Manoj Jarange Sister 
महाराष्ट्र

Manoj Jarange Sister: 'माझ्या भावाचं काही बरंवाईट झालं तर...'; मनोज जरांगेविषयी बोलताना बहीण भारती कटारे भावुक

Manoj Jarange Sister: 'मनोज जरांगे यांच्या तब्येतीची चिंता व्यक्त करत त्यांच्या बहिणीने माझ्या भावाचं काही बरंवाईट झालं तर त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे

संजय जाधव

Manoj Jarange Sister News:

जालन्यातील मनोज जरांगे यांचं गेल्या २ आठवड्यापासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसल्याने मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येत आहे. कालच त्यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली. यामुळे साऱ्या राज्याचं लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या तब्येतीची चिंता व्यक्त करत त्यांच्या बहिणीने माझ्या भावाचं काही बरंवाईट झालं तर त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांची बहीण भारती संजय कटारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारती संजय कटारे म्हणाल्या, माझ्या भावाने समाजासाठी खूप मोठा त्याग केला आहे. गेल्या १७ वर्षापासून लढा देत आहोत. तीन वर्षापासून मी आंदोलन व उपोषण मंडपातच राखी बांधायला जात आहे'.

भावाविषयी बोलताना भावुक होत भारती संजय कटारे म्हणाल्या, 'आतापर्यंत सरकारने कुठलाच निर्णय घेतला नाही. काल सुद्धा सर्वपक्षीय बैठक झाली'.

'आम्हाला वाटले होते की, ठोस निर्णय घेतला जाईल. मात्र, तसं झालं नाही. त्यांच्या प्रतिनिधी आले व उपोषण मागे घेण्यास सांगितले. यासाठी बैठक घेतली होती का? असा सवालही त्यांनी केला.

'लहान मुले, वृद्ध महिला सर्व बेसावध असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यांना ऑर्डर मिळाल्याशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही. माझ्या भावाचं जर काही बरंवाईट झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असेही भारती कटारे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Vande Bharat Sleeper Train: १२० वंदे भारत स्लिपर येणार; पहिलं प्रोटोटाइप या महिन्यात येणार, वाचा लेटेस्ट अपडेट

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

SCROLL FOR NEXT