CM Eknath Shinde: मराठा आरक्षणासंबंधी पत्रकार परिषदेआधीच्या व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; CM शिंदे नेमकं काय म्हणाले?

CM Eknath Shinde's On Maratha Aarakshan: या व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
CM Eknath Shinde on Viral Video
CM Eknath Shinde on Viral VideoSaam tv

Eknath Shinde's Clarification on Viral Video:

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक दोन दिवसांपूर्वी बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेआधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत 'आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं, असा संवाद ऐकू येत आहे. या व्हिडिओवरून विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. या व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हायरल व्हिडिओवर एक्स अंकाऊटवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे'.

CM Eknath Shinde on Viral Video
Manoj Jarange News : मनोज जरांगेंची अट पूर्ण; CM एकनाथ शिंदे, अजित पवार आंतरवाली सराटीत जाणार

'मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे, असे ते पुढे म्हणाले .

शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे, असे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले.

'आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde on Viral Video
बोलून मोकळं व्हायचं...! मराठा आरक्षणासंबंधी पत्रकार परिषदेआधीचा CM शिंदे-फडणवीस-पवार यांचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com