंसक वळण लागले तर जालना जिल्ह्यात देखील आंदाेलक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. (Maharashtra News)

बीडच्या मोठेवाडीत शुक्रवारी आंतरवाली सराटे येथील घटनेच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आज सकाळपासून बीड जिल्ह्यात कडकडकीत बंद पाळण्यात आला आहे.

शहरातील मुख्य सुभाष रोड मार्केट, नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, धोंडीपुरा, कारंजा, जालना रोड तसेच जुना मोंढा मार्केट या ठिकाणी शंभर टक्के दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामुळे बीड शहरातील रस्त्यावर व मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

बीडच्या माजलगाव मध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिऴाले. शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांकडून रस्त्यावर उतरत सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला.

यावेळी लाठीहल्ला व मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. माजलगाव शहरातील मुख्य चौकात मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आले तसेच मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली.

परळीमध्ये देखील मराठा बांधव आक्रमक झाले हाेते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी जमत आंदोलन सुरू केले. मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी करुन परळी शहर कडकडीत बंद ठेवत आंदोलन करण्यात आले.

अंबड चौफुलीत तणाव

आज संतप्त आंदोलकांनी जालन्यातील अंबड चौफुली परिसरात ट्रॅक पेटवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील अंबड चौफुली परिसरात.पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान जालना शहरात ही दगदफेकीच्या घटना घडल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT