Maratha Reservation Leader Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Reservation Maharashtra : आरक्षण दिलं नाही तर... २०२४ ला तुमचा भुगा करणार, मनोज जरांगेंचा रोख कुणाकडे?

Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपासलं आहे. जरांगे पाटील आपल्याम मागणीवर ठाम आहेत.

Rohini Gudaghe

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. बोलण्यासाठी सरकारने यावं, म्हणून केव्हाच आंदोलन नाही करत. आपल्या ताकतीवर आणि समाजावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी केलंय. राजकीय भाषा बोलतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यामुळे मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील, तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्याने समाज बघतो. आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही. आम्ही फडणवीस यांना संधी (Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis) दिलीय. तुम्ही आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला दुसरं काहीही देणंघेणं नाही.

मनोज जरांगे काय म्हणाले?

कोणाला पाडायचं, कोणाला उभा करायचं तुम्ही फक्त सांगा असं समाज म्हणतोय. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. मी जीवघेणा प्रवास सुरू (Manoj Jarange News) केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले तर तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. २०२४ ला तुमचा भुगा करणार, असा धमकीवजा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय.

फडणवीस यांना एक संधी

मला आता राजकीय बोलायचं नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिलीय. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. तहसीलदार यांच्या हातात काही नाही, त्यांना दोष देऊन फायदा (Maratha Reservation) नाही. ते बिचारे अधिकारी आहेत. त्यांचं काम करत आहेत. याच्यात मुख्य फडणवीस साहेब, मंत्र्यांना आमदारांना काम करून देत नाही. मराठा समाजाला साक्षी ठेवून फडणवीस यांना एक संधी दिलीय. आरक्षण नाही दिलं तर फडणवीस साहेब दोषी (Maharashtra Politics) असतील. जाणून-बुजून मराठ्यांचं वाटोळ करायला निघाले असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT