Manoj Jarange, Abhijit Dipke Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Manoj Jarange, Abhijit Dipke : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त होत आहे. अभिजित दीपके यांनी जरांगेंना काही झाले किंवा त्यांच्या सुरक्षेशी खेळ झाला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा सरकारला इशारा दिला आहे.

Namdeo Kumbhar

Abhijit Dipke warning over Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. जरांगे यांच्या ढासळत्या प्रकृतीवरून आणि सरकारच्या भूमिकेवर बोलताना 'ॲड. अभिजित दीपके' यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. जर जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या सुरक्षेशी खेळ झाला, तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा आक्रमक इशारा दिपकेंनी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...

मराठा आरक्षणाच्या रास्त मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज १४ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, या निर्दयी सरकारकडून अद्याप कोणतीही विचारपूस किंवा उपोषण सोडवण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. जरांगे हे स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत. सरकारने सोनम वांगचुक यांना उचलून आंदोलन मोडीत काढण्याचा जसा प्रयत्न केला, तसा प्रयत्न जर इथे जरांगे यांच्या बाबतीत केला तर लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे! जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल," असा खणखणीत आणि गंभीर इशारा ॲड. अभिजित दीपके यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कॉमेडियनला बिस्किटं खाऊ घालायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही

सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना दीपके म्हणाले, "या सरकारला कॉमेडीयनला भेटायला आणि त्यांना बिस्किटं खाऊ घालायला वेळ आहे, पण समाजासाठी जीवाची पर्वा न करता १४ दिवसांपासून उपाशी बसलेल्या मनोज जरांगेंशी बोलायला वेळ नाही. हे अत्यंत संतापजनक आणि अयोग्य आहे. सरकारने स्वतः इथे येऊन जरांगेंशी सन्मानपूर्वक चर्चा केली पाहिजे."

'प्रथमेश'च्या आत्महत्येवरून सरकारचे वाभाडे

आरक्षणाचा मुद्दा रेंगाळत ठेवल्यामुळे तरुणांवर ओढावलेल्या प्रसंगावर बोलताना ते म्हणाले, "काल मी प्रथमेशच्या घरी गेलो होतो. आज ग्रामीण भागात रोजगार उरलेला नाही. सरकारने मुलांना ना चांगले शिक्षण दिले ना रोजगार, हे या सरकारचे पूर्ण अपयश आहे. धनदांडगे आणि नेते आपली मुले शिक्षणासाठी परदेशात पाठवतात, पण सामान्य मराठा कुटुंबातील मुलांचे काय? रोजगाराच्या अभावामुळे प्रथमेशसारख्या तरुणांना जीव गमवावा लागत आहे. सरकारने तात्काळ तोडगा काढला नाही, तर प्रथमेशसारख्या आणखी दुर्दैवी घटना घडतील," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

MPSC आणि मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा

यावेळी दीपके यांनी MPSC च्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरही सरकारने तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी केली. तसेच, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आगामी 'मुंबई आंदोलना'ला आमचा पूर्ण पाठिंबा असून, या आंदोलनात आपण स्वतः सक्रियपणे सहभागी होणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव काळात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा

पेपर फुटीत शिक्षण मंत्र्यांचा दोष नाही, योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ; राजीनाम्यावर दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया

पेपरफुटीविरोधात उद्रेक! MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, मुंबईत गदारोळ

Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

SCROLL FOR NEXT