Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठ्यांचं वाटोळं करायला निघाले; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Warning Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या संतापाची लाट असल्याचं दिसतंय.

Rohini Gudaghe

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

राज्यात दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत आहे. जरांगे पाटलांनी सलग सहाव्यांदा उपोषण सुरू केलंय. सरकारने वेळेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलाय. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून आमरण उपोषणाला बसलोय. ही देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी आहे. संधी दिल्यावर पण काम नाही केलं तर थोबाड उचकता येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.

मुंबईला मराठा आंदोलक का गेले मला माहित नाही. मी माहिती घेऊन सांगतो, अशी माहिती मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज पत्रकार परिषदेच मला दिलीय. समाज तरी काय करणार? अन्याय किती करावा? किती सहन करावा, लिमिट पाहिजे काहीतरी अशी टीका त्यांनी सरकारवर केलीय.

जरांगे पाटलांची नेमकी भूमिका काय?

मराठा समाज एकमेव जात आहे, जी अन्याय सहन करते. मराठा समाजाला मी प्रोग्राम दिला नाही, पण लोकांना दम निघत नाही. मी तरी काय करू शकतो?

मराठा समाजावर सरकारकडून ठरवून अन्याय सुरू आहे. मराठ्यांचं वाटोळ करायला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निघाले आहेत. सगळ्या पक्षातले मराठे एकजीवाने म्हणणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणारे कोण आहे? मला माहित नाही. आम्हाला देणघेणं नाही, फक्त मागणीची अंमलबजावणी (Maratha Aarkshan) पाहिजे, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केलाय.

सरकार काय भूमिका घेणार?

मला दोन चार दिवसात अंमलबजावणी पाहिजे. मराठ्यांवर अन्याय चालला थांबवावा, सहनशक्ती संपली तर विषय खल्लास असा थेट इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा आमरण उपोषण (Maratha Reservation Issue) सुरू केलंय. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. यावेळी देखील ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, आता याबाबत सरकार काय भूमिका घेतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना आणि बीड बंद ठेवला आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT