Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यात वाढलेली उष्णता, घाम आणि आर्द्रतेमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
तुम्ही जर काही चुकीचे उपाय कलेत तर तुम्हाला मुरुम, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन वाढू शकते.
उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट होते आणि हीट रॅशेस, मुरुम, फंगल इन्फेक्शन यांचा धोका वाढतो.
जास्त वेळ उन्हात राहिल्यास सनबर्न, टॅनिंग आणि पिग्मेंटेशनची समस्या निर्माण होते. तेलामुळे जास्त ऑयली होते. तसेच रोमछिद्र बंद होतात आणि मुरुम वाढू शकतात.
बॉडी लोशन जाड असतात, त्यामुळे चेहऱ्यावर वापरल्यास त्वचा चिकट आणि निस्तेज दिसू शकते.
ऑयली क्रीममुळे त्वचेला श्वास घेणं कठीण होतं आणि पिंपल्सची समस्या वाढते. उन्हाळ्यात हे प्रॉडक्ट्स वापरल्यावर त्वचा जास्त संवेदनशील होते आणि सनबर्नचा धोका वाढतो.
अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट्स त्वचा कोरडी आणि डॅमेज करू शकतात. हलके (माइल्ड) प्रॉडक्ट्स, जेल बेस्ड मॉइश्चरायझर आणि सौम्य क्लींजरचा वापर करावा.
ऑयल-फ्री सनस्क्रीनचा वापर केल्यास त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहते.
उन्हाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी जड, ऑयली आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स टाळणे गरजेचे आहे. नैसर्गिक आणि हलके प्रॉडक्ट्स वापरल्यास त्वचा निरोगी राहू शकते.