Siddhi Hande
प्रत्येक स्त्रीला साडी नेसायला आवडते. साडीत स्त्रियांचे सौंदर्य अजूनच खुलते.
सध्या टिश्यू साडी खूप ट्रेडिंगला आहे. अनेक महिला टिश्यू साडी नेसतात.
टिश्यू साडी ही खूप सिल्की असते. ही साडी नेसल्यावर अंगावरुन सरकते.
टिश्यू साडी नेसताना या टीप्स फॉलो करा. जेणेकरुन साडी खूप चांगली बसेल आणि निसटणार नाही.
टिश्यू साडी खूप पातळ असते. त्यामुळे साडीच्या आता सॅटिन किंवा सिल्कचा पेटीकोट घाला.
साडी नेसताना सर्वात आधी उजव्या बाजूने मागून खोचा. साडी योग्य पद्धतीने खोचा.
यानंतर साडीच्या ७-८ निऱ्या घाला. निऱ्यांना व्यवस्थित पिन लावा अन्यथा निऱ्या निसटू शकतात.
टिश्यू साडीचा पदर शक्यतो तुम्ही वन साइड घ्या. परंतु त्याला व्यवस्थित पिन लावा. जेणेकरुन पदर खाली पडणार नाही.