Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Speech: 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर...; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

Vishal Gangurde

Manoj Jarange Patil Latest speech:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. याच मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू आहेत. याचदरम्यान, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं, तर या माऊली फाट्याच्या परिसरात 20 किलोमीटरपर्यंत उभा राहायला जागा उरणार नाही याची तयारी ठेवा, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी बीडमधील सभेत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, 'आज आपल्या लेकराला आरक्षणाची गरज आहे. आपल्या लेकरांच्या मदतीला कोणी यायला तयार नाही'.

'मी गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून घराचा उंबरठा चढलो नाही. त्यांना मराठा समाजात फूट पाडायची आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देतो म्हणाले आहेत. त्यामुळे आरक्षण द्या, अन्यथा तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

'मी तुमच्यात सलाईन घेऊन आलो आहे. आताही मी सलाईन लावून आलो आहे. माझी एकच विनंती आहे, काहीही झालं तरी आपल्यात फूट पडू देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. मी तुमच्या बळावर तिथं बसतोय. माझी एकच अपेक्षा आहे, तुम्ही खंबीरपणे साथ द्या, असंही ते म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT