अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडला केज कोर्टाने ७ दिवसांची एसआयटी कोठडी दिली आहे. वाल्मिक कराडला कोठडी मिळताच त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर परळीतील गावात बंद आणि आंदोलन करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठं आवाहन केलं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष ठेवावे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
संतोष देशमुख प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'न्याय देवता न्याय करणार आहे. मी आधी सांगितलं होतं की, खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच आहे.अंडर ट्रायल केस झाली पाहिजे. जातिवाद आणि दंगली घडून आणणारी प्रचंड मोठी धनंजय मुंडे यांची टोळी आहे. माननीय न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर एसआयटी आणि सीआयडी कसून तपास करण्यात येणार आहे'.
धनंजय मुंडे यांच्यावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'पोलिसांना हे धमक्या द्यायला लागले आहेत. धनंजय मुंडे हे सकाळी याच्यासाठीच आले वाटतं. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवावे. धनंजय मुंडे यांना कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवायचा नाही वाटतं. न्यायालय पुढे हे सुरू आहे. तुम्ही लावलेली संचारबंदी कुठे गेली? बीड जिल्ह्यात कायदा संस्था अबाधित राहिल्या पाहिजे'.
'या प्रकरणात पडद्याच्या पाठीमागे राहून धनंजय मुंडे यांच्यासाठी त्याने माया जमवली. ही जातीयवाद पसरवणारी टोळी आहे. त्यांची टोळी माजलेली असून त्यांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही. ते जवळ करायच्या पात्रतेचे आहेत का? त्यांना सामाजिक सलोखा ठेवायचा नाही? आरोपींना हे साथ कसे देऊ शकतात? त्यांना सहआरोपी करा. खंडणीतील आणि हत्येमधील आरोपी एकच असून त्यांना 302 लावून मकोका लावा, असे जरांगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.