Manoj Jarange Health Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News : सरकारने पुन्हा शब्द फिरवला तर सलाईन काढून फेकेन; उपचारानंतर मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange Health News : राज्य सरकारने पुन्हा शब्द फिरवला तर सलाईन काढून फेकेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

डॉ. माधव सावरगावे

राज्य सरकारने सगेसोयरेंच्या अंमलबजावणीचं आश्वासन दिलं म्हणून मी सलाईन लावलं. पण पुन्हा शब्द फिरवला तर सलाईन काढून फेकेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. म्हणून मंत्र्यांच्या शब्दांचा सन्मान केला. आमचं देणं घेणं फक्त आरक्षणाशी आहे, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. चौथ्या दिवशी जरांगे यांची तब्येत खालावली होती. मात्र, त्यांनी उपचारास नकार दिला. यानंतर फडणवीसांचे विश्वासू आमदार जरांगे यांना जाऊन भेटले.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदास संदिपान भुमरे यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास होकार दिला. डॉक्टरांनी त्यांना आतापर्यंत तीन सलाईन लावल्या. सध्या जरांगे यांची प्रकृती बरी आहे.

'...नाहीतर सलाईन काढून फेकेन'

माध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, "मराठा बांधव मला भेटायला येतायत त्यांनी येऊ नये शेतीची कामे उरकून घ्यावीत. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सरकारच्या वतीने आरक्षण विषय लवकर तडीस नेऊ असं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे मी सलाईन लावलं आहे".

"जर यावेळीही सरकार आणि मंत्र्यांनी पुन्हा शब्द फिरवला. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी सलाईन काढून फेकेन. जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार नाही. अंमलबजावणीला 5 महिने वेळ लागतो का? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला".

"आधीही १७-१८ दिवस आमच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण आता जर यांनी छळ केला तर यांची जिरवल्या शिवाय राहणार नाही. आम्हाला वेठीस धरले तर बरोबर यांचा कार्यक्रम करू. जो मंत्री आमचं काम करेल त्याचं उघड नाव घेऊन कौतुक करणार", असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT