Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनामुळेच राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळालंय; मनोज जरांगे काय म्हणाले, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil On Girls Free Education Maratha Reservation Ralley: सरकारने नुकतेच राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केलाय. मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही नांदेड

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सर्व जातीच्या मुलींना मोफत शिक्षण जाहीर केल्याबद्दल सर्व जातीधर्माच्या वतीने सरकारचे आभार मानले आहेत. मराठा आंदोलनामुळेच सगळ्या जातीच्या मुलींना मोफत शिक्षण मिळालं, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय. आंदोलन कुणाचंही असो पण सर्वच जातीतील लेकींना फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच ज्या मुलींनी या निर्णयाच्या अगोदर अर्ज भरले आहेत, त्यांची फी परत करण्याची मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे.

जरांगे पाटील काय म्हणाले?

राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर (Manoj Jarange Patil) उतरलाय. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा सवाल देखील यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी विचारला आहे. मराठ्यांचे काही लोक यांच्या बाजूने बोलतात, त्यामुळे समाजात नाराजी आहे. काही मंत्री म्हणतात की, आरक्षण टिकणार नाही. आरक्षण हेच देणार आणि हेच उडवणार अशी टीका देखील यावेळी जरांगेंनी केलीय.

शांतता रॅलीचा आज चौथा दिवस

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (Devendra Fadanvis) यांनी तातडीने मागण्यांवर अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. मुसळधार पाऊस असला तरी मराठा बांधव रॅलीत सहभागी होणार कारण आरक्षण ही वेदना असल्याचं जरांगे पाटलांनी (Maratha Reservation) म्हटलं आहे. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देणार नसल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. जरांगे पाटलांची शांतता रॅलीचा आज चौथा दिवस आहे. या रॅलीत विविध जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचं दिसत आहे.

लातूरमध्ये रॅलीची जय्यत तयारी

मराठा आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ मिळावं, याकरिता मनोज जरांगे पाटलांनी ६ जूलैपासून मराठवाड्यात महाशांतता रॅली काढलीय. ही रॅली आज लातूरमध्ये आहे. आज दुपारी बारा वाजता छत्रपती शाहू महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली (Maratha Reservation Rally) निघणार आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील जवळपास पाच लाखापेक्षा अधिक मराठा बांधव या रॅलीत सहभागी होतील, अशी शक्यता आहे. लातूरमध्ये रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT