Maratha activist Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार; अंतरवाली सराटीतून तारीख केली जाहीर

Manoj Jarange News : मराठा आरक्षणावरून जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. जरांगे यांनी फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्यानंतर उपोषणाची तारीख जाहीर केली.

Vishal Gangurde

जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक

मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार

अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार

आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटीतील आयोजित बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर ३० मे रोजी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.

मनोज जरांगे यांच्या भाषणातील मुद्दे

मला आज खरंच प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. आज माझं मन भरून आलं. मला खूप आनंद झाला. आपण आरक्षणासाठी 3 वर्षापासून लढत आहे. आतापर्यंत बरंच मिळालं, पण काही राहीलं आहे. आपले लेकरं अधिकारी व्हायला लागले म्हणून सरकार जाळायला लागले. मराठ्यांसमोर शहाणपणा चालत नाही.

समाजाचा एवढा द्वेष का आहे, हे समजत नाही. भाजपमधील मराठ्यांना आरक्षण लागत नाही का? मुंबईतील लोक म्हणतात की, तुम्ही परत कधी येणार आहे? मुंबईतील लोकांना आपली आस लागली. आता शांतेतच आंदोलन होणार आहे. आता आंदोलन असे करायचं की आता फडणवीस साहेबांना सगळीकडे मराठेच दिसले पाहिजे.

मी फडणवीस साहेबांना दोष देत नाही, तुम्ही हैदराबाद जीआर काढला आता प्रमाणपत्र का रोखले, अधिकारी म्हणतात, हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सरकारने द्यायला नाही सांगितले. मंत्र्याला किंमत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते . मग आमचे प्रमाणपत्र देखील तुम्हीच रोखले.

308 प्रमाणपत्र निघाले, असं सरकार म्हणतय, याचा अर्थ हैदराबाद गॅजेट लागू झालं. आम्हाला प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब, तुमच्या पन्नास पिढ्या आल्या, तरी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही. सगळ्यांना फडणवीसांनी कुणबी प्रमाणपत्र द्याव अन्यथा आंदोलन भयंकर होणार आहे. आम्ही आंदोलनाची तारीख जाहीर करण्याआधी प्रमाणपत्र द्या.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना विश्वास आहे की, हाच माणूस आरक्षण देऊ शकतो, आठ महिने सरकारला वेळ दिला आता देणार नाही . 1994 चा जीआर जसा काढला, त्याच धर्तीवर हैदराबाद, सातारा, पुणे आणि औंध गॅजेटचा जीआर काढायचा. पैसे कमवणारे लोक वेगळी आहे, एका दिवसात मराठ्यांची पोर त्यांचा भुगा करतील. छक्के पंजे वेगळेच दिसते, त्यांना आम्ही भाव देत नाही.

मराठ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी शांत आहे. एका मंत्र्यांने माझ्या विरोधात बोलण्यासाठी एका एका संघटनेला 2 कोटी दिले अशी मला माहिती कळली. एका संघटनेच्या अध्यक्षांनी मला सांगितलं. मला असं वाटत माझे भाऊबंध आहे. मला तुमच्या विरोधात जायचं नाही. मी काम सोडून देईल, पण तुमच्याशी खोट बोलणार नाही. 28 मे रोजी राज्यातील अभ्यासाकांनी अंतरवाली सराटीत यावं , या जीआरविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनास्थळी सापडली सुसाइड नोट, चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि परत मैदानात उतरा, फुटलेल्या खासदारांना उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

Maharashtra News Live Update: टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे - जयंत आंसगावकर

SIP Calculator: फक्त महिना २०,००० रुपयांमध्ये होऊ शकता ₹१ कोटीचे मालक, ते कसं आणि किती वर्षांत?, जाणून घ्या

Shruti Marathe: नथ, नऊवारी आणि दिलखेचक अदा; श्रुती मराठेचा पारंपरिक सौंदर्यावर चाहते फिदा

SCROLL FOR NEXT