Lasun Chutney: जेवणासोबत चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? मग लगेचच बनवा लसणाची चटणी, वाचा रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

चटपटीत चटणी

जेवणासोबत काहीतरी चटकदार प्रत्येकालाच खायला आवडतं. त्यात रोजच्या पौष्टीक आहारात लसणाची चटपटीत चटणी असेल तर जेवणाची रंगत आणखी वाढते.

Lasun Chutney Recipe

लसणाच्या चटणीसाठीचे साहित्य

लसूण, टोमॅटो, आलं, कोथिंबीरचे देठ, जीरं, तेल, धणे पावडर, काश्मिरी लाल मिरची, जिरे पावडर, लिंबाचा रस, जीरं, मेथीचे दाणे आणि साखर इ.

Lasun Chutney Recipe

स्टेप १

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. मग कोमट पाण्यात लाल मिरच्या ५ ते १० मिनिटं भिजत घाला.

Chutney Recipe

स्टेप २

आता एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, टोमॅटो, आलं, कोथिंबीरीचे देठ, जिरे, चवीपुरतं मीठ, तेल आणि लाल तिखट इत्यादी साहित्य एकत्र करा.

Chutney Recipe

स्टेप ३

आता हे साहित्य बारिक वाटून घ्या. याची स्मूद पेस्ट झाली पाहिजे. दुसरीकडे कढई तापवा.

garlic chutney recipe

स्टेप ४

कढईत आता जिरं आणि मेथीचे दाणे घाला. पुढे त्यात संपूर्ण तयार मिश्रण ओता.

garlic chutney recipe

स्टेप ५

आता गॅस स्लो ठेवून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. जेव्हा तेल वेगळं होईल तेव्हा त्यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, साखर आणि मीठ घालून छान परतून घ्या.

garlic chutney recipe

स्टेप ६

शेवटी गॅस बंद करुन तुम्ही त्यात लिंबू पिळून घ्या. मग थोड्या वेळात जेवणासोबत ही चटणी सर्व्ह करा.

garlic chutney recipe

NEXT: Moong Dal Dosa: रोजचा साधा डोसा खाऊन कंटाळतात? बनवा मुग डाळीचा कुरकुरीत डोसा, वाचा सोपी रेसिपी

moong dal dosa | google
येथे क्लिक करा