Manoj Jarange Patil and Pankaja Munde Dasara Melava Beed Saam TV
महाराष्ट्र

Beed Dasara Melava : मनोज जरांगे की पंकजा मुंडे, कुणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी? VIDEO आला समोर

Manoj Jarange Patil and Pankaja Munde Dasara Melava Beed : बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे घेत आहेत.

Satish Daud

बीड : जिल्ह्यामध्ये आज दोन दसरा मेळावे होत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथील भगवान गडावर मेळावा होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत. या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. याशिवाय मेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही हजेरी लावणार आहेत.

तर, दुसरीकडे नारायण गडावर जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. दरम्यान, दोन्ही मेळाव्यांसाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल झाले आहेत. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी हजारो ओबीसी बांधव दाखल झाले आहेत.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे देखील भगवान गडावर आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी लाखो मराठा बांधव उपस्थित आहे. दरम्यान, भगवान गड आणि नारायण गडावरील गर्दीचा व्हिडीओ समोर आला आहे. थोड्याच वेळात दोन्ही नेत्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोघेही काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

IAS Transferred: राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल; २४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या जिल्ह्यात कोण कलेक्टर? जाणून घ्या

Tissue Saree Drape Tips: टिश्यू साडी अंगावरुन निसटतेय? या टीप्स वापरुन नेसा साडी, दिसेल परफेक्ट

Maharashtra Live News Update : पालघरमध्ये बस चालकाची दादागिरी; प्रवाशावर संताप

नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित गँगवॉर; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT